देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरुत होणाऱ्या इंडिया एनर्जी वीक २०२३ चे उद्घाटन करणार आहेत. हा एनर्जी वीक ६ ते ८ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. यादरम्यान, देशातील ११ राज्यांमध्ये ई-२० पेट्रोलची सुरुवात केली जाणार आहे. या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल असणार आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलर एनर्जीच्या माध्यमातून सोलर कुकिंग सिस्टिम ही सादर करतील आणि कर्नाटकातील तुमकुरु मध्ये HAL च्या हेलिकॉप्टर फॅक्ट्रीची ही सुरुवात करणार आहेत. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, ई-२० पेट्रोल मध्ये इथेनॉलचा मिसळले जाते आणि यामुळे शासनासह सामान्य नागरिकांना काय फायदा होणार? (E20 fuel)
E20 पेट्रोल नक्की काय?
ई-२० मध्ये ई चा अर्थ आहे इथेनॉल. म्हणजेच पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्के आहे. संख्या जेवढी वाढेल तेवढेच इथेनॉलचे प्रमाण ही वाढणार आहे. सध्या देशात मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल असते. आता देशातील ११ शहरांमध्ये २० टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
आता इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे बायोमासपासून तयार केले जाते. बहुतांश इथेनॉल मका आणि उसाच्या शेतीपासून तयार केले जाते. भारतात आधीपासूनच अशा गोष्टींची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ऑटोमोबाइलसाठी एका मोठ्या स्तरावर इथेनॉल देशात तयार केले जाऊ शकते.
ई-२० मुळे काय फायदा होणार?
-इथेनॉल इको-फ्रेंडली इंधन आहे जे अल्कोहोल बेस्ड आहे. यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होत नाही. अमेरिकेतील सरकारच्या वेबसाइटनुसार, इथेनॉल मका, उस आणि बीट सारख्या शेतीपासून तयार केले जाते.
-इथेनॉलचा ऑक्टेन क्रमांक अधिक असतो. त्यामुळे गाड्या आणि पर्यावरणासाठी उत्तम मानले जाते. जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते तेव्हा ३५ टक्क्यांपर्यंत कार्बनमोनोऑक्साइडचे कमी निर्माण होतो. त्याचसोब सल्फरडायऑक्साइड सुद्धा कमी निघते.
-पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे आणखी काही कारणं आहेत. याच्या मदतीने कार्बन उर्त्सजन कमी करण्यासह जलवायू परिवर्तनाच्या धोक्यांना रोखण्याचे काम केले जाते. इथेनॉलला देशात तयार केले जाते. याची आयात कमी झाल्याने देशाचे उत्त्पन्न वाढत आहे.
-शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार करावे यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. उसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खासकरुन याचा अधिक फायदा होतो. यामुळे इथेनॉल तयार केले जाते.
-इथेनॉलला अशा प्रकारे प्रोत्साहन मिळाले तर सरकारच्या खर्चात कपात होईल. तेलाच्या आयात कमी होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या परदेशी चलानाची बचत झाली आहे. तर २७ लाख टन कार्बन उत्सर्जन ही कमी झाला आहे.(E20 fuel)
हे देखील वाचा- ChatGPT ची जगभरात का होतेय जोरदार चर्चा?
कोणत्या वाहनांचा याचा फायदा होणार?
देशात सध्या अशा गाड्या कमी आहेत ज्या ई२० पेट्रोलवर चालतील. अशातच ह्युंदाई मोटर्सची क्रेटा, वेन्यू आणि एक्सेलज एसयुवीएस सारख्या गाड्या ई२० पेट्रोलवर चालू शकतात. नुकत्याच ऑटो एक्सपो २०२३ च्या दरम्यान, टाटा मोटर्सने आपल्या दोन नव्या टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सादर केले. त्याचसोबत हॅरियर आणि सफारी एसयुवीमध्ये लवकरच ई२० फ्युल इंजिन दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२३ पर्यंत महिंद्रा, मारुति सुजुकी, किआ आणि दुसरे ब्रँन्ड्स ही अशा इंधनावर चालणाऱ्या गाड्या तयार करणार आहेत.