Home » e-SIM कार्डचे फायदे आणि तोटे

e-SIM कार्डचे फायदे आणि तोटे

by Team Gajawaja
0 comment
e-SIM
Share

जर तुम्ही कोणत्याही ब्रँन्डचा स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला ई-सिम (e-SIM) कार्ड काय आहे याबद्दल थोडीतरी माहिती असेल. असे होऊ शकते की, येणाऱ्या दिवसात बहुतांश फोनमध्ये ई-सिमचा वापर अधिक करण्यात येईल. अॅप्पलच्या आयफोन १४ मध्ये कंपनीने केवळ ई-सिमचाच ऑप्शन दिला आहे. दरम्यान, ई-सिम असणारे मॉडेल केवळ अमेरिकेतच विक्री केला जाणार आहे. खरं पहायचे तर ई-सिम हे काही नवे नाही. कारण याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात नव्हता. पण आता कंपन्या ई-सिमची सुविधा देऊ लागली आहेत. येणाऱ्या दिवसात तुम्ही सुद्धा फिजिकली सिम कार्डसोबत ई-सिमचा सुद्धा वापर करु शकता.

ई-सिम कार्ड म्हणजे काय?
ई-सिम कार्ड म्हणजे इंबेडेड सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्युल. हे मोबाईल फोन, स्मार्टवॉच, टॅबलेट यामध्ये वापरले जाणारे एक प्रकारचे वर्च्युअल सिम असते. खास गोष्ट अशी की, हे फिजकल सिम कार्डपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. जर ई-सिम घेतल्यास तर तुम्हाला फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे कार्ड टाकावे लागत नाही. हे टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून ओवर-द-एअर अॅक्टिव्हेट केले जाते. यामध्ये ही सिम कार्ड सारखेच फिचर्स मिळतात.

कंपनी फोन बनवण्यावेळी ई-सिम (e-SIM) कार्ड तयार करतात. हे सिम फोनच्या हार्डवेअर मध्ये येत नाही. यामुळे फोनमध्ये स्पेस राहतो. त्याचसोबत वेगळ्या पद्धतीने सिम ट्रे बनवण्याची गरज ही लागत नाही. ही उत्तम गोष्ट आहे की, ई-सिम आणि फिजिकल सिम चे फंक्शनिंग हे काही वेगळे नाही. हे सिम सुद्धा ४जी, ५ जी नेटवर्कला सपोर्ट करते. या सेवेचा वापर करण्यासाठी फोनध्ये डुअल सिमची सुविधा असणे गरजेचे आहे. आता आयफोन फिजिकल सिमची सिस्टम बंद करणार आहे. तर दुसऱ्या कंपन्या सुद्धा हा विचार करु शकतात. देशात जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडियाचे ई-सिम कार्ड उपलब्ध करुन दिल जात आहेत.

ई-सिम कार्डचे फायदे
ई-सिम कार्डचे काही फायदे आहेत. त्याचसोबत एक गोष्ट अशी की, तुमचा ऑपरेटर बदलल्यानंतर ही सिम कार्ड बदलण्याची गरज भासत नाह. याच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क स्विच करणे अगदी सोप्पे होते. तुम्ही अस्थायी रुपात ते दुसऱ्या नेटवर्क मध्ये बदलू शकता. एकावेळी ई-सिमवर कमीतकमी पाच वर्च्युअल सिम कार्ड स्टोर केले जाऊ शकतात. म्हणजेच जर कोणत्याही एका सिग्नलवर समस्या येत असेल तर तुम्ही लगेच स्विच करु शकता.

प्रवास करतेवेळी स्थानिक नेटवर्कवर स्विच करणे सोप्पे होते. ई-सिम फिजिकल सिम कार्ड आणि ट्रे ची गरज भासू देत नाही. यामुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी याच्या जागी बॅटरीचा आकार वाढवतात अथवा अन्य फिचर्सच्या मदतीसाठी वापर करतात. भारतात सध्या काही स्मार्टफोन आहेत. जे ई-सिमला सपोर्ट करतात. यामध्ये अॅप्पल, सॅमसंग, गुगल, मोटोरोला.

हे देखील वाचा- तुम्हाला सुद्धा Google AI मुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? ‘या’ सेक्टरला बसू शकतो फटका

ई-सिम कार्डचे तोटे
ई-सिमला (e-SIM) लगेच स्विच करणे लगेच सोप्पे नाही. जर तुमच्या स्मार्टफोनने काम करणे बंद केले तर तुम्ही सहज सिम कार्ड काढू शकता आणि दुसऱ्या फोन मध्ये टाकू शकता. परंतु ई-सिम मध्ये हे थोड कठीण होते. दरम्यान, क्लाउडमध्ये माहिती आणि कॉन्टॅक्ट स्टोर करुन एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये डेटा ट्रांसफर करणे सोप्पे होते. एखाद्या डिवाइस मधून ई-सिम काढू शकत नाहीत. जर तुम्ही काही ट्रॅक करु पाहत असाल तर तसे करता येत नाही. त्यामुळे येथे नुकसान होऊ शकते. मात्र हा एक फायदा सुद्धा होतो की, फोन चोरी करणाऱ्या फोनचे लोकेशन अगदी सहज लपवता येऊ शकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.