Home » आधार कार्डवर स्वाक्षरी महत्वाची आहे का? जाणून घ्या UIDAI चे नियम

आधार कार्डवर स्वाक्षरी महत्वाची आहे का? जाणून घ्या UIDAI चे नियम

by Team Gajawaja
0 comment
e-Signature
Share

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. बँक खाते सुरु करणे ते इनकम टॅक्स भरण्यासाठी सुद्धा आधार कार्डची गरज भासते. या कार्डचा वापर आणखी काही गोष्टींसाठी केला जातो. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण म्हणजेच UIDAI नुसार, आधार कार्ड असणारा प्रत्येक व्यक्ती डिजिटल कॉपी ठेवू शकतो. आधार कार्डची डिजिटल कॉपी ही हार्ड कॉपी प्रमाणेच मान्य असते.(e-Signature)

जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतो तेव्हा आपल्याला ऑनलाईन स्वाक्षरी करावी लागते. अशातच काही लोकांना ई-स्वाक्षरी कशी करायची हे कळत नाही. आधारचा सर्वाधिक मोठा फायदा असा की, आधार ई-साइनचा फायदा देते. हे तुम्हाला वर्च्युअली स्वाक्षरी करण्याची संधी देते. आधार ई-स्वाक्षरी क्रिप्टोग्राफिकली डिझाइन केली जाते. ज्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार कमीच असते.

डिजिटल स्वाक्षरीची गरज का?
आधार कार्डवर डिजिटल स्वाक्षरी करणे फार गरजेचे आहे. कारण स्वाक्षरीशिवाय आधार कार्ड अधिकृतरित्या वापरता येत नाही. यामुळेच आपल्या आधार कार्डवरील डिजिटल स्वाक्षरी जरुर वेरिफाय करुन घ्या. ही स्वाक्षरी पूर्णपणे वॅलिड मानली जाते. आधार कार्डवरील डिजिटल स्वाक्षरी ही UIDAI द्वारे मान्य केलेली असते.

? या निशाण्याचा अर्थ काय
जर तुमच्या आधार कार्डवर ? हे निशाण असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्या डिजिटल आधार कार्डला मॅन्युअल पद्धतीने वॅलिड करावे लागेल. तुमच्या डिजिटल आधार कार्डवर स्वाक्षरी आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवरुन आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करावी लागेल. त्यानंतर पासवर्डच्या माध्यमातून तु्म्ही ती फाइल सुरु करु शकता. जेव्हा आधार कार्डवर दिलेल्या माहितीत वॅलिडिटी स्पेस दाखवावा लागेल.(e-Signature)

हेही वाचा- UAN क्रमांक विसरला असाल तर ‘या’ पद्धतीने शोधून काढा

डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?
-पासवर्डच्या माध्यमातून PDF कॉपी सुरु करा
-पीडीएफ फाइल सुरु झाल्यानंतर Validity Unkown आयकॉनवर क्लिक करा
-आता Vlidate Signature वर क्लिक करा
-त्यानंतर एक नवी विंडो सुरु होईल. येथे Signature Properties वर क्लिक करा
-आता Show Certificate वर क्लिक करा
-येथे तुम्हाला पहावे लागेल की, सर्टिफिकेशनमध्ये कुठे NIC sub CA for NIC 2011, National Informatics centre आहे की नाही.
-यावर मार्क करण्यासह Trust टॅबवर क्लिक करा. त्यानंतर Add to Trusted Identities चा ऑप्शन निवडा.
-त्यानंतर सिक्युरिटी प्रश्नाच्या विंडोवर OK चे बटण दाबा.
-आता वॅलिडेशन पूर्ण करण्यासाठी Validate Signature वर क्लिक करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.