गेल्या महिन्यात अमेरिकेत मॅकडोनाल्डचे हॅम्बर्गर खाल्यामुळे ई कोलाय नावाच्या विषाणूचा फैलाव झाला होता. यात काहींचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे मॅकडोनाल्ड सारख्या मोठ्या खाद्यकंपनीला आपले खाद्यपदार्थ बाजारातून मागे घ्यावे लागले होते. आता अमेरिकेत पुन्हा त्याच ई कोलाय जिवाणूचा फैलाव होताना दिसत आहे. यावेळी हा विषाणू गाजराच्या माध्यमातून अमेरिकेतील फूड मार्केटमध्ये फैलावला आहे. कॅलिफोर्निया राज्यातून आलेल्या एका मोठ्या फार्ममधील गाजरांमध्ये ई कोलाय या विषाणू आढळून आला आहे. हे गाजर खाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती खालावल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे अमेरिकेतील सर्वच सुपर मार्केटमधील गाजर हे टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय ज्या नागरिकांना घरामध्ये गाजर साठवले आहेत, त्यांनीही ते टाकून द्यावेत आणि फ्रिज किंवा ज्या जागेत गाजर साठवले होते, त्या जागेची काळजीपूर्वक स्वच्छता करावी अशा सूचना अमेरिकन सरकारनं दिल्या आहेत. (E. Coli In America)
अमेरिकेत सध्या सेंद्रिय शेती पद्धतीनं तयार झालेल्या गाजरांची दहशत पसरली आहे. अमेरिकेतील तब्बल 18 राज्यात या गाजरांमुळे ई कोलाय नावाच्या विषाणूचा फैलाव झाला आहे. हे विषाणू असलेले गाजर खाऊन काही व्यक्तींचा मृत्यू झाला असून 20 च्या आसपास नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामुळे अमेरिकन सरकारनं सर्वप्रकारच्या गाजरांना दुकानातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेत मॅकडोनाल्डचे हॅम्बर्गर खाल्ल्यानंतर डझनभर लोकांना ई कोलाय या विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर मॅकडोनाल्डला जबर नुकसान सहन करावे लागले होते. आता तोच विषाणू पुन्हा गाजराच्या माध्यमातून अमेरिकेत पसरला आहे.
ई कोलाय या विषाणूमुळे मानवी शरीरातील आतडे, मूत्रमार्गामध्ये संसर्ग होऊ शकतो. अनेकवेळा हा विषाणू आपल्या शरीरात असल्यावर त्याची जाणीव होत नाही. (International News)
त्यामुळे त्याचा शरीरात चांगलाच फैलाव होतो. त्यानंतर ताप, जुलाब, उलट्या यांचे प्रमाण वाढते. वेळीच या रुग्णांवर उपचार न केल्यास त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. कारण ई कोलाय विषाणू मानवी शरीरात गेल्यावर अनेकवेळा रक्तसह अतिसाराच्या घटनाही होतात. त्यामुळे थकवा येऊ शकतो, आणि यातच मृत्यू होण्याची शक्यता असते. ई कोलायमुळे किडनीलाही त्रास होऊन गंभीर आजार होण्याची शक्यता असते, यापासून वाचण्यासाठी रुग्णाच्या शरीरातील ई कोलाय विषाणूची वेळीच ओळख पटणे गरजेचे असते. अमेरिकेमध्ये ई कोलाय विषाणूचा दरवर्षी फैलाव होतो. दरवर्षी सुमारे 265,000 नागरिकांना ई कोलायचा संसर्ग झाल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. आताही अशाचप्रकारे अमेरिकेच्या 18 राज्यात ई कोलाय विषाणूचा शिरकाव झाला आहे. गाजर खाल्यामुळे हा विषाणू पसरला आहे. यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. संपूर्ण अमेरिकेतील स्टोअरमधून सेंद्रिय गाजर आणि बेबी गाजर परत मागवले आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने ग्रिमवे फार्म्सद्वारे मोठ्या सुपरमार्केटमध्ये विकल्या गेलेल्या गाजरांबाबत काळजी घेण्याची सूचना दिली आहे. (E. Coli In America)
======
हे देखील वाचा : माणसाने च्युइंगम चघळायला सुरुवात का केली ?
====
तसेच ज्या नागरिकांनी गाजर घरी साठवले आहेत, तो फ्रिज वा अन्य जागा ही गरम पाणी, साबणानं स्वच्छ करावी अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच यापैकी कुठलाही गाजर खाऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार कॅलिफोर्निया येथील ग्रिमवे फार्म्स कडून आलेल्या गाजरांमध्ये ई कोलाय नावाचा विषाणू प्रामुख्यानं आढळला आहे. या फार्मनं अमेरिकेसह कॅनडामध्येही गाजरांची विक्री केली आहे. आता ते सर्व गाजर परत मागवण्यात येत आहेत. ग्रिमवे फार्म्स मध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीतनं या गाजरांची शेती केली जाते. अशातूनही ई कोलाय नावाचा विषाणू त्यांच्यामध्ये कसा गेला, याचे परिक्षण करण्यात येणार आहे. ही कंपनी आपल्या शेती आणि कापणीच्या पद्धतींचा आढावा घेत असून शेतीचे तज्ञ आता त्याची पहाणी करत आहेत. पूर्वी ही कंपनी एका कुटुंबाच्या मालकीची होती. 2020 मध्ये, या शेती फार्मची विक्री एका कंपनीला करण्यात आली आहे. (International News)
सई बने