Home » ब्रिटनमध्ये ई सिगरेटचे वाढते व्यसन…

ब्रिटनमध्ये ई सिगरेटचे वाढते व्यसन…

by Team Gajawaja
0 comment
E Cigarette
Share

अवघ्या ब्रिटनमधील शाळांमध्ये ई सिगरेटचे (E Cigarette) व्यसन करणा-या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या या ई सिगरेटच्या व्यसनाची दखल थेट ब्रिटनच्या संसदेत घेण्यात आली आहे.  यावर पंतप्रथान ऋषी सुनक यांनी या ई सिगरेट (E Cigarette) कंपन्यावर कडक कारवाई करण्याची घोषणा केली आहे. यामुळे हे, ई सिगरेट प्रकरण काय आहे याची चर्चा सुरु झाली आहे. भारतात या ई सिगरेटवर यापूर्वीच निर्माला सितारमण यांनी बंदी घातली आहे. ई सिगरेटमध्ये असलेले द्रव, निकोटीन जळत नाही, त्यामुळे त्यातून धूर निघत नाही आणि सिगरेटसारखा वास येत नाही. ई सिगरेटमध्ये तंबाखूचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे त्यातून धूर निघत नाही. तरीही ई सिगरेट (E Cigarette) आरोग्यासाठी घातकच ठरते. विशेषतः तरुण मुलांमध्ये त्याचा वापर हा धोकादायक ठरु शकतो.  

ई सिगरेट (E Cigarette) या तंबाखूयुक्त सिगरेटपेक्षा कमी हानिकारक असतात, असे सांगितले जाते. त्यामुळे ज्यांना सिगरेटचे व्यसन आहे,  त्यांना सिगरेटपासून दूर करण्यासाठी ई सिगरेट विकली जाते. पण हे ही एक व्यसनच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा प्रकार आहे. ई सिगरेट हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम उपकरण आहे. ही बॅटरीवर चालणारी उपकरणे आहेत. शरीरात निकोटीन पोहोचवण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. तरुणांमध्ये ई-सिगारेटची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. सामान्य सिगरेट आणि ई सिगरेटमधील सर्वात मोठा फरक म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये तंबाखू नसतो. ई सिगरेट (E Cigarette) अगदी सामान्य सिगरेटप्रमाणेच बनवल्या जातात. मात्र त्याच्या शेवटी एलईडी बल्ब बसवण्यात आला आहे. श्वास घेतल्यानंतर हा बल्ब उजळतो तेव्हा ते सिगरेट तंबाखू जळत असल्याची भावना ई सिगरेट घेणा-याला होते. ही ई सिगरेट अनेक फ्लेवर्समध्ये येते. काहीवेळा तिची किंमत सामान्य सिगरेटपासून कमी असते. ई सिगरेटमध्ये लिक्विड निकोटीनचे काडतूस असते. काडतूस पूर्ण झाल्यावर त्याला बदलता येते. त्यामुळेच त्याची किंमत कमी असते. ई सिगरेट (E Cigarette) वापरण्यात येणारे लिक्विड निकोटीन गरम झाल्यावर वाफेत बदलते. म्हणूनच ई सिगरेट ओढणारे लोक धुराऐवजी वाफेचा श्वास घेतात. तंबाखूचा वापर होत नसला तरी ई सिगरेटचेही (E Cigarette) धोके अनेक आहेत. त्यातील निकोटीन हे मानवी शरीरासाठी हानीकारक ठरते. निकोटीन हृदय, यकृत आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक आहे.तसेच त्यामुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते. निकोटीन जास्त प्रमाणत शरीरात गेल्यास रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही जणांना आकडी येण्यासारखेही त्रास होण्याची शक्यता असते. ई सिगरेटमुळे (E Cigarette) सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचे कार्य बिघडते. त्यामुळे संपूर्ण पचनक्रियाही बिघडते.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ई सिगरेटचे मुख्य आकर्षण त्याची विविधता हे आहे. ई सिगरेट वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. हे फ्लेवर तरुणांना आकर्षित करतात.  त्यामुळे तरुण पिढी ई सिगरेटच्या व्यसनात अडकली आहे. याचा परिणाम म्हणजे, ई सिगरेट घेणा-या तरुणांची फुफ्फुसे कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे. त्यात एक सुखावणारी बातमी म्हणजे, ब्रिटनपूर्वीच भारतामध्ये या ई सिगरेटवर बंदी घातलेली आहे. भारत सरकारनं ई सिगरेटचे उत्पादन, वितरण, विक्री यावर बंदी घातली आहे. भारतातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये या सिगरेटबाबत आकर्षण वाढले होते. त्यामुळे सरकारनं वेळीच या सिगारेटवर बंदी घातली.   

आता अशीच बंदी ई सिगरेटवर (E Cigarette) ब्रिटनमध्ये घालण्याचा सुनक सरकारचा विचार आहे. सुनक यांनी यासाठी एका अहवालाचा हवाला दिला आहे. या अहवालात ई सिगरेटमध्ये  उच्च पातळीचे निकोटीन असते ज्यामुळे मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. 18 वर्षांखालील मुलांना ही ई सिगरेट विकणेही नियमाविरुद्ध असल्ये ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे.  

========

हे देखील वाचा : ‘या’ मंदिराच्या आकारात आहे नवे संसद भवन…

========

ई सिगरेटच्या (E Cigarette) कंपन्या ऑनलाईन विक्री करण्यावर भर देतात त्यामुळे ब्रिटनमध्ये त्यावरही बंदा घालण्याचा विचार सुरु आहे. 18 वर्षाखालील तरुणांना निकोटीन युक्त ई सिगरेट विकणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुनक यांनी दिला आहे. ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं याबाबत 2021 मध्ये एख आकडेवारी जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार, 11 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ टक्के लोक ई-सिगारेट किंवा वाफेचा वापर करतात,  2018 च्या तुलनेत ही वाढ सहा टक्क्यांनी अधिक झाली आहे. एकूण एक व्यसन सोडवण्यासाठी दुस-या व्यसनाला बळी पडू नये.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.