बहुतांश वेळा आपण वाहन चालवण्याच्या तंद्रीत असतो आणि आपले कधी ई-चलान कापले गेलेय हे कळतच नाही. तसेच जर तुम्ही वाहतूकीचे नियम मोडल्यास तुम्हाला मोठ्या दंड ही भरावा लागतो. मात्र सध्या वाहतूक पोलिसांकडून जर तुम्ही नियम मोडला तर ते तुम्हाला अडवत नाही, पण तुमच्या वाहनाचा फोटो काढतात. अशातच तुम्हाला ई-चलान तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल क्रमांकावर येते. सरकारकडून कॅमेरे आणि अन्य सेंसर्स सुद्धा वाहतूकीच्या मार्गांवर लावले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर चालकांना भुर्दंड भरावा लागतो.(E-challan payment)
ज्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने चलान कापले जाते त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करता येते. त्यासाठी अगदी काही सोप्प्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. त्याचसोबत तुम्हाला किती रुपयांचे चलान आले आहे, कोणत्या ठिकाणी चलान कापले किंवा कशासाठी कापले हे सुद्धा तपासून पाहण्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे पाहूयात ई-चलान भरण्यासाठी नक्की काय करावे.
हे देखील वाचा- बापरे! भविष्यात बुलेट ट्रेनने होणार चंद्राची सफर
ट्राफिक चलान ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तपासून पहाल
–https://echallan.parivahan.gov.in/ या वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागेल
-आता Get Challan Details वर क्लिक करा
-त्यानंतर तुम्हाला Challan Number, Vehicle Number, DL Number या पैकी एक काहीतरी निवडावे लागणार आहे.
-आता तुम्ही जो ऑप्शन निवडला आहेत त्या संबंधित काही माहिती विचारली जाईल ती द्या.
-कॅप्चा कोड भरुन Get Details वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर सर्व माहिती येईल. जर तुमचे चलान कापले गेले असेल तर तुम्हाला येथे पेमेंट करण्याचा ऑप्शन मिळेल.(E-challan payment)
ट्राफिक चलानचे पेमेंट कसे कराल?
आता चलान संदर्भातील सर्व माहिती मिळाल्यानंतर Pay now असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर तुम्ही टॅप करा.
-पेमेंटसाठी तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल. तो दिल्यानंतर वेरिफाय होईल.
-आता राज्याच्या ई-चलान वेबसाइट सुरु होईल.
-येथे तुम्हाला तुमच्या चलानचे पेमेंट करता येणार आहे. त्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करु शकता. तसेच इंटरनेट बँकिंगचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिला गेला आहे.
-आता तुमचे पेमेंट पूर्ण होईल.
तसेच सध्या वाहतूकीचे नियम अधिक कठोर करण्यात आल्याने चुकीच्या मार्गाने तुम्ही वाहन टाकल्यास थेट तुमच्यावर केस केली जाते. त्यानंतर कोर्टात ही तुम्हाला हजर रहावे लागते. त्याचसोबत वेळोवेळी ई-चलानचे पैसे न भरल्यास तुमचा परवाना ते वाहनाचे रजिस्ट्रेशन ही रद्द होण्याची शक्यता असते.