आज नवरात्राचा आठवा दिवस अर्थात अष्टमी. नवरात्रातील अष्टमीला मोठे महत्व आहे. या दिवशी देवीचे होम आणि कन्या पूजन केले जाते. या दोन्ही विधींना नवरात्रीमध्ये मोठे महत्व असते. आता आपण नवरात्रीच्या शेवटच्या समाप्तीजवळ आहोत. नवरात्राची समाप्ती म्हणजे दसरा किंवा विजयादशमी. साडे तीन मुहूर्तापैकी अतिशय महत्वाचा आणि मोठा मुहूर्त म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. या दिवशी महाराष्ट्रामध्ये घटाचे विसर्जन केले जाते आणि आपट्याची पाने वाटली जातात. तर देशात ठिकठिकाणी रावण दहन केले जाते. (Marathi News)
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा किंवा विजयादशमीचा सण साजरा केला जातो. दसऱ्याचा दिवस विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की दसरा आणि विजयादशमी या दोघांमध्ये फरक आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना…? हो आजवर आपल्याला हे दोन्ही शब्द एकच वाटत होते मात्र असे अजिबातच नाही. दसरा आणि विजयादशमीमध्ये फरक आहे. आता हा फरक कोणता ते जाणून घेऊया. (Top Marathi News)
याच दिवशी आदिशक्तीने महिषासुराचा वध केला. महिषासुर हा रंभासुराचा पुत्र होता, जो अत्यंत शक्तिशाली होता. याच महिषासुराने ब्रह्माची अतिशय कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येनंतर ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्याला म्हणाले ‘तू मृत्यू सोडून बाकी काहीही माग.’ यावर महिषासुराने खूप विचार केला आणि मग म्हणाला ‘ठीक आहे मला कोणताही देव, दानव आणि मानवापासून मृत्यू येऊ देऊ नका. मला फक्त कोणत्याही महिलेच्या हातून मृत्यू मिळू दे.’ हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने तिन्ही लोकावर आपला अधिकार गाजवात लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि तो तिन्ही लोकांचा राजा झाला. (Todays Marathi Headline)

हळूहळू त्याच्या वर्चस्वामुळे तिन्ही लोक हैराण झाले. म्हणूनच सर्व देवी देवतांनी महाशक्तीची पूजा केली. कारण महिषासुराने त्याचा वध स्त्री कडून व्हावा असेच वरदान मागितले होते. त्यामुळे या संकटातून आता आदिशक्ती देवीच आपली सुटका करु शकते हे त्यांना ज्ञात होता. देवतानाही आवाहन केल्यानंतर आणि पूजा केल्यानंतर त्यांच्या शरीरांतून एक दिव्य तेज उत्पन्न झाले आणि परम सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाली. ज्यानंतर हिमवनाने भगवतीच्या स्वारीसाठी सिंह दिला आणि सर्व देवांनी आपली शस्त्रे महादेवीच्या सेवेत सादर केली. (Latest Marathi News)
देवतांवर प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना लवकरच महिषासुराच्या भयापासून मुक्ती मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर आदिमाया आणि महिषासुर यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले. हे युद्ध ९ दिवस चालले. १० व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. त्याचा वध झाल्यामुळेच या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. महिषासुर हा एक असुर म्हणजेच दैत्य होता, मात्र तो राक्षस नव्हता. (Top Trending Headline)
या दिवसाचा आणि रामायणाचा देखील मोठा संबंध आहे. असे म्हटले जाते की, भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्ध बरेच दिवस चालले, शेवटी दशमीच्या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला. रावण हा असुर नव्हे तर राक्षस होता. ज्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे, महाभारतानुसार याच दिवशी अर्जुनाने कौरव सैन्यातील लाखो सैनिकांचा वध करून कौरवांचा पराभव केला, असेही सांगितले जाते. हा धर्माचा अधर्मावरील विजय होता. (Top Trending News)
=========
हे देखील वाचा :
Navratri : कन्या पूजन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Dussehra : जाणून घ्या दसऱ्याचा शुभ मुहूर्त आणि काळ
Navratri 2025 : उमरखाडी आई देवीचे विसर्जन न करण्याचा मंडळाचा निर्णय, पण का?
=========
एकूणच काय तर दसरा सण हा भगवान रामाने रावणाच्या वधाचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी रावणाचे पुतळे जाळले जातात आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. विजयादशमी म्हणजे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशीच साजरा केला जाणारा सण. देवी दुर्गाने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला. विजयादशमी म्हणजे “विजयाचा दहावा दिवस,” जो देवी दुर्गाच्या विजयाचे प्रतीक आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
