उद्या नवरात्राची शेवटची माळ असून, परवा सर्वत्र दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. सनातन धर्मामध्ये दसऱ्याला मोठे महत्व आहे. आपल्या पुराणानुसार या दिवशी रामाने रावणाचा वध करत सीता मातेची सुटका केली होती. रावण हा अतिशय बलाढ्य आणि प्रबळ राक्षस होता. ज्याने सीता मातेचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते. सीता मातेला सोडवण्यासाठी राम आणि रावणामध्ये मोठे युद्ध झाले आणि अखेर सत्याचा असत्यावर विजय झाला आणि रावणाचा अंत झाला. (Dussehra)
याबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. या शिवाय रावणाबद्दल देखील अनेक कथा ऐकिवात आहेत. रावण अतिशय हुशार आणि पराक्रमी योद्धा होता. वेदशास्त्रांचा जाणकार होता, एक महान पंडित आणि शिवाचा महान भक्त होता, रामायणातील महर्षी वाल्मिकी यांनी रावणाचे वर्णन केले आहे. रावण हा लंकेचा राजा होता, त्याला दशानन, लंकेश, लंकापती, दशग्रीव अशा अनेक नावांनी ओळखले जाते. तो अतिशय तेजस्वी होता. रावण एक कुशल सेनापती, शिस्तप्रिय आणि तेजस्वी योद्धा होता. (Marathi News)
आपल्या कार्यक्षम रणनीतीमुळे त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.आता रावण म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते दहा डोकं असलेली एक अतिशय भव्य आकृती येते. रावण म्हणजे त्याला दहा तोंड किंवा दहा डोकं असणारच. हेच तर त्याचे सरावात मोठे वैशिष्ट्य आणि ओळख होती. मात्र खरंच रावणाला दहा डोकं होती का? याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेऊया. वाल्मिकी रामायणानुसार रावणाचा जन्म दहा डोकी, मोठा दाढा, तांब्यासारखे ओठ आणि वीस हातांनी झाला होता. तो कोळशासारखा काळा होता आणि त्याच्या दहा ग्रीवांमुळे त्याच्या वडिलांनी त्याचे नाव ‘दशग्रीव’ ठेवले होते. त्यामुळे रावण दशनान नावाने प्रसिद्ध झाला. (Navratri)
काहींच्यामते, रावणाला १० डोकं नव्हती. पण लोक त्याला दशानन म्हणायचे त्यामुळे रावण त्याला १० डोकं असल्याचा भ्रम निर्माण करू शकत होता. जैन शास्त्रात उल्लेख केल्यानुसार, रावणाच्या गळ्यात मोठे असे नऊ गोलाकार मणी असायचे. त्या नऊ मण्यांमध्ये त्याचं डोकं दिसायचं ज्यामुळे त्याला १० डोकं असल्याचा भ्रम तयार झाला होता. तर काहींच्या मते रावणाला दहा डोकी नव्हती, त्याने फक्त १० डोकी असल्याचा भ्रम निर्माण केला, काही लोक म्हणतात की रावण हा असा एकच व्यक्ती होता जो ६ शास्त्रे आणि ४ वेद देखील जाणत होते, म्हणून त्याला १० मस्तकी होती, म्हणूनच त्याला दशानन, दशकंथी असेही म्हटले जाते. (Todays Marathi Headline)
रावणाची दहा मस्तकं असल्याचा उल्लेख रामचतरितमानस मध्ये आहे. तर कृष्णपक्षातील अमावस्येला तो युद्धासाठी गेला होता. तेव्हा एक-एक दिवस असे क्रमश: त्याचे एक-एक मस्तक कापले जात होते. अशा प्रकारे दहाव्या दिवशी अर्थात शुल्कपक्षाच्या दशमीला रावणाचा वध झाला. त्यामुळेच दशमीच्या दिवशी रावणाला दहन केले जाते. परंतु रामचरितमानसमध्ये असे वर्णन करण्यात आले आहे की, ज्या मस्तकाला राम आपल्या बाणाने उडवण्याचा प्रयत्न करायचे ते पुन्हा त्याच ठिकाणी दुसरे मस्तक निर्माण व्हायचे. एक अंग कापल्यानंतर पुन्हा कसे निर्माण व्हायचे? वस्तुत: रावणाची ही मस्तक कृ्त्रिम होती- आसुरी मायापासून निर्माण झाली होती. (Top Marathi Headline)
आपल्या धर्म ग्रंथातील माहितीनुसार रावणाची दहा डोकी हे वाईटाचे प्रतीक मानले गेले आहेत, या दहा डोक्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत, रावणाला दहा डोकी नसून त्याला दहा चेहरे होते असे म्हंटले जाते, त्या चेहऱ्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, घृणा, पक्षपात, अहंकार, व्यभिचार आणि धोखा अशी नावे देण्यात आली आहेत. आणि हे सर्व रावणात होते म्हणून त्याला असे नाव पडले, हे सर्व रावणाच्या १० डोक्याचे अर्थ आहेत. (Latest Marathi News)
रावणाच्या मस्तकाबद्दल एक आख्ययिका देखील प्रचलित आहे ती म्हणजे, “रावणाने ब्रह्मदेवाची अनेक वर्षे तीव्र तपश्चर्या केली होती. त्याच्या तपश्चर्येदरम्यान रावणाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचे १० वेळा शिर कापले. प्रत्येक वेळी जेव्हा त्याने आपले डोके कापले तेव्हा नवीन डोके यायचे, अशा प्रकारे तो आपली तपश्चर्या चालू ठेवू शकला. शेवटी रावणाच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी दहाव्या शिरच्छेदानंतर प्रकट होऊन, त्याला वरदान मागायला सांगितले. त्यावर रावणाने अमरत्वाचे वरदान मागितले पण ब्रह्मदेवाने हे वरदान देण्यास नकार दिला. पण त्या बदल्यात त्याला अमरत्वाची दिव्य शक्ती दिली, ती शक्ती त्याच्या नाभीखाली साठवली. (Top Trending News)
=========
Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण
Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?
=========
एका कथेमध्ये असे देखील सांगितले आहे की, रावण भगवान शंकराचा फार मोठा भक्त होता. पौराणिक कथांनुसार शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने काही वर्ष घोर तपस्या केली होती. मात्र त्यानंतरही भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले नाहीत. अशातच त्याने शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपले शीर कापून त्यांना दिले होते. रावण हे अहंकार, अनैतिकता, सत्ता आणि अधिकाराचा दुरुपयोग यांचे प्रतीक आहे. एवढेच नाही तर रावण हे देवापासून दूर जाण्याचे प्रतीक आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics