Home » Dussehra : जाणून घ्या दसऱ्याचा शुभ मुहूर्त आणि काळ

Dussehra : जाणून घ्या दसऱ्याचा शुभ मुहूर्त आणि काळ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

हिंदू धर्मामध्ये साडे तीन मुहूर्तांना अतिशय महत्व आहे. संपूर्ण वर्षभरात साडे तीन असे मुहूर्त आहेत, ज्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. या दिवसांचे महत्व एका वेगळ्याच पातळीवर असते. या साडे तीन मुहूर्तांमध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयदशमी अर्थात दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा अर्धा मुहूर्त असतात. यातलाच विजयदशमीचा अर्थात दसऱ्याचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसरा म्हणजे नवचैतन्याचा आणि आनंदाचा सण. (Navaratri)

वाईटावर चांगल्याच आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा. अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला दसऱ्याचा सण साजरा केला जातो. आपल्या धार्मिक पुराणानुसार दसऱ्याच्याच दिवशी भगवान श्रीरामांनी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाचा वध केला आणि माता सीताची सुटका केली. त्यानंतर बिभीषणाकडे लंका सोपवडत त्यांचा राज्याभिषेक केला. तर दुसरीकडे दसऱ्याचा दिवशी दुर्गा देवीने नऊ दिवसापासून महिषासुरासोबत चालू असलेल्या युद्धाचा त्याला ठार करत शेवट केला. असा हा दसऱ्याचा सण यावर्षी २ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. (Marathi News)

या वर्षी, दसरा २ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी रवि योग देखील निर्माण होत आहे, ज्यामुळे तो आणखी शुभ होतो. रवि योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत फायदेशीर मानला जातो, त्यामुळे हा दिवस पूजा, शस्त्रे पूजा, वाहने खरेदी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आदर्श आहे. दशमी तिथी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०२ वाजता सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:१० वाजता संपेल. या आधारे, दसरा (विजयादशमी) गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल. (Todays Marathi HEadline)

Dussehra

दसरा पूजा मुहूर्त
विजय मुहूर्त : दुपारी ०२:०२ ते ०२:५० पर्यंत
दुपारच्या पूजेची वेळ : ०१:१४ ते ०३:३७ पर्यंत

दसऱ्याच्या दिवशी देशभरात ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. वाईट प्रवत्तीचा नाश होऊन माणसामध्ये चांगली प्रवृत्ती येऊन रामराज्य यावे असा यामागचा उद्देश असतो. उत्तर भारतात, दसऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रामलीला आणि रावण दहन. या दिवशी, रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते, जे वाईटाचा अंत आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जर रावण दहन शुभ वेळी केले तर त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, दसऱ्याला शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, जी शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानली जाते. (Latest Marathi News)

यासोबचत दसऱ्याच्या दिवशी पाटी पूजनाला देखील मोठे महत्व आहे. अनेक घरांमध्ये सरस्वती काढून पुस्तकांची पूजा केली जाते. यासोबतच घरांमध्ये घटस्थापनेच्या दिवशी बसलेल्या घटांचे विसर्जन देखील दसऱ्याला केले जाते. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. पुरणाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो.सोबतच सार्वजानिक ठिकाणी बसवलेल्या देवींच्या मूर्तींचे देखील विसर्जन केले जाते. या दिवशीच नवरात्राची समाप्ती होते. नवग्रहांना नियंत्रित करण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते. याशिवाय, श्रीरामांची पूजा करणेही अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. (Top Trending News)

======

Navratri : दुर्गा देवी केवळ सिंहावरच आरुढ का आहे?

======

शिवाय महाराष्ट्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात. लोकं दसऱ्याला नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाचे प्रकल्प सुरू करतात. हा दिवस यश, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो, ज्यामुळे जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो. यादिवशी सोने खरेदी करण्याला देखील मोठे महत्व आहे. दसऱ्याला थोडेसे जरी सोने घेतली तरी त्याची कायम वृद्धी होते असा समज आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.