अमेरिकेतील येल विद्यापिठाचा समावेश जगातील अव्वल दर्जाच्या विद्यापिठात होतो. या येल विद्यापिठात शिक्षण घेण्याचे स्वप्न जगभरातील तमाम विद्यार्थ्यांचे असते. येल विद्यापिठ म्हणजे, उच्च शिक्षणाची तिसरी सर्वात जुनी संस्था आहे. या विद्यापिठाची स्थापना 1701 मध्ये करण्यात आली. मूलतः धर्मशास्त्र आणि भाषा शिकवण्यासाठी येलची स्थापना झाली. मात्र 1887 मध्ये येल विद्यापिठानं विस्तार केला. आता जगभरातील सर्व विद्यापिठात येल विद्यापिठ हे सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र या सर्वोच्च स्थानावर असलेल्या येल विद्यापिठाचा काळा इतिहास आहे. आणि त्यामागे भारतीयांचे केलेले शोषण आहे. या विद्यापीठाला जे येल नाव दिले आहे, ते नाव आहे, अलीहू येल यांचे.(Elihu Yale)
भारतावर जेव्हा इस्ट इंडिया कंपनीनं राज्य केले, तेव्हा हे अलीहू (Elihu Yale) महाशय भारतात या कंपनीतर्फे अधिकारी म्हणून आले होते. मद्रास राज्याचे ते प्रमुख होते. या काळात त्यांनी गुलामांचा व्यापार केला. अनेक भारतीयांना गुलाम म्हणून विकले. फारकाय अनेकांना फासावर लटकावले. भारतीयांना यातना देऊन अलीहू येल यांनी 800 पौंड अमेरिकेतील या विद्यापिठाच्या इमारतीसाठी पाठवले. या मदतीमुळे विद्यापिठाचे नाव येल ठेवण्यात आले. आता नावारुपाला आलेल्या या विद्यापिठाच्या स्थापनेमागे केलेले भारतीयांचे शोषण असल्याचे उघड झाल्यावर येल विद्यापिठानं याबाबत माफी मागितली आहे. भारतीयांना येल यांनी अनेक यातना दिल्या, त्यातून मिळवलेले पैसे त्यांनी विद्यापिठाच्या इमारतीसाठी पाठवले. मात्र याबाबत पूर्ण कल्पना नसल्यानं त्यांचे नाव विद्यापिठास देण्यात आले, याबाबत आपण भारतीयांची मनापासून माफी मागतो, असे पत्रक आता येल विद्यापिठातर्फे काढण्यात आले आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठि येल विद्यापीठाची इमारत ही भारतीयांच्या रक्तातून उभी राहिली आहे, याची माहिती पुढे आली आहे. अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यू हेवन शहरातील विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा पाया भारतीयांना गुलाम म्हणून विकून आलेल्या पैशामध्ये बांधण्यात आला आहे. भारतीयांना गुलाम म्हणून विकणा-या या अधिका-याचे नाव आहे, अलीहू येल(Elihu Yale). ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासचे विभागाचे प्रमुख म्हणू या अलीहू येल यांची नियुक्ती केली होती. येल हा अधिकारी अतिशय क्रूर होता. काही दिवसातच त्याच्या सोबत काम करणा-यांना त्याची कल्पना आली. मात्र इस्ट इंडिया कंपनीसाठी येल हे चांगले अधिकारी होते. कारण येल ईस्ट इंजिया कंपनीसाठी महसूल वसुलीचे काम चांगल्या पद्धतीनं करत असत, त्यासाठी त्यांनी मद्रास मधील नागरिकांवर अनेक अत्याचार केले होते.
येल किती अत्याचारी होता, याबाबत त्याची आठवण सांगण्यात येते, की, त्याच्या तबेल्यात काम करणारा एक मुलगा येलचा घोडा घेऊन बाहेर गेला. या गोष्टीचा राग येऊन येलनं त्या मुलाला पकडले आणि त्याला थेट फासावर लटकावले. मद्रासचा गव्हर्नर असताना येल यांनी मिळवलेल्या आपल्या कमाईचा एक भाग म्हणजे, 800 पौंड, अमेरिकेला पाठवले. त्याच पैशातून येल विद्यापीठाची इमारत उभी राहिली. ही माहिती समोर आल्यावर आम्हाला आमच्या या इतिहासाची लाज वाटते, असे येल विद्यापीठानं जाहीर केले आहे. येल यांनी पैसे दिल्यानंतर सुमारे तीन शतकांनंतर, विद्यापीठाने गुलामगिरीतून मिळालेले पैसे घेतल्याबद्दल माफी मागितली आहे.
यासंदर्भात येल विद्यापिठानं निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या विद्यापीठाची ऐतिहासिक भूमिका आणि गुलामगिरीशी संबंध असल्याचे मान्य करतो, तसेच आमच्या विद्यापीठाच्या संपूर्ण इतिहासात गुलाम बनलेल्या लोकांचे श्रम, अनुभव आणि योगदान ओळखतो. त्यांना झालेल्या यातनांबद्दल आम्ही दुःखी आहेत, असेही स्पष्ट केले आहे.
===========
हे देखील वाचा : पोलीस वेरिफिकेशननंतरही पासपोर्ट न आल्यास करा हे काम
===========
येल विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड ब्लाइट यांच्या ‘येल अँड स्लेव्हरी: अ हिस्ट्री’ या पुस्तकात येल यांनी मानवी गुलामगिरीला प्रोत्साहन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यापीठाने गुलामगिरीशी संबंधित इतिहास समजून घेण्यासाठी चौकशी सुरू केली. त्या चौकशीत येल हा 1672 मध्ये कारकून म्हणून भारतात आला. नंतर तो 1687 मध्ये मद्राससारख्या मोठ्या क्षेत्राचे गव्हर्नर झाला. 1680 च्या दशकात मद्रासमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्या काळात गुलामांच्या व्यापाराला झपाट्याने गती मिळाली. याचा फायदा येलने घेतला आणि शेकडो गुलाम विकत घेतले. त्यानंतर त्याला सेंट हेलेना येथे पाठवण्यात आले. येलने मानवी तस्करीतून भरपूर पैसा कमावला, हे स्पष्ट झाले आहे. तेच पैसे येलनं विद्यापीठाच्या इमारतीच्या फंडात पाठवले. अर्थातच येल विद्यापीठाप्रमाणेच अमेरिकेतील इतर अनेक प्रसिद्ध विद्यापीठांचा इतिहास गुलामगिरीशी जोडला गेला आहे. अलीकडच्या काळात, हार्वर्ड, प्रिन्स्टन आणि कोलंबियासारख्या विद्यापीठांनी गुलामगिरीशी त्यांचा संबंध असल्याचे मान्य केले आहे.
सई बने