Home » दुर्गापूजेत प्रसाद म्हणून दाखवलं जातं मच्छी- मटन?

दुर्गापूजेत प्रसाद म्हणून दाखवलं जातं मच्छी- मटन?

by Team Gajawaja
0 comment
Durga Pooja
Share

नवरात्र उत्सव सुरू आहे, म्हणून, रात्री ६ नंतर बाहेर पडलं तर चौकातून, गल्लीबोळातून गाण्यांचा आवाज येतो. गुजरातमध्ये सुरू झालेला हा सण आज भारतभर जल्लोषात साजरा केला जातो. तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो, परंतु संपूर्ण भारतात जसा साजरा होतो त्यापेक्षा थोडा वेगळ्या पध्दतीने पश्चिम बंगालच्या दुर्गापूजा आणि नवरात्रीमध्ये काय फरक आहे, दुर्गा पूजा कशी साजरी केली जाते, हे जाणून घेऊया. (Durga Pooja)

जास्त लोकांना हे माहिती नसेल, पण नवरात्रीत जशी देवीच्या ९ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते, तशी पश्चिम बंगालमध्ये पाच दिवस फक्त दुर्गा मातेचीच पूजा केली जाते. महाराष्ट्रात जसं गणपती बाप्पाला मंडळात घरांमध्ये सुंदर आणि विविध देखाव्यांमध्ये विराजमान केलं जातं, अगदी तसंच पश्चिम बंगालमध्ये दुर्गा मातेला भव्य दिव्य देखाव्यांमध्ये विराजमान केलं जातं. दुर्गा पूजा सुरू होण्याच्या अनेक कथा आहेत. १७५७ मध्ये जेव्हा बंगालच्या गंगेच्या काठावर प्लासी या ठिकाणी झालेल्या प्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने बंगालचा नवाब सिराज- उद- दौला याचा पराभव केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही लढाई रॉबर्ट क्लाइव्ह याच्या नेतृत्वाखाली जिंकली. इंग्रजांनी लढाई जिंकल्यानंतर त्यावेळी इंग्रजांचे वकील असणाऱ्या राजा नव कृष्णदेव यांनी रॉबर्ट क्लाइव्हसमोर दुर्गा मातेची भव्य पूजा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. रॉबर्ट क्लाइव्हनेही या प्रस्तावाला होकार दिला. त्याच साली दुर्गा पूजेच आयोजन करण्यात आलं. (Social News)

या पूजेसाठी संपूर्ण कोलकाता भव्यपणे सजवण्यात आलं होतं. हे भव्य आयोजनचा आंनद रॉबर्ट क्लाइव्हने हत्तीवर बसून लुटला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक कोलकात्यात आले होते. 1757 चा दुर्गापूजेचा कार्यक्रम पाहून बडे श्रीमंत जमीनदारही थक्क झाले. नंतरच्या काळात, बंगालमध्ये जमीनदारी व्यवस्थेच्या अस्तित्वात येतानाही, त्या काळातील श्रीमंत जमीनदारांनी आपल्या शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी दरवर्षी भव्य दुर्गापूजेचं आयोजन करण्यास सुरुवात केली. दुर्गापूजा पाहण्यासाठी लोकं खेड्यापाड्यातून सुद्धा येतं होते. हळूहळू, दुर्गापूजा इतकी लोकप्रिय झाली की, ती सर्वत्र साजरी होऊ लागली. (Durga Pooja)

आणखी एक कथा अशी सांगितली जाते की, नवव्या शतकात बंगालमधील रघुनंदन भट्टाचार्य नावाच्या विद्वानाने प्रथम दुर्गापूजेचं आयोजन केल्याचा उल्लेख आहे. दुसर्‍या एका कथेनुसार, बंगालमध्ये प्रथमच दुर्गापूजेचे आयोजन ताहिरपूरच्या जमीनदार नारायण यांनी कुल्लक भट्ट नावाच्या पंडिताच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं. हा सोहळा निव्वळ कौटुंबिक होता. १७५७ नंतर १७९० मध्ये बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गुप्ती पाड्यात राजे, जहागीरदार आणि जमीनदारांनी पहिल्यांदा सार्वजनिक दुर्गापूजेचे आयोजन केले होते. यानंतर दुर्गापूजा सर्वसामान्यांच्या जीवनातही लोकप्रिय झाली आणि ती मोठ्या थाटात साजरी करण्याची परंपरा बनली. पुढे स्वातंत्र्यलढा सुरू झाल्यावर हा पूजा मंडप प्रबोधनाचे केंद्र बनला. (Social News)

दुर्गा पूजा सुरू होण्याच्या कथा अनेक आहेत. पण नवरात्री सारखचं देवीच्या शक्ती रुपाची पूजा करण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा केला जातो. दुर्गा पूजेसाठी तयार केलेली मूर्ती नवरात्र सुरु होण्याच्या एक आठवडा आधी दुर्गा मातेची मूर्ती तयार करून रंगवली जाते पण मातेच्या डोळ्यांना रंग दिला जात नाही. महालय अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृ पक्षाचा शेवटच्या दिवशी, दुर्गामातेची विधीवत पूजा करून तिला पृथ्वीवर येण्याचे आमंत्रण दिलं जातं. त्याच दिवशी शुभ मुहुर्तावर मूर्तीवर डोळे साकारले जातात. या शुभ विधीला चोखूदान म्हणजेच नेत्रदान असं म्हणतात. देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर विजयादशमीला बंगाली स्त्रिया पांढरी साडी नेसून उलू ध्वनीचा उच्चार करतात, ज्याला अत्यंत शुभ मानलं जातं. याच दिवशी स्त्रीया सिंदूराने होळी सुद्धा खेळतात. माहेरी आलेली माता दुर्गा पुन्हा सासरी जाणार असते. तेव्हा देवीच्या डोक्याला सिंदूर लावलं जातं. या विधीला सिंदूर उत्सव म्हटलं जातं. (Durga Pooja)

======

हे देखील वाचा :  बंगाली दुर्गा पूजेची माहिती

======

दुर्गामातेचा निरोप घेताना तिला वाटेत भूक तहान लागू नये म्हणून तिच्यासोबत खाण्या-पिण्याचे पदार्थ दिले जातात. त्याची एक पोटली तयार केली जाते, तसेच मातेसोबत श्रृंगाराच्या वस्तूही दिल्याही जातात. या प्रथेला “बोरन” असे म्हणतात. नवरात्रीत भक्त जसे ९ दिवस श्रद्धेने उपवास ठेवतात. तर दुर्गा पूजेच्या वेळेस बंगालमध्ये नॉन वेज खाणं एक प्रथा आहे. दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा मातेला अनेक प्राण्यांचा बळी दिला जातो. नंतर ते शिजवून प्रसाद म्हणून खालं जातं. हे सर्व श्रद्धे पोटी आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. भारतात एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या परंपरा आणि प्रथेनुसार साजरा केला जातो. फरक फक्त पद्धतीचा असेल पण भक्ती आणि सणांचा आनंद हा सर्वत्र सारखाच आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.