Home » दुबईच्या विमानतळावर ‘या’ गोष्टी घेऊन जाण्यास बंदी

दुबईच्या विमानतळावर ‘या’ गोष्टी घेऊन जाण्यास बंदी

by Team Gajawaja
0 comment
Dubai Airport Rules
Share

विमान प्रवास करणे कोणाला आवडत नसेल? हवेत उड्डाण करणे आणि विविध अनुभव घेणे प्रत्येकालाच आवडते. खासकरुन अशा व्यक्तींना जे पहिल्यांदाच विमानात बसतात. दरम्यान, जी लोक विमानातून बहुतांश वेळा प्रवास करतात त्यांना विमानतळासंदर्भातील नियम माहिती असतात. असे नियम ज्यामध्ये तुम्ही किती सामान तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता, कोणत्या वस्तूंवर बंदी आहे अशा विविध गोष्टी. मात्र जर तुम्ही पहिल्यांदाच विमानातून दुबईचा प्रवास करत असाल तर काही गोष्टी मात्र जरुर लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. (Dubai Airport Rules)

दुबाईच्या विमानतळावर हजारोंच्या संख्येने विमानांचे उड्डाण होत असते आणि टेकऑफ होते. फ्लाइटच्या सिक्युरिटी चेकिंग संदर्भात असे काही नियम असतात जे तुम्हाला सांगतात की, अखेर तुम्ही योग्य पद्धतीने कशाप्रकारे प्रवास करु शकता. कोणत्या गोष्टींसाठी विमानात नेण्यास बंदी आहे. परंतु तरीही काही लोक अशा गोष्टी आपल्या सोबत ठेवतात. ज्यामुळे त्यांना विमानतळावर समस्या उद्भवून देतात.

खाद्यपदार्थ
हे तुम्हाला ऐकून थोडे विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. कारण दुबईतील विमानतळावर असे काही खाद्यपदार्थ आहेत जे घेऊन जाण्यास परवानगी नाही. या गोष्टींमध्ये हर्बल, तंबाखू, खसखस, अफीमच्या बिया, पावडर, काही औषधी वनस्पती. त्याचसोबत ज्यामध्ये अळसीच्या बिया असलेले पदार्थ ही सोबत घेऊन जाता येत नाहीत. फ्लाइटमधअये कॅन्ड फूड्सला ही परवानगी नाही. हे फूड्स सील पॅक असतील तर स्क्रिनिंग दरम्यान ते बाजूला काढले जातात.

इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी
तुम्हाला ऐकून हैराण व्हायला होईल की, काही अशा इलेक्ट्रिक गोष्ट आहेत ज्या फ्लाइटमध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे. यामध्ये नॉन-स्पिलेबल बॅटरी असणारे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स उपकरण, बॅटरी सुद्धा घेऊन जाता येत नाही. या नियमाअंतर्गत १२ वोल्ट पेक्षा अधिक वोल्टेज असलेली बॅटरी चालत नाही. तसेच वॅट तासांची रेटिंग १०० वॅट तासांपेक्षा अधिक नसावी. अधिकाधिक २ अतिरिक्त बॅटरी तुम्हाला सोबत घेऊन जाता येते.

हे देखील वाचा- हैदराबाद मध्ये शॉपिंगसाठी बेस्ट आहेत ‘हे’ मार्केट्स

धारधार वस्तू
हे सर्वात सामान्य असून आपल्या सर्वांना याबद्दल आधीच सांगितले जाते. तरीही सुई, ज्योमेट्री बॉक्सचे कंपास किंवा ब्युटी किटमध्ये नेलकटर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त जर तुमच्या कपड्याला पिन लावला असेल तरीही तो विमानात काढून टाकण्यास सांगितला जातो.(Dubai Airport Rules)

हे सुद्धा जाणून घ्या
अश्लील कपडे घालून तुम्ही फ्लाइटमध्ये जाऊ शकत नाहीत. फ्लाइटमध्ये स्टाफसोबत उद्धटपणे वागू शकत नाहीत. तसेच सिगरेट पिणे सुद्धा विमानात चालत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.