आपल्या सर्वांनाच आवड असते फोटोची. आपल्या अनेक आठवणी या सर्व फोटो मध्ये कैद केले जातात.काहींना स्वतःचा फोटो पहायची आवड तर काहींना फोटो काढायची. अनेक जण फोटोसाठी मोबाईलचा वापर करतात तर काही प्रोफेशनल लोक डीएसएलआर कॅमेरा चा वापर करतात. मात्र या डीएसएलआरचे फायदे तोटे काय हे माहित आहे का तुम्हाला. नसेल महिती तर ही बातमी तुमच्या साठी आहे. नक्की वाचा ही बातमी.
डीएसएलआरचे फायदे:-
उत्तम इमेज क्वालिटी :- उत्तम इमेज सेन्सर आणि मेगा पिक्सल यामुळे डीएसएलआर कॅम्स नेहमीच छान रिझल्ट देतात. हल्लीच्या डीएसएलआरमध्ये एचडी फोटो व्हिडीओजचा ऑप्शन तर असतोच शिवाय इतर आधुनिक फीचर्समुळे तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो मिळतात जे पॉईंट टू शूटमध्ये मिळतीलच असं नाही.
लो लाइट सेन्सिटीव :- कमी प्रकाशात काही वेळा फोटो काढण्यास अडचणी येतात, परंतु डीएसएलआर कॅम्सच्या लो लाइट सेन्सिटीव टेक्नोलॉजीमुळे सुरेख फोटोज काढता येतात.
शटर स्पीड आणि फोकस स्पीड:- एखादा छोट्यात छोटा किडा असो वा उडणारं फुलपाखरू डीएसएलआरच्या उत्तम फोकस स्पीडमुळे ते चटकन टिपले जातात आणि आपल्याला कमीतकमी वेळात छान फोटोज मिळू शकतात.
उत्तम गुंतवणूक:- तुम्ही असा कॅमेरा शोधत असाल, जो ७-८ वर्षं टिकेल आणि नंतर अपग्रेडसुद्धा करता येईल, तर त्यासाठी डीएसएलआर हा उत्तम पर्याय आहे. लेन्स किट आणि बाय बॅक यामुळे डीएसएलआरला आयुष्य जास्त असतं , शिवाय त्यामध्ये तुम्हाला पर्यायही वेगवेगळे उपलब्ध होतात.
मजबूत आणि टिकाऊ :- डीएसएलआर कॅम्सची लाइफ मोठी असते, तसंच उत्तम प्रकारे डेव्हलप केल्यामुळे हे कॅम्स सर्व प्रकारच्या हवामानात साथ देतात आणि छान रिझल्टसही देतात.
इंटरचेंजेबल लेन्स :- डीएसएलआरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लेन्स. आपल्या बजेटप्रमाणे आणि गरजेप्रमाणे या लेन्स उपलब्ध असतात आणि अपग्रेडेशनच्या दृष्टीने हे फीचर फायद्याचं ठरतं.
डीएसएलआरचे तोटे :
हाय प्राइज टॅग :- आपल्याला नुसतीच आवड म्हणून कॅमेरा घ्यायचा असेल आणि त्यातही बजेट हा ऑप्शन असेल, तर डीएसएलआर हा पर्याय योग्य ठरत नाही. याला कारण म्हणजे लेन्स किट आणि कॅमेरा या सगळ्यामुळे कॅमेऱ्याची किंमत वाढते.
किचकट ऑपरेशन्स :- डीएसएलआरमध्ये जरी अनेक फीचर्स असले, तरी वापरण्यास डीएसएलआर अत्यंत किचकट आहे. सामान्य माणसाला किंवा लहान मुलांना वापरायला देण्यास तो योग्य नाही.
हाय मेंटनन्स :- डीएसएलआर कॅम्सचा वापर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं करावा लागतो. काही वेळा सेन्सर खराब होतो, लेन्सवर धूळ साचते, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. डीएसएलआर कॅम्सच्या दुरुस्तीचा खर्चसुद्धा खूप जास्त येतो.
आकारमान आणि वजन :- डीएसएलआर कॅम्स वजनाने जड असतात. त्यांना लेन्ससुद्धा वेगळ्या कॅरी कराव्या लागत असल्यामुळे सामानात वाढ होते. एकूणच डीएसएलआर कॅम्स आकारानेही मोठे असल्यामुळे ते अधिक जागादेखील व्यापतात.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच कॅमेरा निवडा
Happy Clicking
डीएसएलआरचे फायदे आणि तोटे माहित आहे का तुम्हाला?
62
previous post