Home » उन्हाळ्यात कोरड्या ओठांच्या समस्येसाठी फॉलो करा या 3 टिप्स

उन्हाळ्यात कोरड्या ओठांच्या समस्येसाठी फॉलो करा या 3 टिप्स

by Team Gajawaja
0 comment
Dry Lips
Share

Dry Lips Care in Summer : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसह केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खरंतर, उन्हाळ्यात ओठांचीही काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यातील उन्हामुळे याचा परिणाम ओठांवर होऊ शकतो. यामुळे ओठांचीही उन्हाळ्यात काळजी घ्यावी. अशातच उन्हाळ्यात फाटलेल्या ओठांच्या समस्येचा सामना करत असाल तर पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.

रात्री ओठांवर नारळाचा तेल लावा
कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. नारळाच्या तेलात काही नैसर्गिक गुण असून त्याचा फायदा तुम्हाला कोरड्या ओठांपासून दूर राहण्यास होईल. नारळाचे तेल रात्री झोपण्या पूर्वी ओठांना लावून ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर ओठ स्वच्छ पाण्याने तेल धुवा. यामुळे ओठ मऊसर होण्यास मदत होईल.

Lip Care

लिप बामचा करा वापर
फाटलेल्या आणि कोरड्या ओठ्यांच्या समस्येसाठी लिप बामचा वापर करा. यामुळे ओळ ओलसर राहण्यास मदत होईल. याशिवाय फाटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम ओठांना लावू शकता. SPF युक्त लिप बामचा वापर करा. यामुळे ओठांची त्वचा हानिकारक किरणांपासून दूर राहिल.(Dry Lips Care in Summer)

=======================================================================================================

हेही वाचा : 

ब्यूटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, खुलेल सौंदर्य

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा असा करा वापर

=======================================================================================================

मधाचा करा वापर
मधाला नॅच्युरल मॉइश्चराइजर म्हटले जाते. यामुळे मध केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. कोरड्या ओठांच्या लिप्ससाठी मधाचा वापर करू शकता. रात्री झोण्यापूर्वी किंवा सकाळी मध ओठांना लावून ठेवा. यानंतर मध सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे मध मऊसर होण्यास मदत होईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.