एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन परवानगा ट्रांन्सफर करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. जर तुम्हाला सुद्धा वाहन परवाना ट्रांसफर करायचा असल्यास काही कागदपत्रांची आवश्यकता भासते. ही प्रक्रिया राज्य आणि ड्रायविंग लायसेन्स कोणत्या प्रकारचे आहे हे निर्भर करते. सर्वसामान्यपणे वाहन परवाना दोन प्रकारचे असतात. एक खासगी आणि कमर्शियल. अशातच ड्रायविंग लायसेन्स ट्रांसफर करण्यासाठी सर्वसामान्य काय प्रोसेस आहे हे जाणून घेऊयात. (Driving License Transfer)
सर्वात प्रथम तुम्हाला मूळ राज्यातून नो ऑब्जेक्शन सर्किफिकेट घ्यावे लागणार आहे. हे एनओसी रिजनल ट्रांसपोर्ट ऑफिस म्हणजेच आरटीओ किंवा ज्या राज्यातून वाहन परवाना मिळाला आहे तेथे मिळेल. या एनओसीचा अर्थ असा होतो की, दुसऱ्या राज्यात वाहन परवाना ट्रांसफर करण्यासाठी संबंधित राज्यात कोणतीही आपत्ती नाही.
वाहन परवाना ट्रांसफर करण्यासाठीची महत्वाची कागदपत्र
-वाहन परवाना ट्रांन्सफर करण्यासाठी परिवहनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. संबंधित आरटीओची निवड करा आणि तेथे डीएळ ट्रांसफरसाठी अर्ज करा
-मूळ राज्याकडून जारी करण्यात आलेल्या वाहन परवानाला तुमच्याजवळ ठेवा
-वॅलिड अॅड्रेस प्रुफ जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट, लाईट बील
-वॅलिड एज प्रुफ जसे की, जन्मदाखला, स्कूल सर्टिफिकेट किंव पासपोर्ट
-ओरिजनल स्टेटसाठी आरटीओकडून जारी करण्यात आलेली एनओसी
-चार ते सहा पासपोर्ट आकाराचे फोटो
-ज्या राज्यासाठी परवाना ट्रांसफर करत आहात तेथील आरटीओच्या आवश्यकेनुसार कागदपत्र
अर्जाचा फॉर्म आणि कागदपत्र जमा करा
आता नव्या राज्यात आरटीओ मध्ये जाऊन अर्जाचा फॉर्म आणि महत्वाची कागदपत्र सबमिट करा. जो काही शुल्क आहे त्याचे पेमेंट करा. हा शुल्क वाहन परवानावर अवलंबून असतो. जर गरज असेल तर ड्रायविंग टेस्ट द्या, खरंतर कधीकधी डेस्टिनेशन राज्या ड्राइविंह टेस्टची मागणी करु शकते.(Driving License Transfer)
हेही वाचा: PAN Card च्या प्रत्येक क्रमांकामागे लपलीय तुमच्या बद्दलची माहिती
जर सर्वकाही ठीक असेल तर अर्ज स्विकारला जाईल. त्यानंतर ट्रांसफर झालेला वाहन परवाना जारी केला जाईल. या परवानावर सुद्धा तुमचा जुना वाहन परवाना क्रमांक असेल. जसे आधी सांगितले होते की, राज्यानुसार प्रत्येक वाहन परवानाच्या ट्रांसफरसाठी वेगवेगळे नियम आणि अटी आहेत. या संबंधित अधिक माहिती तुम्हाला आरटीओ मध्ये मिळू शकते. तर प्रत्येकवेळी जेथे कुठे ही तुम्ही वाहन चालवत असाल त्यावेळी वाहन परवाना सोबत ठेवणे फार गरजेचे असते. अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.