जर तुम्हाला वाहन परवाना काढायचा असेल पण त्यासाठी घेतली जाणारी टेस्ट तुम्ही पास होत नसाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला वाहन परवाना मिळण्यासाठी कोणतीही टेस्ट द्यावी लागणार नाही. त्याचसोबत तुम्हाला वाहनाचा परवाना फक्त ७ दिवसात मिळणार आहे. हे तुम्ही घरबसल्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने परवानासाठी अर्ज करु शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला परवानाशिवाय पकडले तर दंड भरावा लागेल याची सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. (Driving License)
१८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांनाच मिळेल फक्त लर्निंग परवाना
हजारोल लोक प्रत्येक महिन्याला वाहन परवानासाठी अर्ज करतात. मात्र बहुतांश लोक ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होतात आणि त्यामुळे त्यांना परवाना दिला जात नाही. वाहन परवाना बनवण्यासंदर्भातील नियमात कधीकधी बदल केला जातो. मोटर व्हिकल अॅक्ट नियमाअंतर्गत १६ ते १८ वर्षामधील कोणत्याही व्यक्तीला परवाना तयार करु शकतो. मात्र केवळ लर्निंग परवानाच दिला जाईल. हा परवाना मिळाल्यानंतर व्यक्ती केवळ गियर शिवाय ड्रायव्हिंग करु शकतो. जर तुम्ही गियर असणारे वाहन चालवत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग परवाना काढावा लागेल.

तुम्हाला हा परवाना बनवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही आरामात घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांमध्ये त्यासाठी अर्ज करु शकता.
एकदा चाचणी पास केल्यानंतर तुम्हाला अगदी सहज ड्रायव्हिंग परवाना मिळू शकतो. मात्र परवाना घेण्यासाठी तुमचे वय १८ वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. तुम्ही घराच्या पत्त्यावर आणि वयाचा दाखला दिल्यानंतर तुम्ही सहज ड्रायव्हिंग परवाना मिळू शकतो. १८ वर्षापेक्षा कमी वय झाल्यानंतर व्यक्तीला लर्निंग परवाना ठेवता येत नाही. (Driving License)
हे देखील वाचा- Fake Reviews करणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नव्या नियमांअंतर्गत होणार कारवाई
ड्रायव्हिंग परवाना काढण्यासाठी अर्ज करताना या स्टेप्स फॉलो करा
-ड्रायव्हिंग परवानासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
-येथे तुम्हाला ड्रायव्हिंग परवानासाठी अर्ज करण्याचा ऑप्शन दिसून येईल. येथे तुम्हाला जायचे आहे.
-आता सर्व कागदपत्र द्यावी लागतील आणि त्यानंतर आरटीओ ते तपासून पाहतील.
-कागदपत्र क्लियर झाल्यानंतर तुम्हाला सात दिवसांच्या आतमध्ये ड्रायव्हिंग परवाना मिळणार आहे.
-लक्षात असू द्या की, चाचणीशिवाय तुम्हाला फक्त लर्निंग परवानाच मिळू शकतो.