Home » पोटफुगीच्या समस्येवर प्या हे 5 ड्रिंक्स

पोटफुगीच्या समस्येवर प्या हे 5 ड्रिंक्स

पोटफुगीच्या समस्येमुळे बहुतांशजण बैचेन राहतात. काहीवेळेस पोटफुगीमुळे डोकेदुखी आणि अन्य समस्याही उद्भवू शकतात. यावर कोणते ड्रिंक्स पिऊ शकता याबद्दल जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Health Care During Holi
Share

Drinks to Control Bloating : काहीजणांना खाल्ल्यानंतर पोटफुगीची समस्या उद्भवते. नेहमीच पोट भरलेले वाटते आणि काहीही खावेसे वाटत नाही. याच कारणास्तव अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. ही समस्या खूपवेळ उपाशी राहणे, तेलकट, मसालेदार पदार्थ निर्माण होते. पोटफुगण्याच्या समस्येमुळे काहींना बैचेनही वाटते. याशिवाय डोकेदुखी आणि अन्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटफुगीच्या समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे. अशातच पोटफुगीच्या समस्येवर कोणते ड्रिंक्स प्यावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

लिंबू पाणी
लिंबू पाणी पोटाच्या प्रत्येक समस्येसाठी वरदान आहे. लिंबात साइट्रिक अॅसिड असल्याने पोटासाठी ते फायदेशीर ठरते. तुम्ही ब्लोटिंगच्या समस्येचा सामना करत असल्यास दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्या.

जल जीरा
जीऱ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे गॅस आणि पोटासंबंधित अन्य समस्या दूर राहू शकतात. दररोज एक ग्लास जल जीरा प्यायल्याने तुम्ही अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा पोटफुगीची समस्या दूर होऊ शकते.

अॅप्पल सायडर व्हिनेगर
पोटातील अॅसिडचा स्तर वाढला गेल्यास अॅसिडिटी आणि पोटफुगीची समस्या होऊ लागते. अशातच दररोज अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यातून प्यावे. यामुळे शरिरातील अॅसिडचा स्तर संतुलित होते.

आल्याची चहा
आलं पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. यामुळे गॅस आणि पोटफुगीची समस्या कमी होण्यास मदत होते. आल्याची चहा किंवा पाणी प्यायल्याने पोटफुगीची समस्या कमी होऊ शकते. पण आल्याच्या चहामध्ये दूध मिक्स करू नका. (Drinks to Control Bloating)

बदामाचे दूध
बदामाच्या दूधात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. यामध्ये लॅक्टोज आणि कोलेस्ट्रॉल नसते. याशिवाय बदामाच्या दूधात व्हिटॅमिन ए, डी, प्रोटीन, ओमेगा-6,कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशियमसारखे गुणधर्म असतात. बदामाचे दूध पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते.


आणखी वाचा :
ढेकर येण्यावर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
बद्धकोष्ठता ते पचनासंदर्भातील समस्यांवर रामबाण उपाय जायफळ

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.