सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सूद हे सौदीमध्ये अनेक आधुनिक सुविधा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. 2017 मध्ये क्राउन प्रिन्स म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून, मोहम्मद यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची मालिका सुरू केली आहे. यामध्ये महिलांचे अधिकार, सौदी व्हिजन 2030, तंत्रज्ञान आणि पर्यटनासह बिगर तेल क्षेत्रातील गुंतवणूक यांचा समावेश आहे. प्रिन्स मोहम्मद हे विशेष करुन पर्यटनासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. (Dream of the Desert)
परदेशातील नागरिक सौदीमध्ये पर्यटनानिमित्त येण्यासाठी त्यांनी बहुउद्देशीय प्रकल्प केले आहेत. यातूनच सौदीमध्ये आधुनिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. आता याच सौदीमध्ये पर्यटनाची राणी सुरु होत आहे. या राणीचे नाव आहे, ड्रीम ऑफ द डेजर्ट. सौदीच्या वाळवंटी भागातून धावणारी ही ट्रेन म्हणजे, सौदीच्या राजेशाही थाटाचे प्रतिक असणार आहे. लवकरच या ट्रेनसाठी बुकींग सुरु होणार असून या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी देशातील आणि परदेशातील अनेक नागरिक उत्सुक आहेत. या ड्रीम ऑफ द डेजर्टमधून सौदीतील पर्यटन स्थळांना एकाचवेळी बघण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
सौदीची पहिली लक्झरी ट्रेन ‘ड्रीम ऑफ द डेझर्ट‘ धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या ड्रीम ऑफ द डेजर्टची उत्सुकता सौदी अरेबियासह परदेशातील नागरिकांनाही आहे. कारण या ट्रेनमधील सुखसोयींची चर्चा आत्तापासूनच सुरु झाली आहे. या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग 2024 च्या अखेरीस सुरू होणार आहे. या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी अनेक मान्यवर उत्सुक आहेत. सौदीची ही ट्रेन ‘व्हेनिस सिम्पलॉन-ओरिएंट-एक्स्प्रेस आणि रॉयल स्कॉट्समन‘ सारख्या क्लासिक ट्रेनला टक्कर देणार आहे. (Dream of the Desert)
त्यामुळेच मध्यपूर्वेतील या पहिल्या लक्झरी ट्रेनला ड्रीम ऑफ द डेझर्ट असे नाव देण्यात आले आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद यांच्या स्वप्नातील ट्रेन असेही या ट्रेनची वर्णन करण्यात येत आहे. प्रिन्स मोहम्मद यांनी स्वतः या ट्रेनमध्ये अनेक सुधारणा सुचवून त्या करुन घेतल्या आहेत. त्यामुळेच ही ट्रेन सुरु होण्यापूर्वीच ‘ड्रीम ऑफ द डेझर्ट‘ लक्झरी ट्रेनसारखे आणखी रेल्वे सुरु करावी अशी मागणी आता सौदीमध्ये करण्यात येत आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सातत्याने देशातील पर्यटनाला चालना देत आहेत. त्यांनी अशाच प्रकारच्या रॉयल ट्रेन अन्य भागातही सुरु कराव्यात अशी मागणी आत्ता सुरु झाली आहे.
‘ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेन‘ मधून प्रवास करणारे प्रवासी या गाडीतील आधुनिक सुविधांनी आश्चर्यचकीत होणार आहेत. संपूर्ण लक्झरी सेवांनी सुसज्ज असलेली ही ट्रेन सौदी अरेबियाची राजधानी रियाधपासून जॉर्डनच्या सीमेपर्यंत 800 मैलांचे अंतर पार करणार आहे. अल कुरयतमध्ये या गाडीचा प्रवास संपणार आहे. या दरम्यान प्रवाशांना प्रवासादरम्यान येणा-या पर्यटन स्थळांची सफर घडवण्यात येणार आहे. शिवाय या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी अनेक चवदार पदार्थांची मेजवानीही देण्यात येणार आहे. ज्या भागातून ही ट्रेन जाईल त्या भागात अनेक सुंदर शहरे आहेत. त्यांची संपूर्ण माहिती प्रवाशांना देण्यात येणार आहे. सुमारे 1300 किलोमीटरच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान, विस्तीर्ण वाळवंट आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा असलेल्या पुरातत्व स्थळांचे दर्शनही प्रवाशांना होणार आहे.
=============
हे देखील वाचा : देवनार वृक्षांनी वेढलेलं हाट कालिका मंदिर
=============
ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेन प्रवासाच्या मुख्य आकर्षणांपैकी अल-कासिम प्रांतातील हेल आणि अल जॉफ ही ऐतिहासिक शहरे असतील. किंग सलमान बिन अब्दुलअजीझ रॉयल नॅचरल रिझर्व्ह या शहरात आहे. रियाध सोडल्यानंतर या ट्रेनचा शेवटचा थांबा जॉर्डन सीमेजवळ अल-कुरयत आहे. या ट्रेनच्या प्रवासाठी बुकींग जरी 2024 च्या अखेरीस होणार असले तरी या ट्रेनचा प्रवास प्रत्यक्षात 2025 च्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. अर्थातच या ट्रेनचे तिकीट हे काही लाखांच्या घरात राहणार आहे.(Dream of the Desert)
सौदी अरेबियाच्या या ‘ड्रीम ऑफ द डेजर्ट‘ साठी इटालियन हॉस्पिटॅलिटी कंपनी आर्सेनल ग्रुपसोबत $55 दशलक्ष असा करार करण्यात आला आहे. ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेनमध्ये 40 बोगी आहेत. यात एकाचवेळी 82 प्रवास करु शकणार आहेत. यात लक्झरी रेस्टॉरंट, लाउंज बार आणि स्लीपिंग क्वार्टर्ससह विविध सुविधा आहेत.
सई बने