Home » Dream Of The Desert : सौदीच्या वाळवंटात झुकझुकगाडी !

Dream Of The Desert : सौदीच्या वाळवंटात झुकझुकगाडी !

by Team Gajawaja
0 comment
Dream Of The Desert
Share

सौदी अरेबियामध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अनेक बदल घडवत आहेत. तेलासाठी ओळख असलेल्या सौदी अरेबियाला ते पर्यटनाचा देश म्हणून विकसित करत आहेत. त्यातूनच त्यांचे स्वप्नवत शहर, म्हणजे, निओम शहराची उभारणी करण्यात येत आहे. आता यापाठोपाठ मोहम्मद बिन सलमान यांनी मध्य पूर्वेतील पहिली 5 स्टार ट्रेन सौदी अरेबियाच्या वाळवंटात धावणार असल्याचे जाहीर केले आहे. या पंचतारांकित ट्रेनचे नाव ड्रीम ऑफ द डेझर्ट असणार असून 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा क्राऊन प्रिन्सचा मानस आहे. यातून सौदीमध्ये येणा-या पर्यटकांना सौदीच्या ऐतिहासिक वारशाची आणि वाळवंटातील सौंदर्याची ओळख करून दिली जाणार आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा निओम सिटी प्रकल्प गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. (Dream Of The Desert)

निओम सिटी हे स्वप्नवत शहर आहे. या प्रोजेक्टसाठी प्रिन्स मोहम्मद यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच युरोपियन देशांनीही या निओम प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. वाहनमुक्त शहर म्हणून या निओम सिटीची जाहीरात करण्यात येते. प्रत्यक्षात असे शहर सौदीच्या वाळवंटात उभे करणे मोठे अवघड काम आहे. या शहराच्या उभारणीमध्ये व्यस्त असलेल्या अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जाते. शिवाय निओम सिटीच्या उभारणीत मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यामुळे सौदीची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाल्याचीही माहिती आहे. मात्र प्रिन्स मोहम्मद यांनी हा प्रकल्प पूर्ण कऱण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. आता याच प्रकल्पाच्या पुढच्या योजनेची त्यांनी घोषणा केली आहे. त्यांनी सौदीच्या वाळवंटात पहिल्यांदाच धावणा-या ड्रीम ट्रेनची माहिती दिली आहे.

प्रिन्स मोहम्मद यांनी वाळवंटात पहिल्यांदाच धावणा-या या ड्रीम ऑफ द डेझर्टसाठी फक्त एक वर्षाचा कालावधी असल्याचे सांगितले आहे. यातून सौदी अरेबियामधील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असल्याचे मोहम्मद यांनी स्पष्ट केले. या ट्रेनसाठी सौदी अरेबियन रेल्वे विभाग आणि इटालियन हॉस्पिटॅलिटी कंपनी आर्सेनेल हे संयुक्तपणे काम करत आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून सौदी अरेबियामध्ये येणा-या पर्यटकांना सौदी अरेबियाच्या वाळवंटातील सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवणार आहे. प्रिन्स मोहम्मद यांच्या नियोम सिटीमधीलच हा आणखी एक प्रकल्प आहे. वास्तविक निओम सिटी उभारण्यासाठी नियोजीत कालावधीपेक्षा अधिक कालावधी लागल्याची ओरड होत आहे. तसेच या शहराच्या उभारणीत अनेक अडचणी येत असून अजून अब्जो डॉलरची गुंतवणूक आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये खुद्द सौदी अरेबियामध्ये अशा वेगळ्या प्रकल्पाची सौदीला गरज काय, असा प्रश्नही प्रिन्स मोहम्मद यांना विचारण्यात येऊ लागला आहे. (Dream Of The Desert)

त्यामुळेच प्रिन्स मोहम्मद यांनी पुढच्या वर्षीपर्यंत निओम सिटीमधील काही भाग खुला करण्यासासंदर्भात प्रकल्प प्रमुखांसोबत चर्चा केली आहे. त्यातूनच या ड्रीम ऑफ द डेझर्टची योजना जाहीर झाली आहे. ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेनचे स्वरुप आधुनिक असणार आहे. ही मध्य पूर्वेतील पहिली पूर्ण-स्टार लक्झरी ट्रेन असणार आहे. सौदीच्या संस्कृतीची ओळख परदेशी पर्यटकांना होईल, अशा पद्धतीनं या ट्रेनचा प्रवास मार्ग असणार आहे. तशाच स्वरुपाचे या ट्रेनच्या आतील सजावट असणार आहे. ट्रेनच्या आतील भागात वाळवंटातील लँडस्केप आणि पारंपारिक सौदी वास्तुकला साकारण्यात आली आहे. यासाठी मातीचा रंग, आणि मखमल कापडाचा वापर कऱण्यात आला आहे. ट्रेनच्या डिझाइनमध्ये हेग्रा आणि हेल सारख्या प्रतिष्ठित सौदी खुणा आहेत. या ट्रेनमध्ये 14 डबे असतील. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

तसेच 34 लक्झरी सुइट्स असतील. ही ट्रेन रियाधहून निघेल आणि उत्तरेकडील रेल्वे नेटवर्कवरून प्रवास करेल, ज्यामुळे पाहुण्यांना सौदी अरेबियाचा अद्भुत वारसा आणि नैसर्गिक स्थळे बघण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय सौदीमधील सांस्कृतिक मंत्रालयातर्फेही या ट्रेनमध्ये अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सौदी अरेबियाला एक अव्वल जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्थापित करण्यासाठी या ड्रीम ऑफ डेझर्ट ट्रेनचा प्रमुख वाटा असले, असे प्रिन्स मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे. ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेन 2026 च्या अखेरीस सुरू होणार असून लवकरच या ट्रेनच्या बुकींग संदर्भात तपशील आणि विशेष पॅकेजेस लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहेत. सौदी सरकार 2030 पर्यंत देशाला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याची योजना आखत आहे. त्यात या ट्रेनसारखे अनेक प्रकल्प आहेत, आणि त्याची टप्प्याटप्यानं घोषणा करण्यात येत आहे. (Dream Of The Desert)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.