देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr.Abdul Kalam) यांच्या आयुष्यातील बहुतांश किस्से लोक सर्वांना माहिती असतील. परंतु त्यांचे असे ही काही किस्से आहेत ते मोजक्या लोकांना माहिती असतील किंवा नसतील. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला अब्दुल कलामांच्या आयुष्यातील अशा काही किस्स्यांबद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्हाला कधी माहिती नसेल किंवा तुम्ही ऐकले ही नसेल. खरंतर डॉ. अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक होतेच. पण ते मनोवैज्ञानिक सुद्धा होते. या व्यतिरिक्त कलाम यांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचता यायचा. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला ते चेहऱ्यावरुन त्याबद्दल सांगायचे. अब्दुल कलाम यांनी आपल्या आयुष्यात खुप मेहनत केली आणि यशाच्या शिखरावर पोहचले. मात्र या दरम्यान, त्यांनी नेहमीच अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याची इच्छा कधीच सोडली नाही. ऐवढेच नव्हे तर दुसऱ्यांना सुद्धा त्यांच्यातील ज्ञानाची भुक जागवण्याची त्यांच्याकडे अद्भुत क्षमता होती. ते नेहमीच विकासाबद्दल बोलायचे.
‘एक शाम डॉ. अब्दुल कलाम के नाम’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या गंजिंग कार्निवलमध्ये कलाम यांच्यासोबत वेळ घालवलेले त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सृजन पाल सिंह यांनी त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या ते ऐकून त्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहिलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. अब्दुल कलाम यांच्यासोबतची पहिली भेट ते अखेर पर्यंतचा लाभलेला सहवास याबद्दल ही सृजन पालन यांनी अधिक गोष्टी सांगितल्या त्याबद्दलच आपण पाहूयात सविस्तर.
कलाम यांनी सांगितली होती अलविदा बोलण्याची पद्धत
डॉ. कलाम हे प्रत्येकाला एक प्रश्न नेहमीच विचारायचे तो म्हणजे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात तुमची ओळख निर्माण करायची आहे जेणेकरुन तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. तर याबद्दलच जेव्हा सृजन पाल सिंह यांनी कलाम यांना सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा कलाम यांनी उत्तर देत म्हटले होते की, मला असे वाटते संपूर्ण जगाने मला शिक्षकाच्या रुपात ओळखावे. त्यानंतर जगाला अलविदा बोलण्याची सर्वाधिक योग्य पद्धत म्हणजे, व्यक्तीने सरळ उभे राहिले पाहिजे, बुट घातलेली असावीत आणि आपल्या आवडीचे काम करत असला पाहिजे.
डॉ. कलाम हे नेहमीच देशाचा विकास, गावात शिक्षणाची सोय, चिकित्सा व्यवस्थेत सुधारणा यासारख्या गोष्टींवरच अधिक बोलायचे. तसेच जेव्हा कधी ते कोणाला भेटायचे तेव्हा त्याला असा सल्ला द्यायचे की. प्रत्येक दिवशी आपल्या आईच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे.(Dr. A. P. J. Abdul Kalam)
हे देखील वाचा- ‘मिसाइल मॅन’ला अनोखा सलाम, डॉ. कलाम यांच्या जीवनावर संस्कृत भाषेत महाकाव्य
कलामांनी एकत्रित कुटुंबात पडत असलेल्या फुटींबद्दल व्यक्त केले होते दु:ख
आस्था रुग्णालयाचे डॉ. अभिषेक शुक्ल यांनी म्हटले की. कलाम यांना खुप वेळ भेटलो. पण राजभवनातील भेट ही नेहमीच लक्षात राहण्यासारखी आहे. कारण मी जेव्हा अब्दुल कलामांसोबत वृद्धांबद्दलच्या समस्यांवर त्यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी एकत्रित कुटुंबात पडत असलेल्या फुटींबद्दल बोलले. न्युक्लिअर फॅमिलीमध्ये वृद्धांची देखरेख होत नाही. पण त्यांच्या काही सल्ल्यांमुळे वृद्धांसाठी काम करण्यासाठी खुप मदत मिळाली. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr. Abdul Kalam) यांची उणीव नेहमीच भासेल. तर जिल्हाधिकारी राजशेखर यांनी म्हटले होते की, विमानतळाच्या लॉबीमध्ये डॉ. कलाम यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी फक्त विकासाबद्दलच चर्चा केली. असे असे म्हणणे होते की, गावाचा विकास झाला पाहिजे. तसेच मुलांचे शिक्षण आणि आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे.कलाम यांचे विचार हे नेहमीच एखाद्याला प्रोत्साहित करणारे आहेत.