सध्या प्रयागराजमध्ये हिंदू लोकांचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा संपन्न होत आहे. तब्बल १४४ वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा सुरु आहे. या निमित्ताने प्रयागराजमध्ये देश विदेशातून असंख्य लोकांनी हजेरी लावली आहे. कुंभमेळ्यामधे सहभागी होत पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास आपल्या पापांचे क्षालन होते अशी मान्यता आहे. त्यामुळे हा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी आणि साधू महात्म्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोकं प्रयागराजमध्ये पोहचत आहे. (Mahakumbhmela)
आता दुसऱ्या शहरातून, राज्यांतून, देशातून प्रयागराजमध्ये पोचणाऱ्या सर्व भक्तांना उत्तम सोयी देण्यासाठी, त्यांना चांगले लाभ देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास, दर्शन, यात्रा सफल करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जात असून, यामुळे लोकांची गैरसोय टाळता येण्यासाठीचे प्रयत्न सरकारकडून केले जाताना दिसत आहे.
अशातच लोकांच्या मदतीसाठी उत्तरप्रदेश सरकारने लोकांच्या मदतीसाठी या महाकुंभमेळ्याची संपूर्ण इत्यंभूत माहिती देणारे अॅप बनवले आहे. जर तुम्हाला प्रयागराज येथील कुंभमेळ्यामधे जायचे असेल आणि तुम्हाला तिथली काहीच माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या हातातील फोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करून सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकता. (Mahakumbh 2025 App)
‘महाकुंभ मेळा २०२५’ (Mahakumbh 2025 App) अॅप डाऊनलोड करू शकता. हे महाकुंभ मेळा २०२५ अॅप या कुंभमेळ्यादरम्यान खूपच फायद्याचे ठरणार आहे. महाकुंभमेळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकारकडून महाकुंभ मेळा २०२५ हे अॅप सुरू करण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी या अॅपच्या माध्यमातून सर्वच समस्यांवर तोडगा मिळणार आहे. हे अॅप आलेल्या सर्वच लोकंच्या छोट्यातल्या छोट्या समस्येपासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेमवर तोडगा असणार आहे. इतकेच नाही तर गरज पडल्यास या अॅपच्या माध्यमातून मदतही मिळेल. (Mahakumbh 2025 App)
१३ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेला हा महाकुंभ मेळा येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या ४५ दिवसांच्या काळामध्ये कोट्यवधी भाविक महाकुंभमेळ्यामधे सहभागी होतील. त्यांच्या मदतीसाठी असलेले हे अॅप हे अॅप फेअर ऑथॉरिटीकडून लाईव्ह झाले आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहेत. अँड्रॉईड युजर्स गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन युजर्स अॅप स्टोअरमध्ये जाऊन त्याचे नाव सर्च करू शकतात. महाकुंभ 2025 चा अधिकृत लोगो असलेले अॅप दिसेल, समोर दिसणाऱ्या इन्स्टॉल किंवा गेट बटणावर टॅप केल्यास तुम्ही हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता. (Top Stories)
अॅपवर आपत्कालीन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही थेट मदत मागू शकाल. प्रवाशांना तिकिटांसाठी कुठेही जायची गरज नाही. या अॅपद्वारेच रेल्वे तिकिटे बुक करता येणार आहे. तसेच, प्रतीक्षा कक्ष, विश्रांती कक्ष, फूड स्टॉल, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छता गृह यासारख्या सुविधांची माहिती हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.(Social News)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !
=============
मेळाव्याशिवाय प्रयागराजच्या आजूबाजूच्या अयोध्या आणि परिसराचीही माहिती देण्यात येणार आहे. प्रयागराजचा हेरिटेज वॉक आणि इथल्या लोकप्रिय गोष्टी अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना सांगितल्या जात आहेत. अॅपच्या माध्यमातून मेळा परिसरात जाण्याचे मार्ग, येथे राहण्याची ठिकाणे आणि विविध घाटावर जाण्याचा मार्गही सांगितला जाणार आहे.