लहान गोलुमोलू, लुटलुटीत मुल फार सुंदर दिसतात. परंतु तरुणावस्थेत आपले गाल अधिक फुललेले कोणालाच आवडत नाही. आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणे किंवा कोणत्याही शारिरिक समस्येच्या कारणास्तव आपल्या शरिरावर अतिरिक्त फॅट्स हे पोटासह चेहऱ्यावर ही दिसून येतात. खासकरुन आपल्या जबड्याजवळ अधिक फॅट्स जमा झाल्यास आपला चेहरा अधिक फुललेला आणि त्याची घडी विस्कटलेली दिसून येते. यामुळेच तुम्ही अधिक जाड दिसता आणि समोरच्या व्यक्तीची पहिली नजर ही तुमच्या चेहऱ्याकडे जाते. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे नेहमीच वाटत असते. पण डबल चिन (Double Chin) येणे ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळेच डबल चिनच्या समस्येला अशा कोणत्या व्यायामांनी तुम्ही दूर करु शकता याबद्दल थोडक्यात पहा.
डबल चिन म्हणजे तुमच्या जबड्याच्या खाली जमा होणारी अतिरिक्त चरबी. तुमचा मुळ चेहरा आणि त्यावर अतिरिक्त चरबीचा थर यामुळे तुम्ही वेगळे दिसता. भले डबल चिन ही तुमच्या वाढलेल्या वजनामुळे आली असेल. परंतु असे नव्हे ज्यांचे वजन अधिक आहे त्यांनाच डबल चिनची समस्या असते.
डबल चिन येण्यामागील काही कारणे?
डबल चिन (Double Chin) येण्यामागे विविध कारणे असू शकतात. परंतु त्यामधील प्रमुख कारणं कोणती ते आधी जाणून घेऊयात.
-वाढत्या वयासोबत त्वचा अधिक शिथिल होऊ शकते आणि परिणामी डबल चीनची समस्या होते.
-ज्यांचे आई-वडिल किंवा परिवारातील कोणत्याही व्यक्तीला डबल चिन आली असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचा सामना करावा लागतो. अर्थात ही समस्या अनुवंशिक असू शकते.
-वजन वाढल्याने सुद्धा तुम्हाला डबल चिन येऊ शकते. कारण अतिरिक्त चरबी ही चेहऱ्याजवळ निर्माण झाल्याने तुमचा चेहरा मोठा आणि जड दिसतो.
-काही वैद्यकिय कारणास्तव ही तुम्हाला डबल चिन येऊ शकते. म्हणजेच जर तुमच्या त्वचेला सूज आल्यास तुम्हाला डबल चिन आल्याचे दिसून येईल.
हे देखील वाचा-कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो का? जाणून घ्या अभ्यासात काय आढळले
डबल चिनची समस्या दूर करण्यासाठी कोणत्या Facial Exercise कराव्यात?
-पाउट एक्सरसाइज
मुली जेव्हा फोटो काढतात तेव्हा आपण बऱ्याच वेळा पाहतो की, त्या पाउट करताना दिसून येतात. तर ही पोज फक्त तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासह डबल चीन सुद्धा शेपमध्ये आणण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही रोज १०-१२ वेळा ३ सेकंदासाठी पाउट केले तर डबल चीन कमी होऊ शकते.
-टंग एक्सरसाइज
हा व्यायाम तुमची डबल चिन कमी करण्यास मदत करणार आहे. फक्त तुम्हाला वरच्या दिशेला पाहून पाउट करायचे आहे. अशाने तुमच्या नसा खेचल्या जातील आणि चिनची चरबी कमी होण्यास मदत होईल.
-जीभ बाहेर काढा
असे करण्यासाठी तुम्हाला तुमची जीभ जेवढी बाहेर काढता येते तेवढी काढावी. त्यानंतर आपली जीभ बाहेर काढूनच डाव्या-उजव्या बाजूला वळवत रहा. आता तुमच्या चेहऱ्याच्या नसा खेचल्यासारख्या वाटतील. ही क्रिया १२-१५ सेकंदापर्यंत करत रहा.
तर वर दिल्याप्रमाणे चेहऱ्याचा व्यायाम तुम्ही दिवसातून एक वेळ जरी केलात तरीही त्याचा कालांतराने फरक तुम्हाला तुमच्या डबल चिनमध्ये जाणवेल. तसेच डबल चिनच्या समस्येमुळे अधिकच ताण येत असेल तर तसे करु नका. व्यायाम आणि हेल्थी फूड खाण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा.