दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किना-यावर एक अजब मासा सापडला आहे. अंगावर क्षिद्र आणि डोक्यावर शिंग असलेला हा मासा पाहिल्यावर मासेमारही घाबरले. पण जेव्हा या माशाची ओळख पटली तेव्हा त्यांच्या भीतीत आणखी भर पडली. हा मासा म्हणजे, डूम्सडे मासा. याला ओरफिश असेही म्हणतात. पण यापेक्षा प्रलय आणणारा मासा म्हणून या डूम्सडे माशाची जास्त ओळख आहे. हा मासा जेव्हा किना-यावर किंवा खोल समुद्रात दिसतो त्यानंतर काही दिवसातच प्रलय येतो, असा समज आहे. बरोबर १३ वर्षापूर्वी जपानच्या किना-यावर असेच डूम्सडे मासे दिसले होते. त्यानंतर काही दिवसातच जपानमध्ये मोठा भूकंप आला होता. याआधीही डूम्सडे माशाबाबत काही समजूती आहेत. आता हाच डूम्सडे मासा अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किना-यावर आढळून आला आहे. (Doomsday fish)
भीतीदायक अशा या माशाला बघून सुरुवातीला मासेमारही त्याची ओळख पटवण्यासाठी उत्सुक होते. मात्र त्याचे नाव समजल्यावर या सर्वांची भीतीनं गाळण उडाली आहे. डूम्सडे मासा कॅलिफोर्नियाच्या किना-यावर सापडल्यानं अमेरिकेत काही दिवसात मोठी नैसर्गिक आपत्ती येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची आपल्याला अद्यापही पूर्णपण माहिती नाही. असे अनेक पशू-पक्षी आहेत, जे आपण पाहिलेही नाहीत. विशाल अशा समुद्राच्या पोटातही असे अनेक जीव आहेत, ज्यांना माणसांनी कधीच पाहिलं नाही. अशा दुर्मिळ माशांना जर बघितलं तर त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता रहाते. मात्र अशा दुर्मिळ माशांबाबत काही समज आहेत, हे ऐकल्यावर भीतीची भावना मनात येते. असाच एक दुर्मिळ मासा म्हणजे, डूम्सडे मासा किंवा ओअरफिश. खोल समुद्रात रहाणारा हा मासा क्वचित मानवाच्या नजरेस पडतो. आणि ज्याच्या नजरेस हा मासा पडतो, तो काहीतरी अपशकून होणार या भावनेनं स्वतःला ग्रासून टाकतो. (Doomsday fish)
डूम्सडे माशाबाबत अनेक समजुती आहेत. असाच डूम्सडे मासा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील समुद्रकिनाऱ्यावर सापडला आहे. स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या म्हणण्यानुसार, हा मासा गेल्या आठवड्यात दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर सापडला. समुद्रकिनाऱ्यावर हा मासा मृतावस्थेत सापडला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधण्यासाठी तज्ज्ञ या माशांच्या शरीराचे विश्लेषण करत आहेत. समुद्रकिनारी हा मासा मिळाल्यावर जीवरक्षकांना सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण हा मासा खोल समुद्रात रहातो. तो फार क्वचित समुद्राच्या वर येतो. खोल समुद्रात काही हालचाली झाल्या, तर डूम्सडे मासा समुद्रतळार येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अधिक शोध चालू आहे. या डूम्सडे माशाबाबत अनेक चर्चा आहेत. काहींचा विश्वास आहे की, जेव्हा एखादी मोठी आपत्ती येते, तेव्हा हा मासा समुद्रकिना-यावर येतो. हा मासा दिसणे म्हणजेच विनाशाचे संकेत असल्याचे मानण्यात येते. (Doomsday fish)
======
हे देखील वाचा : गुजरातमधील ऐतिहासिक शहर चंपानेर, जाणून घ्या खासियत
======
डूम्सडे मासा २०११ मध्ये जपानच्या समुद्रकिना-यावर दिसला होता. त्यावेळी २० डूम्सडे मासे एकत्र दिसले होते. त्यामुळे अधिक भयानक आपत्ती येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे जपानमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. तेव्हापासून आता तब्बल १३ वर्षांनी डूम्सडे मासा दिसला आहे. तोही मृतावस्थेत दिसल्यामुळे त्यासंदर्भात अधिक चर्चा होत आहेत. असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले जाते. जेव्हा-जेव्हा मोठा भूकंप होतो त्याच्या आधी डूम्सडे मासा दिसतो. अशात झालेल्या भुकंपामध्ये मोठी हानी होते. त्यामुळेच डूम्सडे माशाला प्रलय आणणारा मासा म्हणून ओळखले जाते. डूम्सडे मासा दिसायलाही भयानक आहे. त्याच्या सर्व अंगावर खड्डे असतात. तसेच त्याचे डोळे सामान्यतः माशांच्या डोळ्यांपेक्षा मोठे असतात. शिवाय त्याच्या डोक्यावर लाल रंगाचे हाड असते. हा मासा १२ फूट लांब असून ३० फुटांपर्यंत वाढू शकतो. हे मासे आपल्या समुहापासून हरवले किंवा आजारी असतील तरच समुद्र किना-यावर येतात, असे मानले जाते. एरवी हे मासे खोल समुद्रात राहतात आणि त्यांना शोधणे फार कठीण असते. ते कोणाच्याही नजरेस पडत नाहीत. आता १३ वर्षानंतर मेलेले डूम्सडे मासे दक्षिण कॅलिफोनियाच्या किना-यावर मृतावस्थेत मिळाले आहेत. त्यामुळे या सर्व भागात घबराट पसरली आहे. (Doomsday fish)
सई बने