Home » Donald Trump : ट्रम्पचा भारतावरील राग अमेरिकन नागरिकांचा खिसा रिकामी करणार

Donald Trump : ट्रम्पचा भारतावरील राग अमेरिकन नागरिकांचा खिसा रिकामी करणार

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त कर लादला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी भारतीय आयातीवरील शुल्क आता 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. ट्रम्प फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भारताला आणखी निर्बंधांची धमकी दिली आहे. भारतासह अन्य देशांनाही ट्रम्प अशाच प्रकारे धमकवत आहेत. वास्तविक या सर्वांमागे ट्रम्प यांचा त्रागा आहे. 20 जानेवारी 2025 पासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार हाती घेतला. तेव्हा आपण पहिल्याच दिवशी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवणार अशी घोषणा केली होती. (Donald Trump)

पण सहा महिने होऊन गेले तरी त्यांना त्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवता आलेली नाही. इकडे भारत-पाकिस्तान युद्धामध्येही त्यांनी मध्यस्थी करुन युद्ध थांबवल्याचे जाहीर केले. पण भारत सरकारनं ट्रम्प यांचा हा दावा पार फेटाळला. या सर्वात डोनाल्ड ट्रम्प यांना घाई लागली आहे ती, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची. या त्यांच्या पुरस्काराच्या मार्गात रशिया आणि भारत हे दोन देश येत असल्यामुळे या दोन्ही देशांवर राग काढण्याचे कारण शोधत आहेत. त्यातही रशिया आणि भारताच्या मैत्रीमध्ये विघ्न आणण्यासाठी त्यांनी हे टेरिफ कार्ड चालवल्याचे मत व्यक्त होत आहे. (International News)

मात्र या सर्वात नुकसान होणार आहे ते अमेरिकन नागरिकांचे. कारण अमेरिकेमध्ये 60 टक्के औषधांचा पुरवठा भारताकडून कऱण्यात येतो. त्यातही मानसिक रोगांवरील औषधे आणि मधुमेहावरील औषधे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत पाठवली जातात. या औषधांच्या किंमती या टेरिफ युद्धामुळे वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यात औषध खरेदी करतांना अमेरिकन नागरिकांचाच खिसा रिकामा होणार आहे. 2022 मध्ये सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर युरोपमधून अनेक बंधने घालण्यात आली तरी, भारत आणि चीनने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. रशियाकडून स्वस्त दारात मिळणा-या या रशियान तेलाचा भारतीय बाजारपेठेत 36 टक्के वाटा आहे. ट्रम्प यांना हिच गोष्ट खटकत आहे. अर्थात भारताव्यतिरिक्त चीन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील आणि युरोपियन युनियनचे अनेक देश रशियाकडून तेल खरेदी करतात. (Donald Trump)

पण त्यांच्यावर ट्रम्प टेरिफ कार्ड लागू झालेले नाही. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्या मैत्रीमध्ये दरी निर्माण करण्यासाठीच ट्रम्प भारताला अधिक निर्बंध घालण्याची धमकी देत असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांचा फटका भारतापेक्षा अमेरिकेला अधिक बसणार असल्याचे मत अनेक अभ्यासक व्यक्त करीत आहेत. यातून पहिली गोष्ट म्हणजे, भारत, चीन आणि रशिया हे आशियातील तीन मातब्बर देश एकत्र होणार आहे. त्यांची ही एकी राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अमेरिकेसाठी भविष्यात तापदायक ठरेल असा अंदाजही व्यक्त होत आहे. यातही अमेरिकेन नागरिकांची आरोग्य व्यवस्थाही पूर्णपणे बिघडणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अधिक कर लावण्याची घोषणा करतांना, अमेरिका आता औषधांसाठी इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही आणि ती अमेरिकेतच बनवली पाहिजेत, असे जोशात सांगितले असले तरी त्यांच्या या जोशामुळे अमेरिकन डॉक्टरांना घाम फुटला आहे. (International News)

Russia And Ukraine

कारण अमेरिकेत 60 टक्के औषधं ही भारतीय कंपन्याची वापरली जातात. विशेष म्हणजे, अमेरिकेन डॉक्टरही भारतीय औषधांची गुणवत्ता मान्य करतात. यातही भारतातील जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधांनी अलिकडच्या वर्षात अमेरिकन नागरिकांमध्ये विश्वास वाढवला आहे. कोरोना नंतर या औषधांना अधिक मागणी आली आहे. आता टेरिफ कार्डाचा या औषधांना फटका बसणार का, याची चिंता अमेरिकेतच व्यक्त होत आहे. भारत सध्या जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा उत्पादक देश आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी 47% औषधं भारतातून येतात. 2024 मध्ये भारतानं अमेरिकेला 76000 कोटींची औषधं अमेरिकेला निर्यात केली. तर यावर्षात आत्ताच हा आकडे 88000 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. (Donald Trump)

===================

हे देखील वाचा : Russia And Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात भारताला खेचण्याचा प्रयत्न !

===================

भारताकडून अमेरिकेत मधुमेह आणि मानसिक रोगावरील औषधांची होणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय कर्करोग, हद्यरोग, कोलेस्ट्रॉल आणि न्यूरोलॉजीबाबत आजारांचीही औषधे भारतातून अमेरिकेत जातात. आता ट्रम्प टेरिफ कार्डामुळे ही स्वस्त औषधे अमेरिकेत महाग होण्याची शक्यता आहे. या सर्वात अमेरिकन नागरिकांच्या खिशावर फक्त औषधांसाठीच दरवर्षी 20 लाख कोटीहून अधिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या या टेरिफ कार्डाचा भारतापेक्षा अमेरिकेत विरोध सुरु झाला आहे. अवघं जग जेव्हा कोरोनाच्या जाळ्यात अडकलं होतं, तेव्हा भारतानं जगभर लस आणि आवश्यक औषधे दिली आहेत. एकेकाळी स्वतः ट्रम्प यांनीही भारताकडे औषधांची मागणी केली होती. मात्र आता तेच ट्रम्प वैयक्तिक स्वार्थापोटी भारतीय औषधांवर अतिरिक्त कर लावण्याची धमकी देत आहेत. यामुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.