Home » जो बिडेन अमेरिकेला संपवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रंप यांचा राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल

जो बिडेन अमेरिकेला संपवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रंप यांचा राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल

by Team Gajawaja
0 comment
Donald trump on joe biden
Share

जगातील सर्वाधिक बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत पुढील वर्षात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूका होणार आहेत. या निवडणूकी संदर्भात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपली दावा केला आहे. त्यांनी टेक्सामधील वाको मध्ये आपल्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि आपल्या विरोधात सुरु असलेल्या तपासाची तुलना स्टालिनिस्ट रशियन हॉरर शो शी केली आहे. वाको एअर पोर्टजवल झालेल्या या रॅलीत ट्रंप यांनी आपल्या रिपब्लिकन प्रतिस्पर्धी रॉन डीसांटिस यांच्यावर ही टीका केली.(Donald Trump on Joe Biden)

रॅलीत दोन तासांच्या भाषणादरम्यान ट्रंप यांनी आपल्या विरोधात सुरु असलेल्या तपासाबद्दल सरकारवर टीका केली. ट्रंप यांनी असे म्हटले की, माझ्या विरोधात तपास हा राजकीय हेतूने केला जात आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात कायद्याचा गैरवापर करत आहेत. सुरुवाती पासूनच माध्या विरोधात एक विच हंट आणि फॉनी इन्वेस्टिगेशन सारखी केली.

ट्रंप सध्या कॅपिटल हिंसा आणि पॉर्न स्टारला केलेल्या पेमेंटच्या प्रकरणामुळे वादात अडकले आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांच्या विरोधात तपास केला जात आहे. त्यांनी बिडेन यांच्या प्रशासनाला भ्रष्ट, सडलेली आणि भयंकर ताकद असल्याचे म्हटले आहे. सध्या बिडेन शासन हे अमेरिकेला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल ट्रंम्प यांनी केला आहे. परंतु अमेरिका पुन्हा स्वतंत्र राष्ट्र होईल.

गेल्या काही दिवसांपासून ट्रंप यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे आणि त्यामुळे सुरु झालेल्या तपासावरुन त्यांनी आक्रमक टीप्पणी सुद्धा केली आहे. गेल्या आठवड्यात ट्रंप यांनी मॅनहट्टनमध्ये आपल्याला अटक होऊ शकते असे म्हटले होते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या समर्थकांना विरोध करण्यास ही सांगितले होते. ट्रंप समर्थकांना असे सांगितले गेले की, अमेरिकेला आधीच्या स्थितीत परत आणावे. तज्ञांचे असे मानणे आहे की, ट्रंप यांना लवकरच गुन्ह्याच्या आरोपांचा सामना करावा लागणार आहे.(Donald Trump on Joe Biden)

हे देखील वाचा-डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आरोप लावणारी डेनियल्स कोण?

असे सांगितले जात आहे की, टेक्सासच्या वाको मध्ये झालेल्या रॅलीत जवळजवळ १५ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. ट्रंप यांना गेल्या निवडणूकीत जो बिडेन यांनी हरवले होते. त्यानंतर निकाल समोर आल्यानंतर ते मानण्यास ही ट्रंप तयार नव्हते. त्यानंतर कॅपिटल हिल्समध्ये हिंसाचार झाला. ट्रंप जानेवारी २०१७ ते २०२१ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.