अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या धक्कातंत्राचा वापर सुरुच ठेवला आहे. ट्रम्प रोज नवा नियम आणत असून त्यामुळे अमेरिकेत रहात असलेल्या स्थलांतरितांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता या नियमांमध्ये आणखी एक भार पडली आहे, ती म्हणजे, अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांसाठी यापुढे त्यांचे ओळखपत्र 24 तास सोबत ठेवाणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. (Donald Trump)

नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, तुरुंगवास किंवा देशाबाहेर पाठवले जाण्याची शक्यता आहे. ज्या रहिवाशांकडे वैध कागदपत्रे नाहीत त्यांनाही हा नियम लागू होणार आहे. अमेरिकेत सध्या हद्दपार मोहीम जोरात सुरु आहे. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्या महमूद खलीलच्या अटकेवरून गोंधळ चालू आहे. महमूद खलील याला अमेरिका सोडण्याचे आदेश दिल्यावर त्यानं न्यायालयात धाव घेतली होती. आता अमेरिकन न्यायालयानेही त्याच्या हद्दपारीवर शिक्का मारला आहे. यापुढे अमेरिकेत हमास आणि अन्य अतिरेकी संघटनांना पाठिंबा देणा-यांना थारा नाही, असे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच आता स्थलांतरितांवर 24 तास कागदपत्र ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. या सर्वांमुळे अमेरिकेत रहाणा-या अन्य देशातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावऱण पसरले आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून रोज नवा नियम लागू कऱण्यात येत आहे. आता अमेरिकेत रहाणा-या स्थलांतरितांसाठी 24 तास कागदपत्रे सोबत ठेवण्याची सक्ती कऱण्यात आली आहे. स्थलांतरितांकडे आवश्यक कागदपत्रे न आढळल्यास त्यांना तुरुंगातही जावे लागेल, अशा या नियमांमध्ये तरतूद असल्यानं खळबळ उडाली आह. या नियमाचा उद्देश देशातील बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे आणि बेकायदेशीरपणे राहणाऱ्या शेकडो लोकांना देशातून हाकलून लावणे, असल्याचेही स्पष्ट कऱण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा नियम 11 एप्रिल 2025 पासून लागू झाला आहे. याशिवाय अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करावी लागणार आहे. तसे न केल्यास परदेशी नागरिकांना तुरुंगवास, दंड आणि हद्दपारीची शिक्षा होणार आहे. या घोषणेमुळे अमेरिकेत राहणारे स्थलांतरित काळजीत पडले आहेत. यासंदर्भात काम करणा-या विभागानं याआधीच, म्हणजे, 25 फेब्रुवारी रोजी, बेकायदेशीर परदेशी नागरिकांनी स्वतःची तक्रार न केल्यास त्यांना दंड किंवा खटला भरावा लागू शकतो, असेही जाहीर केले आहे. या नोंदणी करणाऱ्या नागरिकांना पुराव्यासह त्यांच्या बोटांचे ठसे आणि पत्ता द्यावा लागणार आहे. (Donald Trump)

शिवाय 14 वर्षांखालील मुलांच्या पालकांनी त्यांची नोंदणी झाली आहे का नाही, याची खात्री करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. असे न झाल्यास या नागरिकांना कधीही अमेरिकेच्या बाहेर काढण्यात येणार असल्याचेही स्पष्ट कऱण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या कष्टकरी लोकांसाठी मारक असल्याची टिका होत आहे. यातच या कुठल्याही नियमांचे पालन न केल्यास अटकेची तलवार आहे. तसेच मोठा दंडही वसूल कऱण्यात येणार आहे. शिवाय संबंधित व्यक्ती पुन्हा कधीही अमेरिकेत परत येऊ शकणार नाही. त्यामुळे स्थलांतरितांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या नियमांमुळे काही स्थलांतरितांनी आपली घरे बदलली आहेत, अशांसाठीही आता नव्या घराचा पत्ता 10 दिवसात नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे न केल्यास या व्यक्तींना 50000 डॉलरपर्यंत दंड होण्याची तरतूद करण्यात आली आहे. (International News)
=========
हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेतील स्टोर्समध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी !
Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
==========
या सर्व नियमांवर टिका करण्यात आल्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या नियमांचे समर्थन केले आहे. रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, स्थलांतरितांची व्हिसा छाननी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिवाय अमेरिकन व्हिसा मिळाल्यानंतर अमेरिकन सरकारची तपासणी संपत नाही, हे ध्यानात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्य म्हणजे, अमेरिकन व्हिसा हा अधिकार नाही तर एक विशेषाधिकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्टनुसार, दहशतवादाला प्रोत्साहन देणारे किंवा समर्थन देणारे लोक अमेरिकन व्हिसासाठी अपात्र आहेत. या कायद्यामुळे व्हिसा रद्द करण्याचा अधिकार अमेरिकन सरकारला असल्याचे रुबियो यांनी सांगून ट्रम्प प्रशासन यापुढे दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणा-यांना थारा देणार नसल्याचा इशारा दिला आहे. (Donald Trump)
सई बने
