अति ताणल्यास रबरही तुटतो, याचीच प्रचिती आता अमेरिकेला येऊ लागली आहे. टेरिफ कार्डाच्या जोरावर अवघ्या जगाला हादरे देणा-या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात तीव्र विरोध होत आहे. शिवाय जगावर असलेले अमेरिकेचे वर्चस्व संपवण्यासाठी आता अन्य देश पुढे सरसावत आहेत. त्यातही आशियामधील रशिया-भारत-चीन या तीन देशाकडे अवघ्या युरोपचे लक्ष लागले आहे. या तीन देशांची एकी झाल्यास त्याचा परिणाम युरोप आणि अमेरिकेच्या राजकारणावर पडणार आहे. यालाच RIC म्हटले जात आहे. या तिनही देशांना डोनाल्ड ट्रम्प टेरिफ कार्डाचा धाक दाखवून ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे अमेरिकेविरोधात आता या RIC ची ताकद मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहेत. भारत आणि रशियामधील मैत्री सर्वश्रुत आहे. (Donald Trump)
पण भारताचा चीनवर अद्यापही हवा तेवढा विश्वास नाही. यासाठी आता रशियाचे अध्यक्ष ब्लादेमिर पुतिन यांनी पुढाकार घेतला असून ते लवकरच भारताच्या दौ-यावरही येणार आहेत. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या मुनिरची पुन्हा भेट घेण्याची बातमी असतांना भारत, रशिया आणि चीन या तीन देशातील वाढती मैत्री ही अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारी ठरणार आहे. भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर 50% कर लादलाच पण पुढच्या काही दिवसात यात अधिक वाढ करणार अशी धमकीही दिली आहे. अशीच धमकी चीन आणि रशियालाही ट्रम्प देत आहेत. ट्रम्प यांच्या या टेरिफ कार्डाविरोधात भारत खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र आहे. भारतानं आत्ताच अमेरिकेला जाणारा तांदूळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत अमेरिकेला जशासतशे उत्तर द्यायला तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (International News)
भारतासोबत चीननंही ट्रम्प यांच्या या टेरिफ कार्डाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चीन सरकारनं जाहीर केलं आहे की, टेरिफ कार्डाच्या मुद्द्यावर भारत आणि ब्राझीलसारख्या देशांसोबत रहाणार आहे. ही घोषणा होत असतांनाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सात वर्षांनी चीनला जात असल्याची बातमी आली आहे. एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनला जाणार असले तरी या सर्वामागे RIC या तीन देशांच्या एकीची ताकद किती आहे, याची चाचपणी नक्की होणार आहे. भारत, रशिया आणि चीनची RIC ही संघटना पुन्हा सक्रिय झाल्यास त्याचे जागतिक राजकारणात मोठे बदल होणार आहेत. याचा फटका अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला बसणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी टेरिफ कार्डाच् मुद्दा अती ताणून स्वतःच्या पायावर कु-डाड मारल्याचे मत व्यक्त होत आहे. RIC बाबत चर्चा सुरु झाल्या तेव्हाच भारतानंही आपली खंबीर भूमिका जाहीर केली. (Donald Trump)
भारत आपल्या देशातील शेतक-यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट शब्दात पंतप्रधान मोदी हे सांगत होते तेव्हाच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाच्या भेटीवर होते. तिथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशिया भारतासोबत सक्रिय सहकार्य करणार असे या भेटीत स्पष्ट करण्यात आले. या सर्व घडामोडी रशियामध्ये चालू असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 2018 नंतर पंतप्रधान मोदी चीनला जात आहेत. या दरम्यान या दोन्ही देशांमध्ये अनेकवेळा सीमातणाव आला आहे. मात्र आता या दोन्ही देशांना, विशेषतः चीनला भारताची गरज जास्त लागू लागली आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील चर्चा वाढल्या आहेत. (International News)
===================
हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्पचा भारतावरील राग अमेरिकन नागरिकांचा खिसा रिकामी करणार
===================
चीननं या चर्चा सकारात्मक होत असल्याचे सांगतिले. शिवाय भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेसाठीही परवानगी दिली. सोबतच जून 2025 मध्ये भारत-चीनने व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी व्यापार सहकार्य वाढवण्यास आणि 2020 पासून बंद असलेली थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. या सर्वातूनच पुन्हा आता RIC चा मुद्दा उठला आहे. भारत, रशिया, चीन या तिन्ही देशांवर अमेरिका कुठल्या ना कुठल्या कारणानं हुकूमत चालवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या टेरिफ कार्डाचा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला असला तरी आत्तापर्यंत जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, त्यांनीही या तिनही देशांना कायम वेढीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच RIC ही संघटना भक्कम झाली तर अमेरिकेचे वर्चस्व संपवता येणार आहे. यामुळेच जगाचे लक्ष आता या RIC च्या एकीकडे लागले आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics