अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी राहिला आहे. मात्र त्याआधीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा कार्यकाल कसा असेल याची चुणूक मिळायला लागली आहे. कारण ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारत फर्स्ट अमेरिका हे घोषवाक्य तयार केले होते. त्यानुसारच त्यांची वाटचाल असणार आहे. याचा सर्वात अधिक फटका भारतीय तरुणांना बसण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो भारतीय तरुण अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात आणि मग तिथेच नोकरीनिमित्तानं स्थायिक होतात. आत्ताही असे अनेक तरुण अमेरिकेत कार्यरत आहेत. (Donald Trump)
या तरुणांना अमेरिकेतील कंपन्यांनी नोकरीची हमी देत ऑफर लेटरही दिले आहे. पण डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर काय धोरण स्विकारलतील याची हमी या कंपन्यांना नाही. त्यामुळेच त्यांनी ज्या तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर दिले आहे, ते रद्द करण्यात आले आहे. एक-दोन नाही तर असा अनेक तरुणांना आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यातील अनेक तरुणांनी अमेरिकेतील विद्यापीठात उच्चपदवी संपादन केली आहे. त्यासाठी त्यांनी मोठे शैक्षणिक कर्ज घेतले आहे. आता या कर्जाची परतफेड कशी करायची हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. शिवाय अमेरिकेत नोकरीशिवाय फार काळ रहाताही येणार नाही, याची त्यांना जाणीव असल्यामुळे या तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तसाच तणाव उच्चपदवी घेणा-या विद्यार्थ्यांमध्येही आहे. हे विदयार्थी सध्या शितकालीन सुट्टीसाठी भारतात परतले होते. (International News)
मात्र त्यांना मुदतीआधी परत बोलवून घेण्यात येत आहे. ट्रम्प सत्तेत आल्यावर 20 जानेवारीपासून यासंदर्भातील नियम बदलतील अशी अटकळ काही महाविद्यालयांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत अमेरिकेत येतांना अडचण येऊ शकते. म्हणूनच या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना परत बोलावण्यात येत असले तरी आपले भविष्य कसे असेल असा तणाव या विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या सत्तेत येण्यापूर्वी मोठ्या घडामोडी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील एक म्हणजे, उच्चशिक्षण घेतलेल्या भारतीय तरुणांच्या हातातील ऑफर लेटर मागे घेण्यास अमेरिकन कंपनींनी सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यावरच यासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली होती. व्हिसा धोरण, इमिग्रेशन समस्या याबाबत ट्रम्प यांनी आपली मते जाहीर केली होती. (Donald Trump)
मुळ अमेरिकन नागरिकांना रोजगार अधिक मिळाले पाहिजेत आणि अन्य देशातून येणा-या नागरिकांवर बंधने आणावीत, या विचाराचा पहिल्या दिवसापासून त्यांनी पाठपुरावा केला आहे. शिवाय H-1B व्हिसाची व्याप्ती मर्यादित करण्यासाठी ते प्रयत्नशील रहाणार आहेत. याची सुरुवात 20 जानेवारीपासूनच होईल, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच ते प्रथम H-1B व्हिसाबाबत कडक धोरण स्विकारणार हे आता जाहीर आहे. असे झाले तर येथे शिक्षणाच्या निमित्तानं आलेल्या विद्यार्थ्यांना पुढे नोकरी करण्यात अडथळा येऊ शकतो. हा धोकाच आता अमेरिकेच्या कंपन्यांनी ओळखला आहे. सध्या हा व्हिसा ज्यांना मिळतो, त्यामध्ये 75 टक्के भारतीय तरुण आहेत. आता त्यातील काही तरुणांना नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
या तरुणांना अमेरिकेत राहणेही कठिण होणार आहे. त्यांना ज्या कंपन्यांनी नोकरीची हमी देत ऑफर लेटर दिले होते, त्यांनी ते रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. एच-1बी व्हिसा हा अमेरिकेतील परदेशी लोकांसाठी सर्वात मोठा तात्पुरता कामाचा व्हिसा आहे. हा “योग्यता आणि क्षमता” यांच्या आधारावर परदेशी कामगारांना द्यावा अशी शिफारत संबंधित कंपनीकडून करण्यात येते. मात्र आता त्याच कंपन्या नोकरी देत नसल्यामुळे भारतीय तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या अमेरिकेत 2.5 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातही आयटी क्षेत्रातील तरुणांची संख्या जास्त आहे. या तरुणांना तेथील कंपन्या मोठ्या पगारावर नोकरी देतात. त्यातून शिक्षणासाठीचे कर्ज किमान तीन वर्षात फेडता येते. मात्र याच तरुणांपुढे आता शिक्षणासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. (Donald Trump)
सई बने