भारतातील मतदार याद्यांमध्ये गडबड आहे, असा आरोप अनेकवेळा विरोधक कायम सत्ताधारी पक्षावर करत असतात. या विरोधकांनी आता अमेरिकेत भारतीय मतदान प्रक्रियेबद्दल जे मत व्यक्त करण्यात आले आहे, ते नक्की ऐकावे असेच आहे. कारण जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये आता भारतीय मतदार प्रक्रियेचा अभ्यास कऱण्याच्या सूचना खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या आहेत. भारतीय मतदार प्रक्रिया ही चांगली असून अमेरिकेतही तशीच मतदार प्रक्रिया करण्याचा मानस असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तेथील मतदार यंत्रणा सुधारण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याची सुरुवात ट्रम्प यांनी मतदार याद्यांपासून केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदार यादीत नावं असलेल्या नागरिकांची ओळख पटविण्याची सूचना केली आहे. निवडणूक विभागाच्या अधिका-यांनी त्यांनी सर्व मतदारांचे डेटा तपासण्याचा आदेश दिला आहे. (Donald Trump)
ट्रम्प यांनी मतदार पद्धतीबाबत दिलेल्या आदेशानुसार मतदार नोंदणीसाठी अमेरिकन नागरिकत्वाचा पुरावा अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय निवडणुकीच्या दिवसापर्यंत सर्व मतपत्रिका मिळाव्यात अशी तरतूदही करण्यात आली आहे. हे सर्व आदेश देतांना त्यांनी भारतातील मतदार प्रक्रियेचा अभ्यास करण्याच्या सूचनाही संबंधिक विभागाला दिल्या आहेत. भारतामध्ये लोकसभा मतदानाची प्रक्रिया होते, त्याबाबत यापूर्वी एलॉन मस्क यांनीही कौतुक केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदार याद्यांबाबत ज्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार राज्यांना आता संघीय संस्थांसोबत मतदार याद्या शेअर कराव्या लागणार आहेत. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्येही ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. अमेरिकेत होणारी पोस्टल मतदान प्रक्रिया कायम वादात सापडते. ट्रम्प यांनीही या प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. ट्रम्प यांच्या मते, यातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून मतदानासाठी जे पात्र नाहीत, तेही यातून मतदान करतात. याबाबत आता संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिल्यानं खळबळ उडाली आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेत सुमारे 2.13 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा सहज उपलब्ध नाही. (International News)
मात्र हे संघीय निवडणुकीत सहभाग घेतात. आता या सर्वांना मतदान करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. भारतात मत देतांना मतदाराचे प्रमाणपत्र तपासण्यात येते. त्यात निवडणूक विभागाचे ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट किंवा अन्य मान्य कागदपत्रांचा समावेश असतो. आता अमेरिकेतही अशाच पद्धतीचा कायदा करण्याच्या विचारात ट्रम्प आहेत. निवडणूक सुधारणांच्या आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी याच भारतीय प्रणालीचा उल्लेख करत मतदार आणि पोस्टल मत यांची कडक तपासणी झालीच पाहिजे, यावर भर दिला आहे. ट्रम्प यांच्या नव्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी मतदारांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. याशिवाय, निवडणुकीच्या दिवसापर्यंत फक्त मेल-इन किंवा पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. ट्रम्प हे यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी झाल्याचे घोषित झाल्यावरही कॅलिफोर्निया राज्यातील पोस्टल मतांची मोजणी बाकी होती. (Donald Trump)
==============
हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
ही मतमोजणी प्रक्रिया काही दिवस चालली. या दरम्यान भारतातील काही राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्यात मतमोजणी होऊन निकालही जाहीर झाला होता. या सर्वांवरुन अमेरिका आणि भारत यांच्यातील मतदार प्रक्रियेची तुलना करणारे अनेक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. याचीच दखल घेत एलॉन मस्क यांनी भारताकडून बरेच शिकण्यासारखे असल्याचे सांगितले होते. अमेरिकेतील अनेक अधिकारी टपाल तिकिटांशिवाय मतपत्रिका स्वीकारत असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी होत असल्याचे मस्क यांनी सांगितले होते. आता ट्रम्प यांनी याच मुद्द्याला हात घातला असून निवडणुकांमध्ये गैर-अमेरिकन नागरिकांना देणगी देण्यापासून रोखण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला त्यांची मते योग्यरित्या मोजली जातील आणि त्याच्या मताशी कोणताही बेकायदेशीर छेडछाड होणार नाही याची खात्री देणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. या सर्वामधून भारताताली मतदार प्रक्रियेबाबत ओरड करणा-या विरोधकांनाही समज मिळाली आहे. (International News)
सई बने