Home » बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर: गुकेश डी

बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर: गुकेश डी

by Team Gajawaja
0 comment
Dommaraju Gukesh
Share

भारतातील बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर गुकेश डी (Dommaraju Gukesh) हा जगाच्या इतिहासात ग्रँन्डमास्टरचा पुरस्कार मिळवणारा दुसरा कमी वयातील तरुण आहे. गुकेशने वयाच्या ७ व्या वर्षापासूनच बुद्धीबळ खेळ खेळण्यास सुरुवात केली होती. वर्ष २०१९ मध्ये तो सर्वाधिक वयात भारतीय ग्रँन्डमास्टर झाला होता. खरंतर भारतातील तो युवा ग्रँन्डमास्टर झालाच पण तो जगातील ही सर्वाधिक युवा ग्रँन्डमास्टर होण्यासाठी फक्त १७ दिवस शिल्लक राहिले होते. त्याने याच वर्षात बुद्धीबळ ओलंपियामध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्याचे वय आता अवघे १६ वर्ष आहे.

गुकेश याची आई एक माइक्रोबायोलॉजिस्ट असून त्याचे वडील सर्जन आहेत. त्यांचे शेड्युल नेहमीच व्यस्त असायचे. त्यामुळे त्यांना गुकेशला आपला कमी वेळ द्यावा लागायचा. त्याचे वडिल रजनीकांत यांनी द इंडियन एक्सप्रेस सोबत बातचीत करताना असे म्हटले की, सर्वसामान्यपणे मी जेव्हा त्याला शाळेत घ्यायला जायचो तेव्हा अशी समस्या होती की, शाळा सुटल्यानंतर १५-२० मिनिटे उशिरा तेथे पोहचायचो. त्याच्या आईने सल्ला दिला होता की, त्याला अन्य खेळांऐवजी बुद्धीबळाच्या खेळात टाकले पाहिजे.

Dommaraju Gukesh
Dommaraju Gukesh

त्याच्या आईने पुढे असे म्हटले की, जेव्हा अभ्यासाची गोष्ट असायची तेव्हा त्याला काहीच सांगावे लागायचे नाही. तो स्वत: चा अभ्यास करायचा. जे आमच्यासाठी खरंच उत्तम होते. आम्हाला त्याच्या खोडकर वागण्याचा सुद्धा त्रास व्हायचा नाही. कारण जेव्हा तो शाळेचे एखादे काम करायचा तेव्हा तो काही नियम पाळायचा. जेव्हापासून त्याने बुद्धीबळ खेळ खेळण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचे शिक्षक खुप कौतुक करायचे. ते असे म्हणायचे की, गुकेश उत्तम खेळत आहे. त्याला बुद्धीबळ खेळणे शिकवले नसले तरीही तो उत्तम ते खेळायचा.

हळूहळू गुकेशने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.जेव्हा त्याने वर्ष २०१५ मध्ये एशियन स्कूल बुद्धीबळ चॅम्पियनशिपचा अंडर ९ वर्ग जिंकला होता. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये जागतीक युवा बुद्धीबळ चॅम्पियनशिप सुद्धा जिंकला होता. २०१८ एशियाई युवा बुद्धीबळ चॅम्पियनशिपमध्ये गुकेशने पाच गोल्ड मेडल ही जिंकले होते. तो मार्च २०१८ मध्ये फ्रांसच्या ३४ व्या ओपन डे कॅपले ला ग्रांडे बुद्धीबळ टूर्नामेंटमध्ये एक इंटरनॅशनल मास्टर बनला होता. (Dommaraju Gukesh)

हे देखील वाचा- २४ वर्ष टेनिसमध्ये करियर…२० ग्रँन्ड स्लॅम जिंकणारा ‘रोजर फेडरर’

तर २०१९ मध्ये रशियातील सर्गेई कर्जेकिनला मागे सोडत तो जगातील सर्वाधिक तरुण ग्रँन्डमास्टर बनणार होता. मात्र सर्गेई पेक्षा १७ दिवस मोठा असल्याने त्याला तो रेकॉर्ड तोडता आला नाही. तो १२ वर्ष ७ महिने १७ दिवसाच्या वयातच भारतातील सर्वाधिक युवा ग्रँन्डमास्टर झाला होता. तर सर्गेईने १२ वर्ष ७ महिन्याच्या वयातच हा पुरस्कार मिळवला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.