Home » देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, उत्तर प्रदेश सर्वाधिक पुढे

देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, उत्तर प्रदेश सर्वाधिक पुढे

by Team Gajawaja
0 comment
Domestic Violence
Share

देशात महिलांच्या प्रति वाढत्या गुन्हांमध्ये वर्षानुवर्ष वाढ होत चालली आहे. कोविड१९ च्या काळात सुद्धा राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशभरातून २३,७०० तक्रारी आल्या होत्या. तर याची संख्या २०२१ मध्ये वाढून ३०,८०० झाली. तसेच २०२२ मध्ये त्यात आणखी थोडी वाढ होत ३०,९०० वर पोहचली. एनसीडब्लूला मिळालेल्या तक्रारींनुसार, प्रत्येक वर्षाला वाढ होणाऱ्या अशा घटनांमागील कारण म्हणजे पीडितांपर्यंत अगदी सहज पोहचणे. (Domestic Violence)

देशभरात सर्वाधिक प्रकरण ही उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील राज्यांमधील आहेत. वर्ष २०२१ मध्ये या तीन राज्यांमधून सर्वाधिक घटना आल्या होत्या. वर्ष २०२२ मध्ये घरगुती हिंसाचाराविरोधात एकूण ६९०० तक्रारी आल्या.

Domestic Violence
Domestic Violence

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, एनसीडब्लूच्या राज्यानुसार आकडेवारीच्या आधारावर सर्वाधिक तक्रारी म्हणजेच ५५ टक्के तक्रारी या उत्तर प्रदेशातील आहेत. या तक्रारींमुळे युपी मधील महिलांसंदर्भातील विविध गुन्हे टॉप लिस्टवर आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली (१० टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र (५ टक्के). येथे मुख्य गोष्ट अशी की, २०२१ मध्ये सुद्धा या तीन राज्यांमधून सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या. वर्ष २०२० ते २०२१ मध्ये महिलांसंबंधित गुन्हांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली. तर २०२२ मध्ये ती कमी होण्याऐवजी त्यात थोडी वाढ ही झाली. याच दरम्यान असे दिसून आले की, २०२२ हे वर्ष जगाला कोविड मधून बाहेर पडण्यासारखे होते. तरीही ३०,९०० तक्रारी दाखल केल्या गेल्या.

NCW च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२२ मध्ये सर्वाधिक तक्रारी या तीन श्रेणींमधील आहेत. ज्यामध्ये सन्माच्या अधिकाराला सुरक्षित करण्यासाठी (३१ टक्के), घरगुती हिंसेचाराच्या प्रति महिलांची सुरक्षा (२३ टक्के) आणि हुंड्यासह विवाहित महिलांचे लैंगिक शोषणाचे मुद्दे (१५ टक्के) यांचा मुख्य रुपात समावेश आहे. यामध्ये एकूण तक्रारींपैकी ५५ टक्के युपी, दिल्लीतील १० टक्के आणि महाराष्ट्रातील ५ टक्के. (Domestic Violence)

हे देखील वाचा- हिटलरसोबत मिळून हजारो लोकांना केले ठार, वयाच्या ९७ व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

या सर्व वाढत्या तक्रारींवर एनसीडब्लूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी असे म्हटले की, सार्वजनिक सुनावणीच्या माध्यमातून या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.तर, सातत्याने सोशल मीडियासह आपल्या मंचाच्या माध्यमातून महिलांना पुढे येण्यासाठी, बोलण्याची आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खुप प्रयत्न केला जातो. या सर्व प्रयत्नांमुळे महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधित आकडेवारीत ही वाढ होते. त्याचसोबत महिलांच्या प्रति गुन्ह्यांचा प्रश्न आहे तर आसाम, ओडिशा, दिल्ली, तेलंगणा, हरियाणा आणि राजस्थान मध्ये ही महिलांच्या गुन्ह्यांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.