Home » स्थलांतरीत मतदारांसाठी ECI ची नवी सुविधा, मतदान करणे होणे सोप्पे

स्थलांतरीत मतदारांसाठी ECI ची नवी सुविधा, मतदान करणे होणे सोप्पे

by Team Gajawaja
0 comment
National Voters Day
Share

देशाअंतर्गत स्थलांतरित मतदारांसाठी निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था करणार आहे की, ज्यामुळे आता मतदान करण्यासाठी व्यक्तीला आपल्या राज्यात परतावे लागणार नाही. म्हणजेच मतदार ज्या ठिकाणी किंवा राज्यात काम करत असेल तेथेच त्याला निवडणूकीसाठी मतदान करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने नवी मतदान मशीन तयार केली आहे. ज्याचे नाव रिमोट वोटिंग मशीन आहे. ईसीआयने सर्व राजकीय पक्षांना आगामी १६ जानेवारीला आरवीएम सारखे काम करणार आहे. याचा डेमो दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. डेमो पाहिल्यानंतर सर्व राजकीय दलाला कोणत्याही गोंधळाच्या स्थितीत ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक आयोगाला आपली मतं पाठवण्यास सांगितले आहे. एका आरवीएमच्या माध्यमातून ७२ निवडणूक क्षेत्रांचे मतदान सांभाळता येणार आहे.(Domestic Migrant Voters)

निवडणूक आयोगाच्या एका विधानानुसार, रिमोट वोटिंगवर एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार लागू करण्यासाठी काही कायदे, प्रशासनिक प्रक्रियात्मक, तंत्रज्ञान किंवा प्रौद्योगिकी संबंधित आव्हानांवर राजकीय दलांचा विचार मागितला आहे. याच्या माध्यमातून एक रिमोट पोलिंग बूथच्या माध्यमातून २७ निवडणूक क्षेत्रांमध्ये रिमोट वोटिंगची सुविधा दिली जाऊ शकते. यामुळे स्थलांतरित मतदारांना मतदान करण्यासाठई आपल्या राज्यात किंवा शहरात जाण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना ते काम करतात त्या ठिकाणाहून मतदान करता येणार आहे.

भारतातील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी असे म्हटले की, रिमोट वोटिंग एक परिवर्तनकारी पाऊल ठरु शकते. आतापर्यंत भारतात रिमोट वोटिंगची सुविधा नव्हती. रोजगारासाठी दुसऱ्या राज्यत राहणाऱ्या देशाअंतर्गत प्रवासी मतदारांना मत टाकण्यासाठी राज्य, शहर, घरी परतावे लागते.(Domestic Migrant Voters)

हे देखील वाचा- अचानक पैशांची गरज भासल्यास PPF खात्यातून अशाप्रकारे काढा पैसे

निवडणूक आयोग ३० कोटींहून अधिक मतदारांना मताधिकाराचा वापर करता येणार नाही म्हणून चिंतेत आहे. मतदार एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यानंतर काही कारणास्तव त्याला निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी आपल्या मूळ मतदार केंद्राच्या ठिकाणी परतता येत नाही. ईसीआयने असे म्हटले की, देशाअंतर्गत स्थलांतरित मतदारांना मतदान करता येत नाही हा चिंतेचा विषय आहे. निवडणूक आयोगाने आपल्या विधानात असे म्हटले की, २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणूकीत ६७.४ टक्के मतदान झाले होते. जवळजवळ ३३ टक्के मतदारांना मतदान करता आले नाही. यामध्ये मोठा हिस्सा प्रवासी मतदारांचा असेल, जे मतदान करण्यासाठी आपल्या घरी पोहचू शकत नाहीत. त्यांना काही कारणामुळे नव्या निवास स्थानावर स्वत:ला मतदाराच्या रुपात रजिस्ट्रेशन करता येत नाही किंवा करु शकतो. देशाअंतर्गत प्रवाशांच्याद्वारे मतदानात असमर्थता मतदानाच्या टक्क्यांमध्ये सुधार आणण्यासाठी आणि निवडणूकीत भागीदारी सुनिश्चित करण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.