Dolgyal Practice : तिबेटीन धर्मगुरु दलाई लामा यांनी पब्लिकली डोरजे शुगदेन साधनेचा विरोध केला आहे. याला दोलग्याल साधना असे देखील म्हटले जाते. ही पहिलीच वेळ नाही की, दलाई लामा यांनी या साधनेला समाज विरोधी म्हटले आहे. खरंतर, तिबेटी बौद्ध धर्मात अनेक रक्षक देवता (Protector Deities) आहेत. ज्या साधकांच्या आध्यात्मिक मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांपासून संरक्षण करतात, वाईट शक्तींना दूर ठेवतात आणि ध्यान-साधना यशस्वी होण्यास मदत करतात. याच रक्षक देवतांपैकी एक आहे दोलग्याल किंवा शुगडेन (Dorje Shugden). हिची साधना काही विशिष्ट लामा किंवा भिक्षूंनी केली असून, याभोवती अनेक धार्मिक, राजकीय आणि आध्यात्मिक विवाद देखील उभे राहिले आहेत. तर जाणून घेऊया दोलग्याल साधना नक्की काय आहे याबद्दल सविस्तर…
दोलग्याल ही देवता मूळतः एक रुद्रस्वरूप असलेली रक्षक शक्ती आहे. तिला रागीट, परंतु भक्तांसाठी संरक्षक स्वरूप मानले जाते. तिबेटी परंपरेनुसार, ही साधना मुख्यतः गेलुग पंथातल्या काही लामा आणि अनुयायांनी स्वीकारली. असे मानले जाते की दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी एका ज्ञानी लामाच्या मृत्यूनंतर त्याचे रौद्र रूप दोलग्याल या देवतेच्या रूपात प्रकट झाले. साधक तिच्या कृपेसाठी ध्यान, मंत्र आणि विशेष पूजा करतात. दोलग्यालची मूर्ती रागीट असून, डोक्यावर मुकुट, हातात तलवार आणि वाघाची कातडी परिधान केलेले रूप दिसते.

Dolgyal Practice
तथापि, १४व्या दलाई लामा यांनी दोलग्याल साधनेचा विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की ही साधना तिबेटी बौद्ध धर्माच्या मूळ तत्त्वांना विरोध करणारी आहे. या साधनेमुळे बौद्ध परंपरेत फूट पडते, आणि ती एक प्रकारे “हिंसक देवतेच्या पूजेसारखी” आहे. त्यामुळे १९९०च्या दशकात दलाई लामा यांनी आपल्या अनुयायांना दोलग्यालची साधना बंद करण्याचं आवाहन केलं. हे आवाहन वादग्रस्त ठरलं, कारण काही लामांनी याला तीव्र विरोध केला आणि या साधनेच्या बाजूने संघटना स्थापन केल्या.(Dolgyal Practice)
===========
हे देखील वाचा :
Dholavira 5000 वर्षांपूर्वी हरवलेलं रहस्यमयी शहर !
UNESCO च्या जागतिक वारसा यादीत हेच १२ किल्ले का निवडले?
Moonquakes : चंद्रावर भूकंप का येतो? किती होते नुकसान? घ्या जाणून
=============
आजही दोलग्याल साधना करणारे साधक तिबेटी बौद्ध धर्मात वेगळी ओळख बाळगतात. काही जण याला रक्षक साधना मानतात, तर काही जण हे राजकारणाने प्रेरित मतभेद मानतात. भारतात, विशेषतः हिमाचल प्रदेशातील धर्मशाला परिसरात यावरून अनेक वाद झाले आहेत.
दरम्यान, दोलग्याल साधना ही तिबेटी बौद्ध धर्मातील एक विशिष्ट पण विवादास्पद साधना आहे. ती काही साधकांसाठी श्रद्धेचा भाग आहे, तर काहींसाठी ही धर्मविरोधी कृती. तिच्यामागे असलेली गूढता, भक्ती आणि राजकारण यामुळे आजही ही साधना चर्चेचा विषय बनली आहे. धार्मिक विश्वास आणि आध्यात्मिक मार्ग यामध्ये योग्य समतोल साधणे ही या संपूर्ण प्रकरणाची गरज आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics