नुकतेच एक संशोधन करण्यात आले त्यामध्ये आनंदाश्रू हे केवळ मनुष्यांनाच नव्हे तर वर्षानुवर्षे व्यक्तीसोबत राहिलेल्या कुत्र्याच्या डोळ्यांत सुद्धा उभे राहतात. व्यक्तींप्रमाणेच त्यांना सुद्धा भावना असतात. जेव्हा ते आपल्या मालकांसोबत काही वेळ घालवतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी येते, त्याचे कारण असे की, ते त्यांच्यासोबत असले की स्वत:ला आनंदित समजतात. खरंतर जनावरांच्या भावना सांगण्यासंदर्भात काही संशोधन ही करण्यात आली. काही जनावरांच्या डोळ्यांमधून पाणी सुद्धा खुप येते. पण आनंदाश्रू हे कुत्र्यांच्या डोळ्यांमधून बाहेर येतात हे नक्की. (Dog’s joyful tears)
नव्या संशोधनानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या कुत्र्याला सोडून काही दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जाता तेव्हा ते उदास होतात. पण जेव्हा तुम्ही परत येता आणि त्यांना भेटता तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. कारण ते तुम्हाला भेटून ऐवढी आनंदी होतात की, आपल्या हावभावासह डोळ्यांमधील अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना जाहीर करतात.
कशी केली जाते अश्रूंची चाचणी
हा अभ्यास जर्नल करेंट बॉयोलॉजी मध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये कुत्र्यांच्या डोळ्यांमध्ये येणाऱ्या अश्रूंच्या पाण्याची चाचणी केली. यामध्ये डोळ्यांच्या खाली एक खास पट्टी ठेवून डोळ्यांमधून बाहेर आलेल्या द्रव पाहिले जाते. संशोधकांच्या मते कुत्र्यांच्या डोळ्यांमधील द्रव हे सामान्य स्थितीत तपास केला असता तर ते सामान्य रुपात आपल्या मालकांसोबत व्यवहार करतात.
त्यानंतर डोळ्यांखालील द्रव्याची चाचणी केली, जेव्हा त्यांचे मालक त्यांना सोडून कुठेतरी निघून जातात आणि काही वेळानंतर परत येतात. हे सुद्धा पाहिले गेले की, जर कुत्र्यांना आपला मालक सोडून जात असेल तर सहा-सात तासांनी त्यांच्या डोळ्यांची स्थिती कशी असते.

हावभाव आणि डोळ्यांनी सांगतात आपल्या भावना
असे मानले जाते की, कुत्रे आपल्या हावभावांसह आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून खुप भावना सांगत असतात. या संधोशनात संशोधकांनी एक जपानच्या अजाबु युनिव्हर्सिटीतील ताकेफुमी किकुशुई असे म्हणतात की, आम्ही या पूर्वी कधीच ऐकले नाही की, जनावरांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू उभे राहतात.
त्याचसोबत खासकरुन अशा भावना निर्माण होतात तेव्हा आक्सीटोसिन किंवा लव्ह हार्मोन जबाबदार असतात. हे बॉंन्डिंग, नीतेसंबंधांमध्ये मुख्य भुमिका निभावतात. नवरा-बायको, आई-मुलांच्या नात्यामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या सुद्धा आक्सीजटोसिनपासून लव्ह हार्मोन निर्माण होतात.(Dog’s joyful tears)
हे देखील वाचा- हत्ती दिन साजरा करण्याची कशी झाली सुरुवात? जाणून घ्या उद्देश आणि खास गोष्टी
संशोधकांनी कसे सुरु केले काम
किकुसुई आणि त्यांच्या सहाय्यकांनी ही आइडिया अशावेळी आली जेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांचा एका पाळीव कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात जेव्हा त्याचे नर्सिंग केले जाते. त्यावरुन असा अंदाज लावण्यात आला की, अश्रू हे आक्सीटोसिनमुळे येत असतील. त्यांनी हे सुद्धा पाहिले की, प्रत्येक व्यक्तीला भेटण्याऐवजी जेव्हा त्यांची काही वेळानंतर भेट आपल्या मालकासोबत किंवा ओळखीच्या व्यक्तीसोबत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अधिकच अश्रू येतात.