Home » Bhangarh Fort : भुतांची ‘भानगड’ असलेला हॉन्टेड भानगढ किल्ला

Bhangarh Fort : भुतांची ‘भानगड’ असलेला हॉन्टेड भानगढ किल्ला

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhangarh Fort
Share

‘भूत’ नुसते नाव जरी उच्चारले तरी अनेकांची पाचावर धारण बसते. बरेच लोकं यावर विश्वास ठेवत नाही आणि ‘भूत’ ही संकल्पना काल्पनिक असल्याचे सांगतात. मात्र आजच्या आधुनिक काळात देखील भूत या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोकं आपल्याला सहज सापडतील. भुताबद्दल अनेक आख्यायिका देखील आपण अनेकांकडून ऐकत असतो. मात्र भूत आहे की नाही…? जा एक वादाचा विषय आहे. काही लोकांच्या दृष्टीने भूत केवळ एक कल्पना आहे, तर काहींना वाटते की, या जगात भुतांचे अस्तित्व आहे. (Bhangarh Fort)

आता या वादात काही आम्हाला पडायचे नाही. मात्र हे तर नक्कीच खरे आहे की, आजही भूतांबद्दल अनेक गोष्टी ऐकिवात आहे. जेव्हा जेव्हा भुतांचा किंवा भुतांच्या ठिकाणांचा विषय निघतो तेव्हा अनेकांच्या डोक्यात सर्रकन एक ठिकाण येते आणि ते म्हणजे भानगढ किल्ला. आजवर या किल्ल्याबाबत आपण कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी ऐकल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला याबद्दल रंजक माहिती देणार आहोत.(Marathi Top Stories)

भानगढचा किल्ला (Bhangarh Fort) जयपूरपासून ८० किलोमीटर तर दिल्लीपासून ३०० किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला भुतांनी पछाड्लेल्याचं मानलं जातं. म्हणूनच ‘हॉन्टेड प्लेस’ अशी या किल्ल्याची ओळख आहे. कधी काली अतिशय सुंदर आणि आकर्षक असणारा हा किल्ला निर्जन झाला आहे. या किल्ल्याचे आता तोडके मोडके काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत. असे सांगितले जाते की, एका तांत्रिकाच्या श्रापामुळे या किल्ल्याची अशी अवस्था झाली आहे.(Marathi Latest News)

=============

हे देखील वाचा : Elon Musk : मस्क, आयव्हीएफ आणि वाद !

=============

Bhangarh Fort

तंत्रिकाचा श्राप
एका तांत्रिकाने दिलेल्या श्रापामुळे हा किल्ला कोसळला, त्यामुळे या किल्ल्यामध्ये राहाणारे २५० लोकं किल्ल्यामध्ये गाडले गेले. असं मानलं जातं की, आजही त्या लोकांचा आत्मा या किल्ल्यात फिरत आहे. अनेकांनी तर त्यांना या ठिकाणी काही विचित्र घटना आणि अनुभव आल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे सुर्यास्तानंतर या किल्ल्यामध्ये कोणालाही जायला परवानगी नाही. येथे रात्रीच्या अंधारात काही पैरानॉर्मल एक्टिविटीज होतात. दरम्यान हा किल्ला १७ व्या शतकात आमेरचा मुघल सेनापती मानसिंग याचा धाकटा भाऊ राजा माधो सिंग याने बांधला होता. किल्ल्याच्या परिसरात हवेल्या, मंदिरे आणि निर्जन बाजारपेठेचे फक्त अवशेष उरले आहेत.(Bhangarh Fort Story)

भानगढची राजकन्या सुंदर होती. तिच्या सुंदरतेच्या चर्चा संपूर्ण राज्यामध्ये व्हायच्या. सगळ्यांनाच त्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा होती. याच ठिकाणी एक तरुण राहात होता, तो राजकन्येला पाहाताच तिच्या प्रेमात पडला. तो तरुण काळ्या जादू करायचा. त्यामुळे त्याने राजकन्येला आपल्या काळ्या जादूने वश करण्याचे ठरवले. राजकुमारी जिथून अत्तर खरेदी करायची तेथील राजकन्येच्या आवडत्या अत्तरावर त्याने काळी जादू केली. मात्र ही गोष्ट त्या राजकन्येला समजली.(Trending News)

राजकन्येने घेतलेल्या अत्तराची कूपी दगड मारून फोडली. ते अत्तर ज्या दगडावर पडलं, तो दगड मात्रिकाच्या मागे लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र मरताना त्या तांत्रिकाने भानगढ किल्ल्याला श्राप दिला. त्याच्या श्रापामुळे मध्यरात्रीच्या सुमारास हा किल्ला कोसळला आणि किल्ल्यात राहात असलेल्या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला. आजही त्यांचा आत्मा या वास्तूत असल्याचं बोललं जातं.(Latest News)

Bhangarh Fort

बलाऊ नाथ साधू कथा
माधोसिंहने भानगढचा किल्ला बांधायला घेण्याच्याही खूप आधीपासून ही जागा बाबा बलाऊ नाथ नावाच्या साधूची ध्यानाची जागा होती. पण त्यानं एक अट घातली. किल्ल्यातली कोणतीही इमारत, वास्तू ही त्याच्या घरापेक्षा उंच नसली पाहिजे. जर कोणत्याही वास्तूची सावली त्याच्या घरावर पडली तर तो किल्ला निर्मनुष्य होईल. माधो सिंहचा नातू अजाब सिंह साधूची ही अट विसरला. त्याने किल्ल्याची उंची वाढवली. त्याची सावली साधूच्या घरावर पडली आणि मग भानगढचा विध्वंस झाला.(Top News)

=============

हे देखील वाचा : Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !

B.R. shetty : ज्यांनी १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना विकली

=============

दरम्यान काही जणांकडून असा देखील दावा केला जातो की, रात्रीच्या वेळी इथे काही व्हिडीओ काढण्यात आले, ज्यामध्ये काही असामान्य घटना होत असल्याचे दिसून आले आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन तटबंदी ओलांडून जावं लागतं. या किल्ल्याला पाच दरवाजे होते. शिवाय किल्ल्यामध्येच रोजच्या जीवनावश्यक गोष्टी मिळण्यासाठी बाजारपेठ देखील होती. सोन्याचांदीच्या दागिन्यांचा जोहरी बाजारही होता.(Indias Haunted Place)

या किल्ल्यामध्ये मनोरंजनासाठी नर्तिकेचा महाल, राज्याच्या मंत्र्यांची निवासस्थानं, काही धनिकांची घरं, घोड्यांचे तबेले, अश्वशाळा, कैद्यांसाठी जेल आदी अनेक गोष्टी किल्ल्यात होत्या. सोबतच शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता यावी यासाठी किल्ल्यात वॉच टॉवर किंवा टेहेळणीचा बुरूज देखील होता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.