Home » छटपूजा माहिती आहे का?

छटपूजा माहिती आहे का?

by Team Gajawaja
0 comment
Chhath Puja Festival
Share

उत्तर भारतातील बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आता पुढचे चार दिवस हे छटपुजेचे (Chhath Puja Festival) असणार आहेत.  हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा जात आहे.  कुटुंबाच्या, पतीच्या, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यदायी आयुष्यासाठी महिला हा सण साजरा करतात.  सूर्याची पूजा करतात आणि उपवास धरतात.  सूर्याला अर्घ्य आणि खास पदार्थांची मेजवानी, सोबतीला भोपळ्यापासून बनवलेला मेनू असा हा या छटपूजेचा थाट असतो.  कार्तिक शुक्ल षष्ठी तिथीला साज-या होणा-या छट पुजेत सूर्याला अर्घ्य देणे महत्त्वाचे मानले जाते.   

ही छट पुजा सूर्य षष्ठी म्हणूनही ओळखली जाते. दिवाळीनंतर सहा दिवसांनी हा सण चार दिवस साजरा होतो.  छठ पूजेमध्ये(Chhath Puja Festival) सूर्यदेव आणि छठी मैया यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.  दिवाळीनंतर साज-या होणा-या या पुजेत कुटुंबाच्या स्वास्थासाठी महिला जवळपास 36 तासांचे व्रत पाळतात.  या दरम्यान घराची स्वच्छता, पहाटेला उठून नामस्मरण आणि सूर्याची पूजा हे महत्त्वाचे टप्पे असतात.  आता हा उत्सुव 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.  छटपुजेला उत्तर भारतात महत्त्व आहे.  आता सर्व भारतभर हा छटपुजेचा उत्सव साजरा होतांना दिसतो.  आपल्या घराची, परिसराची स्वच्छता करुन महिला या उत्सवाची तयारी सुरु करतात.  त्यानंतर सुरु होते ती नैवेद्य करण्याची लगबग.  याला खूप महत्त्व आहे.   यामध्ये तांदूळ, हरभरा डाळ आणि भोपळा, मसूर यांचा वापर होतो.  सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत अनुराधा नक्षत्र असते, हा शुभयोग मानला जातो.  या काळात स्नान करुन मग नैवेद्य करुन महिला या छटपुजा करायला सुरुवात करतात.  या छठ पुजेच्या दुस-या दिवशी खरना दिवस मानला जातो.  म्हणजेच महिला दिवसभर निर्जला उपवास करतात. सायंकाळी खरना पूजन करण्यात येते.  या दिवशी सायंकाळी गुळाची खीर प्रसाद म्हणून घेतली जाते.  ही खीर चुलीवर करण्यात येते.  आता शहरात यासाठी खास व्यवस्था केली जाते. छटपुजेच्या दरम्यान घरोघरी अखंड दीप प्रज्वलित केले जातात.  छटी माता खरना नंतरच घरात प्रवेश करतात असे मानले जाते.  30 ऑक्टोबर रोजी नदीकाठावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात येईल. 31 ऑक्टोबर रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उपवासाची सांगता करण्यात येणार आहे.  

चार दिवस चालणाऱ्या छठ उत्सवाची (Chhath Puja Festival) लगबग मोठी असते.  यासाठी शुभवेळ कोणती, अंघोळीचे नियम कुठले, पूजा साहित्य कोणते घ्यावे, यासाठी महिलावर्गाची तयारी सुरु झाली आहे.  हा उत्सव महिला वर्गाचा असला तरी तो पूर्ण कुटुंबाचा असतो.  कुटुंबाच्या आरोग्याचा असतो.  सूर्याची पूजा करतांना सूर्यांची उर्जा आपल्या कुटुंबाला मिळावी आणि त्याद्वारे येणारा पुढचा थंडीचा मौसम आरोग्यदायी व्हावा अशीच मुळ संकल्पना या व्रतामागे असावी.  तशीच या चार दिवसाच्या व्रताची आखणी केलेली आहे. 

या छटपुजेच्या (Chhath Puja Festival) चार दिवसात एकाच वेळी अन्न प्राशन केले जाते.  यामागे आरोग्यदायी दृष्टीकोन आहे. छठच्या प्रत्येक परंपरेत पवित्रतेची काळजी घेतली जाते.  आहार घेतांनाही तो साधा, सात्विक असेल याची काळजी घेतली जाते.  छटपुजेचा उपवास करणाऱ्या महिला या चार दिवसात नाकापर्यंत लांब सिंदूर लावतात.  याचेही कारण आहे.  वास्तविक, छठ पूजेमध्ये स्त्रिया आपला पती आणि मुलांच्या आरोग्यासाठी 36 तास उपवास ठेवतात. या उपवासादरम्यान विधिपूर्वक लांब सिंदूर लावला जातो. हा सिंदूर आपल्या पतीच्या आणि मुलाच्या आरोग्यासाठी उपकारक मानला जातो.  सिंदूरला मांगल्याचे प्रतिक मानले जाते.  हा सिंदूर कपाळापासून सुरुवात करून पूर्ण कपाळभर भरला जातो.  छटपुजा (Chhath Puja Festival) सुरु झाल्यापासून चार दिवस असा पूर्ण सिंदूर भरला जातो.  मात्र कपाळावर सिंदूर लावण्यासाठी काही खास नियमही आहेत. छटपूजेचे व्रत ज्यांनी केले असेल त्यांनी पहाटे उठून अंघोळ करुन देवाची पुजा करण्याआधी कपाळभर सिंदूर भरण्याची परंपरा आहे.  या चार दिवसात जो प्रसाद बनवला जातो त्यात कांदा आणि लसूण यांचा समावेश नसतो.  रात्रीच्या जेवणात हरभरा डाळ, भोपळ्याची भाजी आणि भात यांचा समावेश असतो.  

=======

हे देखील वाचा : केरळात दिवाळी साजरी करत नाहीत, पण का?

=======

हिंदू मान्यतेनुसार, छठ पूजेच्या दिवशी षष्ठी देवीची पूजा केली जाते. या देवीला ब्रह्मदेवाची मानसपुत्री म्हणूनही ओळखले जाते. काही ठिकाणी तिला सहावी आई म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार ही पूजा वैदिक काळात ऋषीमुनींनी केली होती. असे मानले जाते की षष्ठी मातेची पूजा केल्याने धन आणि अन्न मिळते आणि मुलांचे रक्षण होते. संतानप्राप्तीसाठीही छटपुजा करण्यात येते.  एकूण पुढचे चार दिवस हे सूर्यपूजेचे असणार आहेत.  कुटुंबाच्या आरोग्यासाठी महिला तब्बल 36 तासांचे व्रत करणार आहेत आणि नदीकिना-यावर सूर्याची पूजा करुन आपल्या कुटुंबाला स्वस्थ ठेवण्याची मनोकामना व्यक्त करणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.