श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नागपंचमीचा सण सर्पदेवता आणि महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी मोठ्या मनोभावे नागांची पूजा केली जाते. त्यांना दूध अर्पण केले जाते. नागांसोबतच महादेवाची देखील पूजा करण्याला या दिवशी मोठे महत्व आहे. या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही २९ जुलै रोजी रात्री ११:२४ वाजता सुरू होणार असून, ३० जुलै रोजी दुपारी १२:४६ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार, यावर्षी नागपंचमी मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी साजरी करण्यात येणार आहे. नाग पंचमीची पूजा करण्याचा उत्तम वेळ हा २९ जुलै रोजी सकाळी ०५:४१ ते ०८:२३ पर्यंत असेल. (Marathi News)
नागपंचमीच्या पूजा करण्यामागे अनेक कारणं आहेत. नागपंचमी हा सण नागदेवता आणि सापांना समर्पित आहे. पौराणिक कथांनुसार, नागदेवता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. हा सण साजरा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कुटुंबाला सर्प दंशापासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. शिवाय साप पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी नागपंचमी साजरी केली जाते. हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे, भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीला वाचवले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. नागपंचमी सण साजरा केल्यावर जर कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्यापासून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, त्यांनी आवर्जून नागपंचमीला नागांची पूजा केली पाहिजे. (Todays Marathi headline)
कालसर्प दोष म्हणजे काय?
असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा काल सर्प दोष तयार होतो, त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. कुंडलीतील काल सर्प दोषामुळे व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो. म्हणूनच कालसर्प दोषाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्यांना संततीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांना नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात, या लोकांना त्यांच्या नोकरीत स्थिरता नसते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांना स्वप्नात मृत्यू किंवा साप दिसतात. कालसर्प दोष हा तुमच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतो. त्यासाठी यावर उपाय करणे आवश्यक असते. नाग पंचमीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यावर त्यांना जर काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुमची कालसर्प दोषापासूनही मुक्ती होऊ शकते . (Top Trending News)
नागपंचमीच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर मध अर्पण केले तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो. शिवाय निरोगी आणि उदंड आयुष्य लाभते आणि आजारांपासून मुक्ती मिळते. पत्रिकेतील कालसर्प दोष दूर करायचा असल्यास नागपंचमीला शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे कामात यश मिळते. नागपंचमीला ब्रह्म मुहूर्तावर शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. शिवाय या दिवशी जर धोतराचे फुल भगवान शिवाला अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. महादेवांना सर्वात प्रिय असलेला बेल देखील नागपंचमीला देवाला वाहिल्यास या दोषातून मुक्ती मिळते. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर तांदूळ, चंदन आणि फुले देखील अर्पण करू शकता . या दिवशी शिवाला चंदनासह त्रिपुंड लावा. नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर पाण्यात काळे तीळ घालून अभिषेक केल्याने कालसर्प दोष दूर होतो असे मानले जाते . (Top Stories)
कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करा आणि महामृत्युंजयचा जप करा. यादिवशी चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या सापांच्या जोडीला पवित्र नदीत विसर्जित करा. नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याची सात वेळा प्रदक्षिणा करा. या दिवशी गरिबांना काळे ब्लँकेट दान केल्याने देखील लाभ होतात. या दिवशी सर्पसूक्ताचे पठण करणे देखील चांगले मानले जाते. (Social Updates)
1- ब्रह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा: ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा
इन्द्रलोकेषु ये सर्पा: वासुकि प्रमुखाद्य: ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा
2- कद्रवेयश्च ये सर्पा: मातृभक्ति परायणा ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
इन्द्रलोकेषु ये सर्पा: तक्षका प्रमुखाद्य ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
3- सत्यलोकेषु ये सर्पा: वासुकिना च रक्षिता ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
मलये चैव ये सर्पा: कर्कोटक प्रमुखाद्य ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
4- पृथिव्यां चैव ये सर्पा: ये साकेत वासिता ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
सर्वग्रामेषु ये सर्पा: वसंतिषु संच्छिता ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
5- ग्रामे वा यदि वारण्ये ये सर्पप्रचरन्ति ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
समुद्रतीरे ये सर्पाये सर्पा जंलवासिन: ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
6- रसातलेषु ये सर्पा: अनन्तादि महाबला: ।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा ।।
।। इति श्री सर्प सूक्त पाठ
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. यातून आम्ही कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics