हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याचं एक वेगळंच महत्व आहे. भगवान शंकराला हा महिना खूपच आवडता असल्याने या महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. असं पाहायला गेलं तर या महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात आणि आपल्या घरी भगवान शंकराची मोठ्या भक्ती-भावाने पूजा करतात. या महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास देखील करतात असतात. असं म्हंटलं जातं की या महिन्यात भगवान शंकर-पार्वतीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होते आणि ते आपल्या समस्यांपासून आपली मुक्ती होते. असे काही उपाय देखील आहेत जे केल्याने आयुष्यात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते. या व्यतिरिक्त आयुष्यातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते. चला मग जाणून घेऊया अशाच काही गोष्टींबाबत.
हे केल्याने येणार आयुष्यात सुख
-श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून मंदिरात शिवलिंगावर जल आईपण करावे आणि काळे तीळ दान करावे.
– रोज सकाळी घरात गौमूत्र शिंपडा.
– श्रावण महिन्यात बैलाला घास द्या.
– गोर गरिबांना जेवण द्या.
– उपवास केला असल्यास मनात सतत ‘ओम नमः शिवाय’ चा जप करणे.
लग्न न होत असल्यास हे करून पाहा
-लग्न होत नसल्यास रोज सकाळी दूध मध्ये केसर टाकून महादेवांचा अभिषेक करावा.
-श्रावण महिन्यात शंकर पार्वतीची एकत्र पूजा केलास विवाह मधील अडचणीचे निवारण तर होणारच मात्र त्याच सोबत पुढील वैवाहिक जीवन मध्ये येणाऱ्या बाधा देखील नष्ट होणार.
संतती प्राप्ती हे करा उपाय
लग्नाला अनेक वर्षे होऊन देखील काही दांपत्यांना काही कारणासाठी संतती प्राप्ती होत नसतील तर त्यांनी नक्की एकदा हे उपाय करून पाहावे. नेमके काय आहे हे उपाय.
-श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून घरातल्या देवऱ्याची पूजा अर्चना करून मंदिरात जाऊन शिवलिंगाचे पूजन करावे. या नंतर गहूंच्या पीठाने ११ शिवलिंग बनवा आणि त्या प्रत्येक शिवलिंगाचे शिव स्तोत्र म्हणून ११ वेळा जलाभिषेक करावा. तर या अभिषेकातील थोडं पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. हे सर्व नित्य नियमितपणे २१ दिवस पर्यंत रोज करावे. तसेच गर्भ गौरी रुद्राक्ष देखील घालावे. महत्वाचे म्हणजे हे करत असताना स्त्रियांनी शुभ आणि शुभ वेळ याची दक्षता नक्की घ्यावी. भगवान शंकराची कृपा नक्की तुम्हावर होईलच.