Home » रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवताय? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवताय? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Share

आजच्या काळात जवळपास प्रत्येक स्त्री आणि पुरुष नोकरी करतात. त्यामुळे ते सकाळचे बऱ्यापैकी काम रात्र झोपण्यापूर्वीच करून ठेवतात. जसे की, भाजी आणून ती निवडून – चिरून ठेवणे, स्वयंपाकाची जमेल तेवढी तयारी करून ठेवणे. रोज मुलांना देखील डब्बा लागतो आणि ऑफिसला जाणाऱ्या पतिपत्नीला देखील डब्बा लागतो. बहुतकरून रोज भाजी आणि पोळीचाच डब्बा तयार केला जातो.

यातही रोज ताजा आणि गरम डब्बा असावा अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यासाठी घरातील स्त्रिया सकाळच्या गर्दीच्या वेळी काम कमी करण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी रात्री बऱ्यापैकी टिफिनची तयारी करून ठेवता. यात अनेक स्त्रिया कणिक देखील मळून फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे सकाळी घाईच्या वेळी कणिक मळून मग पोळ्या करण्याचे काम कमी होते आणि थेट पोळ्यांना सुरुवात होते.

मात्र आपण अनेकदा ऐकले असेल की, कणिक मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेऊ नये. अश्या रात्रभर फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणिकेच्या पोळ्या खाऊ नये. हे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. मात्र खरंच अशा रात्रभर फ्रिजमध्ये मळून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या खाणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे का? चला जाणून घेऊया.

रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय अत्यंत चुकीची आहे. कारण या फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे आरोग्याला त्रास होतो. आपल्या आयुर्वेदात याबद्दल सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे एकदा मळून ठेवलेली कणीक लगेचच वापरावी. फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरून पोळ्या करून खाऊ नये. हे आरोग्यासाठी अजिबातच चांगले ठरत नाही. त्यातील पोषक तत्व हे संपूर्णतः निघून गेल्यामुळे या पोळ्यांपासून शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही.

फ्रिजमधील हानिकारक किरणांमुळे पोळ्यांमधील मधील पोषक तत्व निघून जातात. शिवाय ही बरेच तास भिजवली असल्यामुळे ती काळसरदेखील दिसते आणि त्याला योग्य चव देखील लागत नाही. त्यातील सर्व आवश्यक ती पोषक तत्वे नाहीशी झाल्यामुळे या कणकेच्या पोळ्या खाण्यायोग्य देखील नसतात. अशा कणकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे पोटात दुखणे, पोट ताणले जाणे असे त्रास होऊ शकतात.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची पोळी करून खाल्ल्यास, पोटात गॅस आणि अॅसिडिटी होते. यासोबतच तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा आजारांनी तुमचे शरीर ग्रस्त होऊ लागते. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी नेहमी ताजी कणीकच भिजवावी आणि मग पोळ्या कराव्या.

जर तुम्ही फ्रीजमध्ये दीर्घकाळापर्यंत पीठ ठेवता. जसं की दहा ते बारा तासांपर्यंत कणिक ठेवत असाल तर त्यात बॅक्टेरिया पसरण्याची भिती असते. या पीठाच्या पोळ्या खाल्ल्याने फुड पॉइजनिंग सुद्धा होऊ शकते. ताज्या पीठाच्या पोळ्या आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या यात खूप अंतर असते. इतकंच नव्हे तर यामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्यांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याचबरोबर संक्रमण पसरवणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.

( माहितीचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.