Home » महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला डाएट ?

महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला डाएट ?

by Team Gajawaja
0 comment
Dixit Diet
Share

नुकताच भारतातला सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी पार पडली दिवाळीत सर्वांनीच गोडधोड पदार्थांवर ताव मारला असेल आणि दिवाळी संपल्यानंतर आता सगळ्यांना ओढ लागली आहे ती येणाऱ्या नवीन वर्षाची आता नवीन वर्ष म्हटलं की मग रिझोल्युशन्स  ची लिस्ट आली आणि यात प्रत्येकाच्या लिस्टमध्ये येणारी एक गोष्ट म्हणजे वेट मॅनेजमेंट. आता जे लोक बारीक आहेत त्यांना जाड व्हायचंय आणि जे लोक जाड आहेत त्यांना वेट लॉस करायचा आहे आणि हेच करण्यासाठी प्रत्येकाच्या लाईफस्टाईल मध्ये एक गोष्ट ऍड होते ती म्हणजे डायट आणि डायट म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतं ते म्हणजे काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ब्रँड ने ज्या डाएट प्लॅन ने धुमाकूळ घातला तो डायट प्लान म्हणजे दीक्षित डायट पण नेमका हा डायट प्लान आहे तरी काय आणि काय आहे त्यांची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया. (Dixit Diet)

तर गोष्ट आहे २०१२ सालची. दीक्षित डाएटचे सर्वेसर्वा म्हणजेच डॉ. जगन्नाथ दीक्षित तेव्हा लातूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांना त्याकाळात वजनवाढीच्या त्रासाने छळल होतं. वाढलेला पोटाचा घेर , वाढलेल वजन, सोबतीला कोलेस्टेरॉलचा त्रासही त्यांना होत होता. मात्र स्वतः मेडिकल फिल्डमधील नावाजलेले डॉक्टर असूनही वाढलेल्या वजनावरचा उपाय काही त्यांना सापडत नव्हता. त्यांनीसुद्धा खूप रिसर्च केला. एक दिवस उपवास, एक दिवस फक्त फळं खाल्ली. इंटरनेटवर डाएट प्लॅन शोधून तेसुद्धा फॉलो केले. आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधेसुद्धा घेतली. दर दोन-तीन तासांनी खाण्याचा प्रयोगसुद्धा केला. हे सर्व प्रयोग करतानाच आणखी दोन-तीन किलो वजन वाढल्याचं त्यानं समजलं. शेवटी त्यांच्याही मदतीला एक युट्युब वरचा व्हिडीओ आला. त्यांच्या एका मित्राने नव्वदच्या दशकातला हा व्हिडीओ त्यांना सजेस्ट केला होता. एक पुढारी नेता भाषण देत होता. ते होते भारतातील सर्वात जास्त क्वालिफाईड व्यक्ती! डॉ.श्रीकांत जिचकर ! याच जिचकारांनी एक डायट प्लान दिला जो आज आपण दीक्षित डायट या नावाने ओळखतो. (Lifestyle News)

पण नेमका काय आहे का दीक्षित डाएट प्लॅन ? तर आपल्या ‘वेट लॉस प्लॅन’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले Dr. दीक्षित या प्लॅनबद्दल सविस्तर सांगतात. त्यानुसार कडक भूक लागेल तेव्हाच खा, दिवसातून फक्त दोन वेळा जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झासकट काहीही, कितीही खा, एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, मन मारू नका – हवे ते खा, दोन वेळच्या जेवणाचे स्वतःचे पॅटर्न ठरवा, फक्त 55 मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा, जेवणात गोड कमी खा, साखर-गूळ-मध याचे व्यसन लावू नका, नारळ पाणी प्या पण नारळातली तसेच दुधावरची मलई खाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुधाचा चहा प्यायचा असेल तर 25 टक्के दूध व 75 टक्के पाणी टाकून प्या पण शक्यतो बिनसाखरेचा चहा घ्या, ग्रीन टी- ब्लॅक टी प्या, दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये भूक लागली तर एखादा टोमॅटो खा, यासोबतच कुठलाही खर्च न करता जास्त वेळ जिम अथवा व्यायाम न करता फक्त दिवसातुन ४५ मीन्समधये ४.५ किमी भरभर चाला. (Dixit Diet)

सवय नसल्याने सुरुवातीला याचा त्रास होईल पण आठवडाभर नियमितपणे दिवसभरात दोन वेळेच्या जेवणाचे पॅटर्न पाळले की याचीही सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान 8 किलो कमी होईल, पोटाचा घेर किमान 2 इंचाने कमी होईल,असं ते अगदी खात्रीपूर्वक सांगतात. पण आता दिवासातून दोनच वेळा जेवायचे म्हटल्यावर मधेच भूक लागली तर काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भूक ही बऱ्याचदा मान‌सिक असते. त्यामुळे शक्यतो दोन जेवणांच्या मधे काही खाऊ नये. अगदी सहन न झाल्यास ताक पिता येईल, काकडी वा टोमॅटोच्या दोन-तीन फोडी खाता येतील. एखादे अंजीर खाता येईल. शहाळ्याचे पाणी किंवा संत्र्यांचा रस देखील घेता येईल असं ते सांगतात. (Lifestyle News)

======

हे देखील वाचा :  मिठाईतील भेसळ ओळखावी कशी ?

====

जैन धर्मात बेसना ही पद्धत आहे. म्हणजे दोन वेळा बसून जेवा. गौतम बुद्धांनी तर एकदाच जेवा, रात्री जेवू नका असे म्हटले आहे. ग्रीक मधील नागरिक सर्वात तंदुरुस्त समजले जात. कारण ते दोनदाच जेवत. आपल्याकडे संतांनी सांगितले आहे की एकवेळा जेवतो तो योगी, दोनवेळा जेवतो तो भोगी तर तीनवेळा जेवतो तो रोगी ! मग दिवसभर रवंथ करीत राहतो त्याला महारोगी म्हणाचे लागेल. हेच रोग टाळण्यासाठी डॉ. जिचकरांनी सर्वप्रथम १९९७ ते २००४ पर्यंत ‘दोन वेळा खा आणि वजन कमी करा’ ह्या संकल्पनेवर मोठी मोहीम राबवली होती. यात पुणे आणि नागपूर येथे चळवळ राबवली गेली. पण जिचकारांच्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांचा हा प्लॅन लोकांपर्यंत पोहचू शकला नाही. मात्र आता हा प्लॅन डॉ.दीक्षितांनी पुन्हा सुरु केला. श्रीकांत जिचकर यांनी सुरू केलेला हा प्रयोग आपण पुढे नेत आहोत, अशी कृतज्ञता ते नेहमी व्यक्त करताना दिसतात. पण मंडळी, ज्यांना खरंच मनापासून Weightloss Kinva Weight Gain करावसं वाटतंय त्यांनीच हे करा. अर्थात कोणतंही Diet तेव्हाच करा. निव्वळ चार लोकांच्या सांगण्यावरून स्वतःला जज करू नका. तुमच्या जीवनशैलीत व्यायामाला नक्कीच महत्त्व द्या. पण कोणीतरी सांगतोय म्हणून काहीतरी न करता स्वतःला आहे तसं स्वीकारा. आणि येणाऱ्या नवीन वर्षात दररोज स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा संकल्प करा. (Dixit Diet)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.