Home » Diwali : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का आहे एवढे महत्व?

Diwali : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का आहे एवढे महत्व?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

“लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुगंधी, फराळाची लज्जत न्यारी, रंगवलीचा शालू भरजरी, आली आली दिवाळी आली”
या एकाच वाक्यात संपूर्ण दिवाळीचे अगदी सुंदर आणि समर्पक वर्णन केले आहे. दिवाळीच्या सणाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. कारण हा सणच असा आहे की, ज्याला शब्दात मांडण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. असा हा आनंदाचा सण. पाच दिवसाच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे. मात्र दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस आणि मुख्य दिवस म्हणजे ‘लक्ष्मीपूजन’. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्या आर्थिक भरभराटीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी तिच्याकडे प्रार्थना करतात. (Marathi)

दिवाळीतील प्रत्येक दिवसाला जसे विशिष्ट महत्व आहे, तसेच महत्व लक्ष्मीपूजनाचे देखील आहे. लक्ष्मीपूजन करण्यामागे एक खास कारण आहे. लक्ष्मी ही फार चंचल असते अशी मान्यता आहे. लक्ष्मीपूजन हे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून केले जाते. या दिवशी अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या ठिकाणी लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी. व्यापारी लोक त्यांच्या वह्या-चोपड्यांची पूजा करतात. या दिवसानंतरच व्यापारांचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. (Diwali 2025)

लक्ष्मीपूजन साधारणपणे अश्विन महिन्याच्या अमावास्येला अर्थात दिवाळीच्या मुख्य दिवशी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतरच्या काळात केले जाते. यंदा २० ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी प्रदोषकाळात अमावस्या तिथीची सुरुवात होत आहे. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने, सायंकाळी प्रदोषकाळात, म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटांच्या (साडे सहा ते साडे आठ) या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे शुभ ठरणार आहे. (Todays Marathi Headline)

Diwali

लक्ष्मीपूजनाचे महत्व काय?
लक्ष्मी ही धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि शुभतेची देवता मानली जाते. लक्ष्मी पूजनाद्वारे तिची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी पूजनात गणपतीची पूजा देखील केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे आणि कोणत्याही कार्याची सुरुवात त्यांच्या पूजेने केली जाते. हे पूजन केवळ भौतिक समृद्धीच नव्हे, तर आध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठीही केले जाते. तसेच दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि लक्ष्मी पूजन अंधार, अज्ञान, दारिद्र्य वर प्रकाश, ज्ञान, समृद्धी याच्या विजयाचे प्रतीक आहे. (Marathi Trending News)

लक्ष्मीपूजन साजरे करण्यामागे एक आख्ययिका देखील सांगितली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वत:च्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद सीतामाईला घेऊन आयोध्येत आले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली. याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. (Top Marathi News)

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते हे विशेष आहे. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्न मुहूर्तावर करतात. (Latest Marathi Headline)

========

Diwali 2025: यंदा लक्ष्मीपूजन कधी? वाचा पूजा-विधीसह शुभ मुहूर्त

========

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे. (Top Trending News)

रात्री बारा वाजता केर का काढतात?
मान्यतेनुसार अश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि वायूमंडलामध्ये जावून बसतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी घरात केर, कचरा काढला जातो, जेणे करून वायू मंडळात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकले जातील. घराचे पावित्र्य टिकून रहावे म्हणून आश्‍विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता घरात केर काढतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नव्या झाडूची खरेदी करण्याला देखील मोठे महत्व आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.