Gambling : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, नातेसंबंध आणि नव्या सुरुवातींचा सण. या सणात जसे लक्ष्मीपूजन, फटाके, मिठाई आणि भेटवस्तूंचा माहोल असतो, तसेच अजून एक परंपरा प्राचीन काळापासून आजपर्यंत टिकून आहे. ती म्हणजे दिवाळीत जुगार खेळण्याची. अनेक घरांत लक्ष्मीपूजनानंतर पत्त्यांचा खेळ, रम्मी किंवा इतर नशीब आजमावले जाणारे खेळ खेळले जातात. पण या सवयीचा उगम फक्त मनोरंजनात नाही यामागे एक पौराणिक कथा आणि धार्मिक अर्थ दडलेला आहे.
दिवाळीत जुगार खेळण्याची सुरुवात कधी झाली?
पौराणिक कथेनुसार, माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी कार्तिक अमावस्येच्या रात्री पाशा हा खेळ खेळला होता. या खेळादरम्यान पार्वतीजी जिंकल्या आणि त्यांनी शिवांना आशीर्वाद दिला की, जो कोणी या दिवशी हा खेळ खेळेल तो वर्षभर सौभाग्य आणि संपत्तीने भरलेला राहील. तर हा दिवस नशीब आजमावण्याची रात्र म्हणूनही ओळखला जातो. काळाच्या ओघात ही परंपरा लोकजीवनात रुजली. दिवाळीचा काळ समृद्धी आणि शुभतेचा मानला जातो त्यामुळे या काळात खेळलेले पत्ते किंवा जुगार हा लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानला जाऊ लागले. (Gambling

Shiv And Parvati
जुगार म्हणजे फक्त नशिबाचा खेळ नाही, तर श्रद्धेचं ही प्रतीक भारतामध्ये पारंपरिक दृष्ट्या जुगार हा चुकीचा किंवा वाईट मानला जातो, पण दिवाळीच्या रात्री मात्र त्याला धार्मिक मान्यता मिळते. कारण या दिवशी खेळलेला जुगार हा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा एक प्रकार आहे असे मानला जाते. लोकांचा विश्वास आहे की, या खेळात जिंकणं म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षात आर्थिक यश आणि शुभसंकेत आहेत. जुगार खेळताना अनेकजण देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजेनंतर पत्ते उचलतात, ज्यामुळे हा खेळ फक्त नशिबाचा नाही तर श्रद्धा आणि परंपरेचा संगम ठरतो.
आधुनिक काळात जुगाराचं रूप बदललं आजच्या काळात पारंपरिक पत्त्यांच्या खेळाऐवजी ऑनलाइन गेम्स, रम्मी अॅप्स आणि लकी ड्रॉ स्पर्धा दिवाळीत लोकप्रिय होत आहेत. लोक याला फेस्टिवल फन म्हणून घेतात, परंतु मूळ उद्देश तोच नशिब आजमावणं आणि सणात आनंद वाटणं. तरीसुद्धा, अनेक ठिकाणी समाजात संयमाने खेळण्याचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. कारण हा सण आनंद आणि एकत्रतेचा आहे, त्यामुळे खेळ मर्यादित राहूनच खेळावा. (Gambling )
================
हे देखील वाचा :
Shubh Muhurat : धनत्रयोदशीला सोने का घेतात? जाणून घ्या पौराणिक कारण आणि धार्मिक महत्त्व
Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्रमंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य
धार्मिक अर्थ आणि संदेश
दिवाळीतील जुगार परंपरेचा मूळ संदेश असा आहे की जीवन हे स्वतः एक खेळ आहे, जिथे नशिब आणि परिश्रम दोन्ही महत्त्वाचे आहेत. लक्ष्मी म्हणजे केवळ धन नव्हे, तर शुभ ऊर्जा आणि सकारात्मकता. या सणात जुगार खेळण्याचा अर्थ आपलं नशीब परिश्रमाशी जोडणं आणि आनंदाने जीवन जगण्याचं प्रतीक आहे. दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि संपत्तीचं आगमन. जुगार ही त्या आनंदाची एक प्रतीकात्मक परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा, नशिब आणि कौटुंबिक एकत्रता दडलेली आहे. म्हणूनच आजही अनेक घरांत दिवाळीच्या रात्री पत्ते खेळण्याची परंपरा जोपासली जाते ती केवळ मनोरंजनासाठी नाही, तर लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि शुभतेच्या आठवणी जपण्यासाठी. (Gambling )
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
