Home » Padwa 2025 : पाडव्याला पतीचे औक्षण करण्यामागे देखील आहे मोठे कारण

Padwa 2025 : पाडव्याला पतीचे औक्षण करण्यामागे देखील आहे मोठे कारण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Padwa 2025
Share

पाच दिवसाच्या दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनानंतरचा महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. या दिवसाला बलिप्रतिपदा असे देखील म्हटले जाते. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी, म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पाडवा साजरा केला जातो. बलिप्रतिपदा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तो अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व अनेक अर्थाने आहे. एक तर पती पत्नीच्या गोड आणि प्रेमळ नात्याला दर्शवणाऱ्या या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यासोबतच व्यापारीवर्गासाठी देखील हा दिवस खास असतो, कारण याच दिवसापासून त्यांचे नवीन वर्ष सुरु होते. (Diwali Padwa)

मात्र पाडव्याचे सर्वात मोठे आणि खास आकर्षण म्हणजे पत्नीकडून पतीला केले जाणारे औक्षण. या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीला औक्षण करते आणि त्याच्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करते. पाडव्याला पत्नी पतीला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धतदेखील आहे. मात्र पाडव्याच्या दिवशी पतीला औक्षण करण्याची परंपरा कशी आणि का सुरु झाली याची माहिती आहे का? चला जाणून घेऊया याच खास परंपरेबद्दल. या परंपरेबद्दल बळी राजाची एक पौराणिक आख्ययिका सांगितली जाते. (Top Marathi News)

कथा
असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जायचा. पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजा हा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता. मात्र, त्याला अहंकाराचा वारा लागला आणि तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की मग माणसाची अधोगती सुरू होते. बळी राजाचेसुद्धा तेच झाले, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला. (Todays Marathi Headline)

Padwa 2025

बळी राजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळी राजासमोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले डोके पुढे केले. तीन पावलांमध्ये विष्णूंनी बळीराजाकडून सर्व काही काढून घेतले. परंतु, बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झाले आणि त्याला पातळाचे राज्य दिले. (Latest marathi Headline)

भगवान विष्णुंनी बळी राजाचे गर्वहरण केले, शिवाय त्याच्या दातृत्त्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला, ते पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली. तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णुंचे औक्षण करून स्वागत केले, तेव्हा विष्णुंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्य प्राप्तीचा आशीर्वाद दिला. या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपसुख ऐश्वर्य प्राप्तीचे वरदान मिळते. विष्णु-लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसा प्रत्येक पती पत्नीने एकमेकांचा करावा, या उद्देशाने पाडव्याला नवर्‍याला ओवाळण्याची आणि नवर्‍याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा सुरु झाली. (Top Stories)

यासोबतच पतीला औक्षण करण्यामागे अजून काही कारणं सांगितले जातात. जसे की, या दिवशी पाटील औक्षण केल्याने पतीला आरोग्य, यश आणि दीर्घ जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितले जाते. पतीच्या जीवनात पत्नीची भूमिका “सहचारी” अशी आहे. ती पतीला धन-आरोग्याचे देवता मानते. हा सण पती-पत्नीच्या नात्यातील सलोखा आणि परस्पर आदर दर्शवतो. पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ असेही म्हणतात. हा दिवस व्यापाऱ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात होते, त्यामुळे या शुभ मुहूर्तावर आगामी वर्षात पत्नी पतीला त्याच्या कामात यश आणि प्रगती व्हावी म्हणून औक्षण करते. (Top trending News)

=========

Balipratipada : जाणून घ्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचे महत्त्व 

=========

पाडव्याला औक्षण करण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे पत्नी आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाला प्रार्थना करणे. हा दिवस पती-पत्नीमधील जिव्हाळ्याचे नाते दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी पती पत्नीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो, तर पत्नी त्याचे औक्षण करून त्याला आदराने वागवण्याची वचन देते. काही प्रांतांत या दिवसाला “गौरीपूजन” म्हणतात. पार्वतीने शंकराला दीर्घायुष्य मिळावे म्हणून केलेली पूजा ही परंपरा यामागे दडलेली आहे. दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या प्रेम, आदर आणि सौभाग्याचा दिवस आहे. पत्नी औक्षण करते कारण ती आपल्या पतीला देवतुल्य मानते आणि त्याच्या दीर्घ, सुखी आयुष्याची कामना करते हाच या परंपरेचा आत्मा आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.