बहीण भावाच्या नात्याला अधोरेखित करणारे मुख्य दोन सण आहेत. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज. भावा बहिणीचे नाते हे कायम मित्रत्वासारखे असते. या नात्यामध्ये सर्वच नाती लपलेली आपल्याला दिसतील. एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करणारे बहीण भाऊ म्हणजे प्रत्येक घराचा श्वास असता. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे तर कधी लुटुपुटुची भांडणं करणारे भाऊ बहीण सर्वच बघत असतात. अशा या गोड, निस्वार्थ, शब्दात व्यक्त न होणाऱ्या या अनोख्या नात्याला स्पष्ट करणारा दिवाळीत साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज. (Marathi)
भाऊबीजेचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला येतो. यंदा भाऊबीज २३ ऑक्टोबरला साजरी होत आहे. भाऊबीजेलाच दिवाळीची समाप्ती होते. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याचे औक्षण करते. त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भारतात सर्वदूर हा सण विविध पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. प्रांतानुसार सण साजऱ्या करण्याच्या पद्धती नेहमीच बदलत असतात. महाराष्ट्रामध्ये देखील भाऊबीज थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी अनेक घरांमध्ये बहीण भावाला नारळ देते अशी प्रथा आहे. मात्र यामागे नक्की कोणता विचार असेल?, ही प्रथा का साजरी केली जाते? याबद्दल आज आपण माहिती घेऊया. (Diwali Bhaubij)
हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कार्यात खासकरून शुभ कार्यात नारळाला मोठे महत्त्व आहे. नारळाशिवाय कोणतीही लहान मोठी पूजा पूर्ण होत नाही. याच नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते. नारळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्रीफळ हे शुभ, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही पूजेमध्ये नारळाचा वापर आवश्यक केला जातो. भाऊबीजेला बहिणी तिच्या भावाला नारळ देताना, भावाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्याची इच्छा कामना करते. असे सांगितले जाते की, यमुनेने तिची आठवण म्हणून यमराजांना नारळ दिला होता. त्याचप्रमाणे आजही बहिणी त्यांच्या प्रेमाचे आणि बंधनाचे प्रतीक म्हणून आजही भावाला ओवाळल्यानंतर नारळ देतात. (Top Marathi News)
पौराणिक कथेनुसार, सूर्यदेवाची पत्नी संग्या हिला दोन मुले होती. मुलगा यमराज आणि मुलगी यमुना. बहीण यमुना आपले भाऊ यमराजावर खूप प्रेम करत असे आणि त्याला आपल्या घरी येण्याची विनंती करत असे, परंतु आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे यमराज आपल्या बहिणीच्या घरी जाऊ शकले नाहीत. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यमराज बहीण यमुनेच्या आमंत्रणावरून तिच्या घरी पोहोचले. बहिणीच्या घरी गेल्याच्या आनंदात यमराजांनी नरकात लोकांना एक दिवसासाठी मुक्त केले. (Latest Marathi Headline)
यमराज घरी पोहोचल्यावर यमुनेने आपल्या भावाचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्याच्या स्वागतासाठी विविध पदार्थ तयार केले आणि यमराजाच्या कपाळावर कुंकू लावला. जेव्हा यमराज यमुनेच्या घरातून निघू लागले, तेव्हा त्यांनी बहिणीला तिच्या पसंतीचा वर मागायला सांगितले. आपल्या आवडीचा वर मागण्याऐवजी बहीण यमुना यमराजाला म्हणाली, भाऊ, मला वचन दे की तू दरवर्षी माझ्या घरी येशील. यमराजाने आपल्या बहिणीला हे वचन दिले होते, त्यानंतर भाऊबीज पारंपारिकपणे साजरी केली जाते. (Top Trending News)
=========
Bhaubij : जाणून घ्या भाऊबीजेचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती
=========
यमराजाला निरोप देताना बहीण यमुनेने त्याला नारळ गोळा दिला. यमराजांनी नारळ भेट देण्यामागचे कारण विचारले, तेव्हा यमुना म्हणाली, हा नारळ तुला माझी आठवण करून देत राहील. तेव्हापासून या दिवशी नारळ देण्याची परंपरा आहे. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन त्यांचा आदरातिथ्य स्वीकारेल आणि जी बहीण आपल्या भावाला घरी बोलावून भोजन करेल, त्याला यमराजाच्या भीतीने त्रास होणार नाही, असे मानले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics