Home » Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व

Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narak Chaturdashi
Share

धनत्रयोदशीनंतर आणि लक्ष्मीपूजनाआधी नरक चतुर्दशीचा दिवस साजरा केला जातो. नरक चतुर्दशी या दिवसाला सनातन धर्मामध्ये मोठे महत्व देण्यात आले आहे. या दिवसाचे महत्व पाहूनच नरक चतुर्दशीला ‘छोटी दिवाळी’ या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी अभ्यंगस्नानाना विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणे लावून अंघोळ केली जाते. काही ठिकाणी अंघोळीच्या दरम्यान व्यक्तीला औक्षण करण्याची देखील प्रथा आहे. भारतात नरक चतुर्दशीला काली चौदस, नरक चौदस, रूप चौदस, छोटी दिवाळी, नरक निवारण चतुर्दशी, भूत चतुर्दशी म्हणूनही ओळखले जाते. नरकचतुर्दशी साजरी करण्यामागे अनेक आख्ययिका सांगितल्या जातात. जाणून घेऊया याच सर्व आख्ययिका कोणत्या आहेत त्याबद्दल. (Diwali 2025)

नरकासुर वध
आपण श्रीकृष्ण कालखंडात गेलो तर आपल्याला नरकासुराचा श्रीकृष्णाने केलेला वध ही कथा नक्कीच आठवेल. या नरकासुराच्या वधाचा आणि श्रीकृष्णाचा संबंध हा नरक चतुर्दशी सोबत आहे. पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेला असुरांचा एक अवतार म्हणजे नरकासुर होय. त्याने वराह अवतार धारण केला होता. विष्णूने जेवहा पृथ्वीचा उद्धार केला होता तेव्हा नरकासुराचा जन्म झाला. (Top Marathi Stories)

एक आख्यायिका असे देखील सांगते की या नरकासुराचा जन्म हा रावण वधानंतर झाला होता. जानकी म्हणजे सीता मातेचा जन्म ज्या यज्ञाच्या ठिकाणी जमिनितुन झाला तिथेच या नरकासुराचा देखील जन्म झाला. राजा जनक याने नरकासुराचे 16 वर्षांपर्यंत पालन पोषण केले. त्यानंतर मात्र पृथ्वीने त्याला विष्णुकडे पाठविले. भगवान विष्णू यांनी त्याला प्राग्यज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले.

नरकासुर कसा अभेद्य होता याचे उदाहरण म्हणजे त्याला विष्णूचा वरदहस्त होता. त्याचे आणि मथुरेच्या कंस राजाचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नरकासुराचा विवाह हा विदर्भ राज्याची राजकुमारी माया यांच्याशी झाला. त्याच्या विवाह प्रसंगी विष्णूने त्याला एक रथ भेट दिला होता. हा रथ अभेद्य असा होता. नरकासुर अगदी सुरळीत आणि शांततेत राज्यकारभार सांभाळत होता मात्र संगत त्याला बिघडवत गेली. त्याला बानासुराने बिघडविले. नरकासुर देखील एखाद्या असुराप्रमाणे दृष्ट बनला. त्याचे हे प्रताप बघून वशिष्ठ ऋषींनी त्याला भगवान विष्णूच्या हातून तुझा वध होईल असा शाप दिला. (Marathi)

Narak Chaturdashi

नरकासुर खूप हुशार होता. त्याने या शापाला टाळण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. त्याने भव्य यज्ञ आणि पूजा पाठ केले. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला की त्याचा वध कोणीच करू शकणार नाही. यालाच पुराणात ‘अवध्यत्वा’ असे म्हणले गेले आहे. या वरदानाने तो जवळपास अमर झाला होता. अहंकार इतका होत गेला की त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या मुलींना पळवून मनिपर्वतावर एक नगर वसवून तिथे बंद करून ठेवले. त्याने जवळपास १६१०० स्त्रिया पळवून नेल्या व बंदी बनविल्या होत्या असे पुराणात नमूद केलेले आहे. (Marathi Trending Headline)

========

Narak Chaturdashi : मृत्यूनंतर एखादी व्यक्ती नरकात का जाते?

========

अनेक राजांना, देव देवतांना, गंधर्वाना आणि मानवांना आता नरकासुर त्रासदायक ठरला होता. त्याने देवांमध्ये माता अदिती चे कुंडले पळविली होती. वरून राजाचे त्याने विशाल छत्र बळकावले होते. प्राग्यज्योतिषपूर मध्ये नरकासुर रहात होता. हे त्याच्या राजधानीचे ठिकाण होते. जमिनीवरून तर तिथे कोणीच जाऊ शकत नव्हते कारण वाटेत या नगरीला पाणी, अग्नी आणि खंडकांचे संरक्षण होते. (Narak Chaturdashi 2025)

भगवान श्रीकृष्णाने गरुड रथात स्वार होऊन या नरकासुरावर आक्रमण केले. अखेर त्याच्या देहाचे दोन तुकडे करत श्रीकृष्णाने नरकासुर हे असुरी पर्व संपविले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नरकासुरावर श्रीकृष्णाने मिळविलेला विजय म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो. नरकासुराचा वध करताना श्रीकृष्णाच्या शरीरावर रक्त पडले आणि ते काढण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून अंघोळ केली म्हणून ही अभ्यंगस्नान करण्याची प्रथा सुरू झाली. भगवान श्रीकृष्णाने त्या १६१०० स्त्रियांना समजात प्रतिष्ठा मिळणार नाही म्हणून स्वतः त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात एक मानाचे स्थान मिळवून दिले. (Top Marathi News)

रंतीदेव आणि मोक्ष
एकेकाळी एका सुंदर अशा नगरीमध्ये रंतीदेव नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा सद्गुणी होता त्याने कधीच कोणाला त्रास होणार नाही असेच निर्णय घेतले होते. तो स्वतःपेक्षा रयतेचा जास्त विचार करत असे. मात्र जेव्हा त्याला घ्यायला यमराज आले तेव्हाच मात्र त्याला कळाले की त्याला मोक्ष नाही तर नरक मिळाला आहे. यावर त्याच्या मनात प्रश्न आला की त्याने एकही पाप केले नाही तर मग त्याला नरक यातना का भोगाव्या लागणार आहेत?

यावर यमदूताने कारण सांगितले की त्याने एका नजर चुकीने एका ब्राम्हण भिक्षुक्याला उपाशी पोटी मोकळ्या हाताने परत पाठविले आहे. यावर रंती देव म्हणले की मला वेळ द्यावा जेणेकरून मी माझी चूक सुधारू शकेल. रंती देवाने आधी केलेल्या चांगल्या कामांमुळे त्याला ही संधी देण्यात आली. (Latest Marathi Headline)

Narak Chaturdashi

गुरुकडे रंती देवाने विचारणा केली की यावर उपाय काय असेल? गुरूने सांगितले की 1 हजार ब्राह्मणांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य करून त्यांची क्षमा माग म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. सर्व ब्राम्हण खुश झाले आणि रंती देवाला मोक्ष मिळाला! हा दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी होय. त्यामुळे या चतुर्दशीला नरक निवारण चतुर्दशी असे म्हणले जाते. (Marathi News)

नरक चतुर्दशी आणि रूप चतुर्दशी संबंध
एकेकाळी हिरण्यगभ नावाचा एक राजाला राज्य करत होता. त्याने राज्यकारभार सोडून तपश्चर्या करायचे ठरविले. त्याने अनेक वर्षे तपश्चर्या केली मात्र पुढे जाऊन त्याच्या शरीरात कृमी झाली.त्याने त्याची ही समस्या नारद मुनींना सांगितली. यावर नारद मुनी म्हणाले की तू जेव्हा तपश्चर्या करतोय तेव्हाच शरीराची काळजी घेत नाहीयेस. यावर उपाय विचारला असता नारद मुनींनी सांगितले की कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला पहाटे उटणे लावून अभ्यंगस्नान करून भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि आरती कर. असे केल्याने तुला तुझे जुने सौंदर्य sमिळेल. हिरण्यगभ ने नारदांनी सांगितलेले सर्व काही केले. त्याला त्याचे जुने शरीर आणि सौंदर्य पुन्हा मिळाले. त्याला त्याचे रूप पुन्हा मिळाले म्हणून नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी असे देखील म्हणतात. (Latest Marathi News)

वामनपूजा आख्ययिका
या दिवशी दक्षिण भारतात वामनपूजा देखील केली जाते. असे म्हणतात की, बळीला (महाबली) भगवान विष्णुने वामन अवतारात दरवर्षी त्यांच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामनपूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून आमावस्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल, त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत आणि जी व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घर देवी लक्ष्मी कधीही सोडणार नाही. ही प्रार्थना ऐकल्यानंतर भगवान वामन म्हणाले की, राजन,असेत होईल… तथास्तु. भगवान वामन यांनी राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिनी यमराजाच्या निमित्ताने व्रत, पूजन आणि दीपदानाचे प्रचलन सुरू झाले. (Top Marathi Headline )

दैत्य राजा बळी खूप शक्तिशाली होता. त्याने तिन्ही जग आपल्या सामर्थ्याने काबीज केले. राजा बळीला त्याच्या सामर्थ्याचा खूप अभिमान होता. यासोबतच तो भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता आणि तो खूप दानधर्मही करत असे. या कारणास्तव इंद्रदेवाच्या ऐवजी राजा बळीला स्वर्गाचा अधिपती करण्यात आला. (Top stories)

Narak Chaturdashi

बळीला स्वर्गाचा स्वामी बनवताच त्याने आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग केला आणि सर्व देवी-देवतांना त्रास देऊ लागला. बळीच्या अत्याचारामुळे स्वर्गातील सर्व देवी-देवता खूप अस्वस्थ झाले आणि त्यानंतर सर्वांनी भगवान विष्णूकडे मदतीची याचना केली. इंद्रदेवांनीही देवाला स्वर्गावर ताबा मिळावा म्हणून प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूने सर्व देवी-देवतांना आश्वासन दिले की, ते राजा बळीचा अभिमान मोडून तिन्ही लोक त्याच्या ताब्यातून मुक्त करतील. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्रेतायुगात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या तिथीला भगवान विष्णू माता अदिती आणि ऋषी कश्यप यांच्या पुत्राच्या रूपात पृथ्वीवर जन्मले. याला भगवान विष्णूचा वामन अवतार म्हणतात. (Top Marathi Headline)

भगवान विष्णूने बटुक ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि राजा बळीच्या जवळ गेले. या रूपात त्याच्या एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात लाकूड होते. वामन देव यांनी बळीला तीन पावलांची जमीन दान करण्याची विनंती केली. बाली त्याच्या वचनबद्धतेसाठी आणि दानासाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांनी राजा बळीला कोणत्याही प्रकारचे वचन देण्याआधी सावध केले, परंतु असे असतानाही राजा बळीने ब्राह्मणाच्या मुलाला तीन पाऊल जमीन देण्याचे वचन दिले. (Top Trending News)

=========

Diwali : नरक चतुर्दशीला आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Naraka Chaturdashi : ‘छोटी दिवाळी’ अशी ओळख असणाऱ्या नरकचतुर्दशीचे महत्व

=========

यानंतर वामन देवांनी विशाल रूप धारण केले. त्यानंतर त्यांनी एका पायाने संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पायाने संपूर्ण स्वर्ग काबीज केला. यानंतर जेव्हा तिसर्‍या पायासाठी काहीच उरले नाही तेव्हा राजा बळीने आपले डोके पुढे केले आणि वामन देव यांना आपला पाय डोक्यावर ठेवण्यास सांगितले. अशा प्रकारे देवाने त्यागाचा अभिमान मोडला. पण ते बळीच्या वचनबद्धतेवर खूप खूश झाले आणि त्यानंतर त्यांनी त्याला पाताळलोकाचा राजा बनवले. वामन देवाने राजा बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच तो ताबडतोब पाताळात पोहोचला आणि भगवान विष्णूच्या कृपेने बळीने पाताळावर अनंतकाळ राज्य केले. (social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.