Home » Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व

Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dhanteras
Share

सगळीकडे आता फक्त दिवाळीचीच तयारी दिसत आहे. फराळापासून ते सजावटीपर्यंत सर्वच गोष्टींनी बाजारपेठ फुलून गेल्या आहेत. तर घरांमध्ये देखील दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि त्यानंतर येते ती ‘धनत्रयोदशी’ अर्थात ‘धनतेरस’. दिवाळीमध्ये या दिवसाला खूप महत्व आहे. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणतात. (Dhanteras)

धन आणि ‘त्रयोदशी’ (तेरावी तिथी) या दोन शब्दांवरून त्याचे नाव पडले आहे. या दिवसाला ‘उदयव्यपिनी त्रयोदशी’ असेही म्हणतात. दिवाळीच्या २ दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये धन्वंतरी देवाची, लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. शिवाय दिवाळीच्या वस्तू खरेदी करतात. सोने किंवा स्वयंपाकघरातील नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभ दिवस मानला जातो. दिवाळी, दिव्यांचा सण, धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. (Marathi News)

पंचांगानुसार या वर्षी धनत्रयोदशी तिथी ही शनिवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी संपेल. हिंदू धर्मात उदयतिथीला विशेष महत्त्व दिले जाते, म्हणून धनत्रयोदशी शनिवार १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरात समृद्धी यावी. आर्थिक स्थिती उत्तम रहावी आणि कुटुंबात धनसंपत्तीने कायम वास करावा यासाठी यादिवशी देवी लक्ष्मीला धण्याच्या आरास मध्ये पूजले जाते. तसेच यादिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात. (Diwali)

यंदा धनतेरसला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग, उत्तराफाल्गुनी, पूर्वाफाल्गुनी नक्षत्र बुधादित्य आणि कलात्मक योग निर्माण करेल. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १:४८ वाजेपासून ते दुपारी १:४१ वाजेपर्यंत ब्रह्मयोग होईल हे आपल्याला कळू द्या. याशिवाय पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी ३:४१ वाजेपर्यंत सुरू होईल आणि त्यानंतर उत्तराफाल्गुनी नक्षत्र सुरू होईल. (Marathi)

Dhanteras

आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. कापणीचा हंगाम ओसरत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याच्या राशी असतात. या दिवशी शेतकरी त्यांच्या धनाची अर्थात धान्याची पूजा करतो. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. (Marathi News)

=========

Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

=========

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान धन्वंतरीचा जन्म धनतेरस दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. हिंदू धर्मानुसार ते आयुर्वेदाचे देवता आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती या नावानेही धनत्रयोदशी ओळखली जाते. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. (Todays Marathi Headline)

महालक्ष्मीची पूजा
हिंदू पौराणिक कथांमध्ये ‘धनत्रयोदशी’ हा दिवस शुभ मानला जातो कारण या दिवशी धनाची देवता कुबेरासह देवी लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी महासागरातून अवतरली होती असे मानले जाते. तेव्हापासून लोक देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रार्थना करू लागले. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची खरेदी करणे हे देवी लक्ष्मीचे घरात स्वागत करण्यासाठी शुभ मानले जाते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा घर, कार आणि दागिने खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. (Marathi Top Headline)

धनत्रयोदशीची पूजा विधी
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी एका चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरावे. यानंतर गंगाजल शिंपडून पवित्र झालेल्या या ठिकाणी आता भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करावी. देवासमोर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. देवाला लाल रंगाची फुले अर्पण करा. या दिवशी तुम्ही जे काही धातू, दागिने किंवा भांडी खरेदी कराल ते चौरंगावर ठेवा. पूजेदरम्यान “ओम ह्रीं कुबेराय नमः” चा जप करा. धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे. लक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मी चालीसा पाठ करा. (Top Trending News)

कुबेराची पूजा कशी करावी?
या दिवशी वर दिलेल्या वेळेनुसार प्रदोष काळात धनाची देवता कुबेराच्या पूजेसाठी सर्वप्रथम तेरा दिवे लावून पैसा ठेवण्याच्या ठिकाणी या मंत्राने कुबेराचे ध्यान करावे.
“यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्याधिपतये धन-धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा”

आणि

“ऊँ श्री ऊँ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नम:।”

ध्यानानंतर सात प्रकारचे धान्य (गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर) देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना अर्पण करावे आणि दोघांचे फुल, अक्षत आणि उदबत्तीने पूजन करावे. पूजेनंतर भोगासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई वापरणे श्रेयस्कर आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते, असे मानले जाते. (Latest Marathi Headline)

Dhanteras

धनत्रयोदशी कथा १
धनत्रयोदशी या सणामागे एक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. (Top Marathi Stories)

सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. (Top Marathi Headline)

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. (Top Trending News)

धनत्रयोदशी कथा २
कथेनुसार, राजा बळीच्या भयापासून देवांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन राजा बळीच्या यज्ञस्थानी पोहोचले. शुक्राचार्यांनीही भगवान विष्णूंना वामनाच्या रूपात ओळखले आणि राजा बळीला वामनाने जे काही मागितले ते नाकारण्याची विनंती केली. वामन हा भगवान विष्णूंचा अवतार आहे जो तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेण्यासाठी देवांना मदत करण्यासाठी आला आहे असे त्यांनी सांगितले. (Latest Marathi Headline)

=========

Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

=========

बळीने शुक्राचार्यांचे म्हणणे ऐकले नाही. वामनाने परमेश्वराने मागितलेल्या कमंडलातून तीन पावले जमीन आणि जल दान करण्याचा संकल्प करू लागला. बळीला दान करण्यापासून रोखण्यासाठी शुक्राचार्यांनी राजा बळीच्या कमंडलमध्ये लघुरूपात प्रवेश केला. त्यामुळे कमंडलातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद झाला होता. वामनला भगवान शुक्राचार्यांची युक्ती समजली. भगवान वामनांनी आपल्या हातातील कुशाला कमंडलमध्ये अशा प्रकारे ठेवले की शुक्राचार्यांच्या एका डोळा फुटला. (Top Stories)

शुक्राचार्य कमंडलातून संघर्ष करत बाहेर आले. यानंतर बळी तीन पाऊल जमीन दान करण्यासाठी तयार झाला. त्यानंतर भगवान वामनांनी एका पायाने संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पायाने जागा मोजली. तिसरी पायरी ठेवायला जागा नसल्याने बळीने वामनाच्या चरणी डोके ठेवले. बालिदनात सर्वस्व गमावले. अशा रीतीने देवतांची बळीच्या भीतीपासून मुक्तता झाली आणि बळीने त्यांच्याकडून जितकी संपत्ती हिसकावून घेतली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संपत्ती देवांना मिळाली. धनत्रयोदशीचा सणही यानिमित्ताने साजरा केला जातो. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.