दिवाळीचा सण सध्या उत्साहात सुरु आहे. दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यक्तीची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने सर्वच देवी लक्ष्मीचे पूजन करतात. देवी लक्ष्मीकडे समृद्धीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करतात. यंदा २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे होत आहे. या दिवसाला अनेक अर्थी महत्त्व प्राप्त झाले आहे. यातलेच एक महत्वाचे कारण म्हणजे दिवाळीच्याच दिवशी प्रभू श्रीराम त्यांचा तब्बल १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्याला त्यांच्या नगरीमध्ये परतले होते. (Marathi)
एवढ्या वर्षांनी प्रभू आल्याने सर्वच अयोध्यावासियांनी अगणित दिवे लावून प्रकाशात रामाचे स्वागत केले होते. त्यामुळे अनेक लोकं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रामाच्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतात. भारतामध्ये कोणताही लहान मोठा सण असला तरी मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेण्याची जुनी परंपरा आहे. देवाच्या आशिर्वादाशिवाय कोणताच सण पूर्ण होत नाही. त्यामुळेच यंदा देखील तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध अशा राम मंदिरांना भेट देऊन देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ शकतात. भारतातील प्रभू श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरं कोणती आहेत पाहूया. (Diwali)
अयोध्या राम मंदिर, उत्तर प्रदेश
अयोध्येत असलेले श्री राम मंदिर हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे आहे कारण ते भगवान रामाचे जन्मस्थान ‘राम जन्मभूमी’ मानले जाते. शरयू नदीच्या काठावर वसलेले हे भव्य मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. दरवर्षी हजारो भाविक श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. (Lord Ram)
रामराजा मंदिर, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. प्रभू रामाचीही मध्य प्रदेशात राजा म्हणून पूजा केली जाते. रामराजा मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे प्रभू रामाला दररोज चार वेळा बंदुकीची सलामी अर्थात गार्ड ऑफ ऑनर दिले जाते. (Todays Marathi Headline)
सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा
भारतातील हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे मंदिर भद्राचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मान्यता आहे की, वनवासाच्या काळात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण भद्राचलमपासून ३५ किमी दूर पर्णशाला येथे राहिले होते. सीतेला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जात असताना भगवान रामाने गोदावरी नदी ओलांडली होती. त्याच ठिकाणी नदीच्या उत्तरेला भद्राचलम मंदिर आहे. (Marathi Trending Headline)
काळाराम मंदिर नाशिक, महाराष्ट्र
काळाराम मंदिर महाराष्ट्रातील नाशिकमधील पंचवटी येथे आहे. असे सांगितले जाते की, श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील मोठा काळ गोदावरीच्या काठावर पंचवटी येथे व्यतीत केला आहे. येथूनच माता सीतेचे रावणाने अपहरण केले होते. या काळाराम मंदिराच्या बांधकामाची कहाणी खूपच मनोरंजक आहे. असं म्हटलं जातं की, सरदार रंगारू ओढेकर यांना स्वप्नात दिसले की गोदावरी नदीत भगवान रामाची एक काळी मूर्ती आहे. त्यानंतर या स्वप्नावरून मूर्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुर्ती बरोबर त्याच ठिकाणी मिळाली जेथे त्यांनी स्वप्नात पाहिली होती. म्हणून या मंदिराचे नाव ‘काळाराम’ ठेवण्यात आले. (Marathi News)
रामास्वामी मंदिर, तामिळनाडू
हे मंदिर ४०० वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. या मंदिरात रामायणाची झलकही पाहायला मिळते. गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात. शत्रुघ्न आणि भरत यांच्यासह राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. प्रभू रामाच्या डाव्या बाजूला शत्रुघ्न पंखा धरलेला दिसतो, तर भरत शाही छत्र धरलेला दिसतो आणि उजव्या बाजूला हनुमान दिसतो. (Top Marathi NEws)
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ
हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. तेथे भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत. भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा त्यांचा देह ठेवला तेव्हा या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. नंतर ही मूर्ती काही मच्छिमारांना सापडली आणि त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली गोली. या मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते. (Marathi Latest Headline)
राम मंदिर भुवनेश्वर, ओडिशा
हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. शहराच्या मध्यभागी स्थित मंदिर हे भगवान रामाच्या भक्तांसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत, ज्या एका खाजगी ट्रस्टद्वारे बांधल्या जातात आणि त्यांचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय मंदिर परिसरात हनुमान, शंकर आणि इतर देवतांची मंदिरं देखील आहेत. (Top Trending News)
=========
Diwali : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवडीचे ‘हे’ उपाय करून मिळवा भरभराट
Laxmi Pujan : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण करा ‘हे’ खास फुल मिळवा भरभराटीचा आशीर्वाद
=========
कोदंडराम मंदिर, कर्नाटक
कोदंडराम मंदिर हे मंदिर कर्नाटकातील हिरेमागलूर येथे आहे, जे चिकमंगळूर जिल्ह्यात येते. या मंदिरात भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते यावरून या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे. मंदिराच्या गर्भगृहात हनुमान चौकीवर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. सर्वत्र रामाच्या डाव्या बाजूला सीता दिसत असली तरी या मंदिरात सीता रामाच्या उजव्या बाजूला आहे. असे मानले जाते की, एका भक्त पुरुषोत्तमने भगवान राम आणि सीता यांचा विवाह पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. पारंपारिक हिंदू विवाहादरम्यान वधू वराच्या उजव्या बाजूला बसते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics