दिवाळीची घाई आणि तयारी आता सर्वच घरांमध्ये जोरदार चालू असेल. दिवाळी म्हणजे चैतन्य आणि आनंद. या प्रकाशाच्या सणाचे स्वागत करताना आपले घर लखलखीत असावे असा प्रयत्न सगळेच करत असतात. दिवाळीला संध्याकाळी लक्ष्मी देवीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी पणत्या लावल्या जातात. घराचा कानाकोपरा, घराच्या आता बाहेर सगळीकडे पणत्यांची सुंदर आरास केली जाते. मात्र अनेकदा पणत्यांमधून तेल गळते आणि पणत्यांखाली तेलाने चिकट होते. या तेलामुळे जमीन तर खराब होते आणि तिला कायमचाच डाग पडतो. (Diwali 2025)
शिवाय रांगोळीवर पणती ठेवली असेल तर रांगोळी सुद्धा तेलकट होते. मग अनेकदा घरी पाण्यावर चालणारे दिवे, एलईडी असलेले दिवे, बॅटरीवर चालणारे दिवे देखील लावले जातात. मात्र या सर्व गोष्टी कितीही सुंदर आकर्षक असल्या तरी त्यांना काही आपल्या पारंपरिक अशा सुंदर पणत्यांची सर येत नाही. त्यामुळे या दिव्यांसोबतच पणत्या देखील मोठ्या हौसेने लावल्या जातात. पणत्यांमधून तेल गळून कोणतेही डाग पडू नये आणि पणत्यांनी तेल शोषून घेऊ नये यासाठीच काही सोप्या टिप्स आम्ही सांगणार आहोत. (Latest Marathi News)
टीप क्रमांक १
सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा बाजारातून पणत्या आणतात, तेव्हा त्या जशास तशा अजिबातच वापरायला काढू नये. पणत्या आणल्या नंतर किमान ५/६ तास त्या पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर ठेवल्यास उत्तम. यासाठी पणत्या अगदी दिवाळीच्या दिवशी न आणता काही दिवस आधी आणाव्या. आणल्यानंतर त्या एका मोठ्या पसरत भांड्यामधे किंवा टबमध्ये ठेवा त्यात त्या पणत्या बुडतील इतके पाणी टाका आणि त्या भिजू द्या. काही तासांनी किंवा सकाळी त्या पाण्यातून बाहेर काढा आणि त्यांना उन्हात सुकवून घ्या. असे केल्याने पणत्या अजिबातच तेल शोषून घेणार नाहीत. (Top Marathi Headline)
टीप क्रमांक २
पणत्यांच्या तालाच्या भागाला बारीक मेणाच्या थराने कोट करावे. असे केल्यास तेल गळण्याची समस्या खूपच कमी होते. मेणामुळे मातीच्या छिद्रांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि तेल बाहेर झिरपत नाही. हे करण्यासाठी मेण उकळून ते एका कापसाच्या बोळ्याने पॅंटीच्या तळाच्या भागावर फिरवा आणि व्यवस्थित कोरडे होऊ द्या. (Todays Marathi Headline)
टीप क्रमांक ३
पणत्या तयार करताना माती मऊ असल्याने त्यातून तेल गळण्याची शक्यता जास्त असते. पणत्यांचा तळ साखरेच्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे पणत्या मजबुत होतील आणि तेल झिरपणार नाही. यासाठी पाण्यात दोन चमचे साखर किंवा मीठ घाला आणि त्या पाण्यात पणत्या २ ते ३ तास ठेवा. (Trending Marathi Headline)
टीप क्रमांक ४
पणतीत तेल ओतण्याआधी तिच्या तळाशी थोडी वाळू किंवा रेती घाला. वाळू मातीच्या छिद्रांमध्ये जाऊन त्यांना बंद करेल आणि तेल गळण्याचं प्रमाण कमी होईल. या पद्धतीमुळे दिवा तासन-तास जळतो आणि तेल व्यवस्थित राहते. (Top Marathi News)
टीप क्रमांक ५
पाण्यात पणत्या भिजल्यानंतर त्या बाहेर काढून त्यांना शक्य असल्यास ऍक्रॅलिक पेंटचा एक कोट द्यावा. अगदी पणत्यावर बारीक सारीक कलाकुसर केली नाही तरी चालेल पण एक ऍक्रॅलिकचा कोट द्यावा. यामुळे पणत्या गळणार नाही. (Latest Marathi Headline)
=======
Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न
Diwali : दिवाळीसाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स
=======
टीप क्रमांक ६
अनेक वेळा मातीच्या प्रकारानुसार पणत्यांमधून तेल गळण्याची समस्या होते. अशावेळी, जाड आणि घट्ट मातीच्या पणत्या निवडण्याची काळजी घ्या. बाजारात पणत्या विकत घेताना त्यांचा तळ नीट तपासून घ्या. जाडसर आणि न उभ्या राहणाऱ्या पणत्यांचा वापर केल्यास तेल गळण्याची समस्या कमी होते. (Top Trending News)
टीप क्रमांक ७
पणत्यांमध्ये कोणत्या मातीपासून बनल्या आहेत हे देखील पणत्यांच्या गळतीमध्ये पाहणे गरजेचे असते. अशावेळी बाजारातून पणत्या घेताना त्या जाड आणि घट्ट मातीच्या पणत्या असतील याची काळजी घ्या. पणत्या विकत घेताना त्यांचा तळ नीट तपासून घ्या. जाड पणत्यांचा वापर केल्यास तेल गळण्याची समस्या कमी होते. (Social News)