Home » Diwali : फटाके फोडताना भाजल्यास ‘हे’ सोपे उपाय करून मिळवा त्वरित आराम

Diwali : फटाके फोडताना भाजल्यास ‘हे’ सोपे उपाय करून मिळवा त्वरित आराम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

प्रकाशाचा सणाची अर्थात दिवाळीची सुरुवात झाली आहे. आता पुढचे काही दिवस फक्त मजा आणि आनंदाचे जातील. दिवाळी म्हणजे आनंद, सौख्य, उत्साह, भरभराट. आता आपल्याला सगळीकडे पणत्यांची आरास, चविष्ट फराळ, आकर्षक रांगोळी, उटण्याचा घमघमाट, फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल. दिवाळी म्हणजे फटाके हे जणू समीकरणच आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके फोडणे ही जणू अलिखित परंपराच बनली आहे. कारण दिवाळीमध्ये जेवढे महत्व लक्ष्मी पूजन, फराळाला, पणत्यांना आहे तेवढेच महत्व फटाके फोडण्याचा देखील आहे. त्यामुळे या दिवाळीच्या काळात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी पाहायला मिळते. (Diwali  2025)

मात्र फटाके फोडणे हे सहज वाटणारे काम असले तरी जोखीमचे काम आहे. कारण अनेकदा फटाक्यांमुळे अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण ऐकत, पाहात, वाचत असतो. त्यामुळे कायम फटाके फोडताना सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांनी तर आपल्यासोबत कोणी मोठी व्यक्ती असेल तरच फटाके फोडावे. बरीच काळजी घेऊनही जर फटाके फोडताना कोणाला गंभीर किंवा साधी इजा झाली तर त्यावर लगेचच कोणता उपचार करावा जेणेकरून जास्त त्रास होणार नाही, याची आपण माहिती घेऊया. (Marathi)

दुर्दैवाने फटाके फोडताना इजा झाली तरी त्यामुळे होणारा त्रास हा असहनीय असतो. कधी कधी थोडक्यात आपण वाचतो, तर कधी कधी गंभीर जखमी होतो. फटाक्यांमुळे जखमी झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याआधी जर आपण काही छोटे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि होणारा त्रास कमी होईल. मग फटाक्यांमुळे इजा झाल्यास कोणते घरगुती उपाय करायचे पाहूया.

थंड पाणी घाला
दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला तर सर्वप्रथम त्यावर थंड पाणी टाका. जळलेल्या जागेवर बर्फ लावल्याने रक्त गोठू शकते. जळलेली जागा काही काळ थंड पाण्यात बुडवून ठेवावी. यामुळे तात्काळ आराम मिळू शकतो. (Marathi News)

त्वचेसाठी कोरफड
कोरफड त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात दाहक-विरोधी आणि आरामदायी गुणधर्म आहेत. हे जखमा जलद बरे होण्यास मदत करते आणि त्वचेला थंडपणा देते. जर त्वचा जळली असेल तर ताबडतोब प्रभावित भागावर कोरफड वेरा जेल लावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. किंवा सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील ‘व्हिटॅमिन सी’ आणि लव्हेंडर ऑइलमधील ‘व्हिटॅमिन इ’ एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. (Top Stories)

मध
सर्वांच्याच घरात उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे मध. भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात,.मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते. (Todays Marathi Headline)

Diwali

तुळशीचा रस
जर तुम्हाला थोडेसे भाजले असेल तर त्या भागावर तुळशीच्या पानांचा रस लावावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि भाजल्याचे निशाण सुद्धा राहणार नाहीत. पण जर जखम गंभीर असेल तर याचा वापर करणे टाळावे आणि लगेचच डॉक्टरांकडे जावे. (Latest Marathi News)

केळ्याची साल
केळ हे फळ सर्वत्र उपलब्ध असते. केळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही
दही देखील आपल्याला सर्रस उपलब्ध होतो. प्रत्येक घरामध्ये हे असतेच भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

डोळे धुवून कापूस लावावा
अनेकदा फटाके फोडताना निष्काळजीपणामुळे डोळ्यांनाही जखम होते. अशावेळी नेत्रतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फटाक्यांमुळे जर डोळ्यांना काही इजा झाली तर डोळे स्वच्छ कापसाच्या पॅडने झाकून ताबडतोब रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावे. तसेच डोळ्यात लहान कण गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत आणि नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. (Top Marathi News)

ऑलिव्ह ऑइल
जर तुमच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल असल्यास भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो. थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

खोबरेल तेल
जखम झालेल्या ठिकाणी इतर कोणताही पदार्थ लावण्याऐवजी खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेवर थंडावा मिळतो. तसेच जखम थोड्या प्रमाणात बरी झाल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने मसाज करावे. जास्त वेळ मसाज करू नये. (Latest Marathi Headline)

स्वच्छ आणि सुती कापड वापरा
जळलेली जागा स्वच्छ, कोरड्या आणि पातळ सुती कापडाने झाकून ठेवा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. हे कापड सैल ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हवा देखील जखमेपर्यंत पोहोचू शकेल, ज्यामुळे जखम लवकर सुकते आणि बरी होते.

बटाटा
जर त्वचा जळत असेल आणि खूप जळजळ होत असेल तर तुम्ही बटाटा वापरू शकता. बटाट्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आग कमी करण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, बटाटा बारीक करून त्याची पेस्ट प्रभावित भागावर लावा. असे केल्याने जळजळ कमी होईल. (Marathi Trending Headline)

========

Happy Diwali 2025: फटाके फोडताना पाळा हे 10 महत्वाचे नियम, सुरक्षित साजरी करा दिवाळीचा सण

========

फटाके फोडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* फटाके फोडताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत आणि चप्पल वापरावीत, नायलॉनचे कपडे टाळावेत. लहान मुले फटाके फोडत असताना मोठ्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहणे आणि त्यांच्यापासून फटाके लांब ठेवणे आवश्यक आहे. (Top Trending News)

* अपघाताची शक्यता लक्षात घेऊन, फटाके फोडताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी आणि कोणाला भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे. तसेच, फटाके पेटवण्यासाठी काडेपेटी \ किंवा लायटरचा वापर टाळून, अगरबत्ती किंवा फुलबाजीचा वापर करावा.

* इमारतीत, जिन्यावर, टेरेसवर, गर्दीच्या भागात किंवा वाहनांजवळ फटाके फोडू नयेत. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडणे पूर्णपणे टाळावे. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतींजवळ हवेत उडणारे फटाके फोडण्याची परवानगी नाही.

* दिवे किंवा पणत्या खिडक्यांच्या पडद्याजवळ लावू नयेत. तसेच, विजेच्या रोषणाईसाठी अधिकृत तंत्रज्ञांची मदत घ्यावी आणि निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) विद्युत भार होणार नाही याची काळजी घ्यावी. (Social News)

(कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.