आली आली दिवाळी आली….वर्षातला सर्वात मोठा आणि आनंदाचा सण दिवाळी अखेर आलाच. आज वसुबारस आणि उद्या धनत्रयोदशी. आता घराची साफसफाई झाली असेल आणि फराळाचे पदार्थ देखील बनवणे चालू असेल. मात्र आता सगळ्यांचेच लक्ष असेल ते घराच्या सजावटीकडे. दिवाळीचा सण हा कायम आपल्याला सकारात्मकता, आनंद, उत्साह देतो. त्यामुळे या सणाचे स्वागत देखील आपण दणक्यात केले पाहिजे. यासाठीच घराची सजावट खूप महत्वाची आहे. या सणाच्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. सोबतच पाहुण्यांची देखील ये जा या काळात मोठ्या प्रमाणात होत असते. आपले घर जर सुंदर आणि आकर्षक पद्धतीने आपण सजवले असेल तर सगळ्यांनाच ते आवडेल. (Marathi)
आता दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. तिमिरातुनी तेजाकडे अर्थात अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश दिवाळी आपल्याला देते. त्यासाठीच आपण दिवाळीमध्ये घराला आकर्षक रोषणाईने, आकाशकंदिलाने, पणत्यांनी सजवत असतो. लक्ष्मीचे स्वागत पणत्यांच्या मंद प्रकाशात केले जाते. याच पणत्यांचा वापर करून आपण सुंदर पद्धतीने घर सजवू शकतो. कमी खर्चात दिव्यांनी तुमचे घर सजवायचे असेल, तर यावेळी काही सोप्या DIY युक्त्या अवलंबून तुम्ही तेलाशिवाय दिवा लावून तुमचे घर चमकवू शकता. यासाठी अतिशय सोप्या आणि आकर्षक आयडिया आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Diwali 2025)
तुम्ही घरी घरातलेच काही सामान वापरून आकर्षक असे रंगबेरंगी दिवे बनवू शकता. यासाठी लहान काचेचे ग्लास घेऊन त्यात पाणी भरावे. मात्र ग्लास पूर्ण भरू नये साधारण एक इंच रिकामा ठेवावा. या पाण्यात तुमचा आवडता फूड कलर किंवा वॉटर कलर मिसळा. आता चमच्याने पाण्यावर थोडे तेल टाका. हे तेल पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगेल आणि दिव्याला चमक देईल. (Trending Marathi Headline)
आता एक पारदर्शक प्लास्टिक रॅप घ्या आणि कात्रीने लहान गोल आकार कापा. या गोल तुकड्यांच्या मध्यभागी एक लहान छिद्र करा आणि त्यात कापसाची वात घाला. आता या लहान वात काळजीपूर्वक पाण्यावर ठेवा. ती तरंगताना दिसेल आणि खूप सुंदर वाटेल. तुम्हाला हवे असल्यास दिवा अधिक चमकदार आणि उत्सवी दिसण्यासाठी तुम्ही पाण्यात थोडी चमकी किंवा ग्लिटर देखील घालू शकता. शेवटी वात पेटवा या सुंदर दिव्यांनी तुमचे घर चमकून निघेल. यासोबतच तुम्ही विविध आकाराच्या, रंगाच्या सुंदर मेणबत्यांचा वापर देखील करू शकता. (Top Marathi News)
याशिवाय तुम्ही आपले पारंपरिक मातीच्या पणत्या घेऊन त्या घरीच छान पद्धतीने डेकोरेट करू शकता. या पणत्या तुम्ही विविध रंगांनी आणि डिझाइनने सजवू शकता. याशिवाय पणत्यांना तुम्ही पिस्त्याच्या टरफलांचा वापर करून देखील सजवू शकता. यासाठी पिस्त्याची टरफलं ती पणतीच्या आजूबाजूला चिकटवून घ्यावी. विविध आकारामध्ये हे टरफलं चिकटवता येतात. ही टरफलं लावल्यानंतर ती वाळू द्यावी. वळल्यानंतर त्यावर आपल्या आवडीचा रंग द्यावा. एक आकर्षक पणती तयार होईल. यासोबतच आजकाल बाजारात मिळणाऱ्या पिमपोमचा वापर करून देखील तुम्ही या पणत्या सजवू शकता. (Latest Marathi Headline)
घराच्या सजावटीसाठी आकर्षक पणत्या तयार झाल्यानंतर आता तुम्ही घराला अधिक सुंदर बनवण्यासाठी आणि प्रकाशमय बनवण्यासाठी अजून काही गोष्टींची मदत घेऊ शकता. जसे की दारासमोर आकर्षक, रंगीत रांगोळी काढा, पणत्यांची सुंदर आरास करा, घराच्या बाहेर सुंदर असे ताज्या फुलांचे किंवा आर्टिफिशीयल असे तोरण लावा. घराच्या प्रवेश दाराजवळ आणि घराच्या आता फुलांच्या माळा लावू शकता. दिवाळीत घराच्या सजावटीसाठीही तुम्ही काचेच्या वाट्या वापरू शकता. यासाठी तुम्ही काचेच्या भांड्यात पाणी टाकून, गुलाबाची पाने आणि झेंडूची फुले टाकून मेणबत्ती पेटवू शकता. (Top Trending NEws)
========
Diwali : दरवाज्याबाहेर आंब्याच्या किंवा अशोकाच्याच पानांचे तोरण का लावले जाते?
Diwali : दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे
========
दिवाळीला दिव्यांचे महत्व असते. घर उजळून टाकण्यासाठी दिव्यांचा वापर झाल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करू शकता. यासाठी नॉर्मल लायटिंगच्या माळा, एलईडी लाईट्स, सेलवर चालणारे लाईट्स याचा वापर करू शकता. यामुळे तुमचे संपूर्ण घर तर उजळून निघेलच, पण घराची सजावटही खूप चमकेल. घरातील पायऱ्या, बाल्कनी आणि खिडक्यांवर मातीचे दिवे, मेणबत्त्या लावू शकता. टेबलवर फुलांची सजावट करा, ज्यामुळे घरात रंगीत आणि सुगंधित वातावरण तयार होते. फुलांचे गुच्छ किंवा सुगंधी फुले ठेवून सजावट करता येते. दिवाळीत अनेकजण घराला रंग देतात. रंग दिला की घर सुंदर आणि छान दिसतं. रंग जरी नसेल दिला तरी तुम्ही रंगीबेरंगी कागदाने घराच्या भिंती सजवू शकता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics